पान:'भारता'साठी ('Bharata'sathi).pdf/149

विकिस्रोत कडून
Jump to navigation Jump to search
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे


वसतीला आणि म्हणतील आता मराठवाड्याला आम्हाला काय काय पाहिजे? मराठवाड्याला इतक्या इमारती हव्यात, इतका नोकरवर्ग हवाय, इतकी रक्कम हवी आणि मग नवीन सरकार तयार होईल. हे हाल चालूच राहतील. हे दोघे सरकारध्ये असून उसाचे व कापसाचे हाल थांबलेले नाहीत तिथे मराठवाडा राज्य झाल्यावर एकटे मुंडे हे हाल थांबवू शकणार नाहीत.
 मराठवाडा कशा प्रकारे तयार व्हावा? माझं एक स्वप्न आहे ते तुम्हाला सांगतो ते पूर्ण करायचं की नाही हे तुमच्या हातात आहे. मराठवाडा व्हायचं ठरलंन तर नव्या मराठवाड्याच्या नेत्यांत किंवा जुन्या मराठवाड्याच्या नेत्यांत हे वेगळं आगळं राज्य करायची ताकद आहे असं मला फारसं दिसत नाही. म्हणून सर्व माणसांनी हे महाराष्ट्र शासनाला सांगावं की, तुमचा नोकरवर्ग आम्हाला नको. तुमचा तुम्हीच ठेवून घ्या, त्यांचा खर्चही तुम्ही भरा, त्यांचा पगारही तुम्ही भरा, आम्हाला जो मराठवाडा हवा आहे त्याला तुमच्या इमारती नकोत. आम्हाला 'बळीराज्य मराठवाडा' हवा आहे. जिथे लोकांवर निबंध राहणार नाहीत. म्हणजे सरकारी कायदेकानूनच आपण कमी करून टाकले तर नोकरदार जे आहेत ते तुमचे तुम्ही सांभाळा.
 त्यांचे नोकरदार का नको? जर साखर कारखाना तुमच्या हाती आला. काय होतं? आमचे एक मित्र आहेत नरेंद्र अहिरे म्हणून. त्यांनी एक मोठी निवडणूक लढविली. एक साखर कारखाना हाती घेतला आणि त्यांच्या लक्षात असं आलं की, हा कारखाना व्यवसिति चालवणं केवळ अशक्य आहे म्हणून त्यांना निडूक जिंकता आली. त्या कारखान्यात जिथे १०० माणसे पाहिजे होती तिथे ३०० माणसे कामाला लावलेली होती. ती २०० माणसे जोपर्यंत घरी पाठवता येत नाहीत तोपर्यंत कारखाना व्यवस्थित चालणं शक्य नव्हतं. तसंच, तुमचे राज्य सुरळीत चालणे शक्य नाही.

 तेव्हा लोकांचे भेल करण्यामध्ये कायदेकानुन निर्बंध घालणार नाहीत असे जे राज्य त्याला मी बळीराज्य म्हणतो. बसं बहीराज्य जर का तुम्ही तयार करणार असाल तर मग तुमच्या बरोबर मी सांगाल ती किमत मोजायला मी तयार आहे; पण तसं नाही, तिकडं महाराष्ट्र आहे तसाच एक आमचा मराठवाडा तसा एक मुख्यमंत्री आणि तसंच शोषण आमच्या शेतकऱ्यांच करायचं असेल तर मी तुम्हाला शुभच्छा देईन! एक मराठवाडा कशाला? जिल्ह्यातिल्ह्यात मराठवाडे तयार करा. तुमच्या परिस्थितीमध्ये काहीही फरक पडणार नाही हे मात्र विसरू नका. म्हणजे जिथे एके ठिकाणी सरकार संपतं अन् शेकडो हजारो

भारतासाठी । १४९