पान:'भारता'साठी ('Bharata'sathi).pdf/151

विकिस्रोत कडून
हे पान प्रमाणित केलेले आहे.

राहील, अशी व्यवस्था केली आणि मराठवाड्यातल्या कोर्टात जास्तीत जास्त तीन महिन्यात निकाल लागतो अशी पिरस्थिती केली. सर्व जगातले गुंतवणूकदार दिल्ली, मुंबई सोडून मराठवाड्यात उतरतील. मला बाहेरच्या माणसाला स्वतंत्र मराठवाड्याच्या चर्चेची सुरुवात करायला आपण बोलावलं, मी चर्चेत धोक्याची स्थान दाखवायचं काम केलं.
 भावनेचा विषय निघाला की मला मोठं कठीण होतं म्हणून मी अर्थशास्त्रातल्या आकडेवाऱ्या मांडत असतो. आम्ही गद्य मांडतो म्हणजे आम्हाला भावना नाहीत असं नाही.
 संयुक्त महाराष्ट्राचं आंदोलन झालं तेव्हा मी मुंबईमध्ये होतो, कॉलेजचा विद्यार्थी होतो. फ्लोरा फाऊंटनवर जेव्हा १२ माणसे ठार झाली त्यावेळीही मी तिथं होतो. दिल्लीला मोर्चा नेला तेव्हा 'जागा मराठा आम जमाना बदलेगा' हे शाहीर अमरशेखचं काव्य मी स्वतः ऐकलंय. महाराष्ट्राच्या अभिमानाबाबत मला नाही वाटत मी कुणापेक्षा कमी असेन! पण फरक असा पडला प्रत्येक वेळी आम्ही मृगजळाच्या मागे धावत गेलो अन् निराशा आमच्या पदरी आली. गांधीजींनी सांगिलं गोरा इंग्रज काढून लावा. गोरा इंग्रज गेला त्याच्या जागी काळा इंग्रज आला. निझाम गेला; पण निझाम परवडला हे नकोत असे म्हणण्याची वेळ यावी असे राज्यकर्ते आले. आज मराठवाड्याची भाषा बोलताना मनोहर जोशी असो की, शरद पवार असो, यांच्या जागी तुमचा एक मराठवाडी सुलतान नेमू नका. त्यावेळी तुमच्या स्वातंत्र्याची व्याख्या चोख मांडून घ्या. एवढंच सांगण्यासाठी उभा आहे.
 अण्णाभाऊ साठे यांच्या पोवाड्यात म्हटले आहे.
 "कोकणच्या दुःखाची तरल स्पंदने नागपूरी जनतेची हलविती मने."
 असं संयुक्त महाराष्ट्राचं स्वप्न होतं. कोकणची सुखवस्तू जनता कोकणच्या दारिद्रयाने दु:खी होईल असं तेव्हा मानलं गेलं. आज नागपूरच्या दु:खाने कोकणच्या मनात काही स्पंदने होऊ नयेत अशी परिस्थिती तयार झाली आहे.
 एकावेळी पं. नेहरूंना मी परमेश्वर मानलेलं आहे; पण २२-२५ मध्ये त्यांच्या कारकीर्दीत देशाचं नुकसान झालं हे पाहिल्यानंतर अन् ज्या देशभक्तीपोटी मी पंडित नेहरूंना देव मानलं त्याच देशभक्तीपोटी त्यांचे पुतळे उखडून टाका हे सांगणं कर्तव्य वाटलं म्हणून मी ते बोललो. "इतिहास कवटाळून बसलो तर भविष्य घडायचे कसे?"

 १९६० पासून मी कापसाच्या प्रश्नावर लढतो आहे. एकाधिकार कापूस

भारतासाठी । १५१