पान:'भारता'साठी ('Bharata'sathi).pdf/148

विकिस्रोत कडून
Jump to navigation Jump to search
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहेदुसरी आकडेवारी सांगायचीय ही आकडेवारी मी गेली तीन वर्षे देशभर सांगतो आहे. मराठवाडा आणि विदर्भ हे प्रामुख्याने कच्च्या मालाचे उत्पादन आहेत. इथे जो माल तयार होतो ते कापूस हा सगळ्यात जास्त उणे किमत मिळणारा पदार्थ आहे. तुमचा जो अनुशेष आहे तो सरकारी बजेटातला नाही तर सबसिडी मिळायची होती ती मिळाली नाही म्हणून तुम्हाला अनुशेष आहे. तिथं मेजवानी चाललीय अन् टेबलाखालचं उष्ट आम्हाला खायला मिळालं नाही अशा प्रकारचा हा भिकार अनुशेष नाही. तर आमच्या कापसाला तुम्ही १०० रुपये भाव दिलात तर बाहेरच्या बाजारपेठेत किमान ३०० रुपये म्हणजे २०० रु. जास्त मिळाले असते. हा खरा आमच्या अनुशेषाचा आकडा आहे आणि अनुशेषाचा असा जर आकडा काढला तर किती आकडा येईल? सगळ्या देशात एका वर्षाचा शेतकऱ्यांचा अनुशेष ४२ हजार कोटी रुपयांचा आहे. मराठवाडा व विदर्भाचा असा आकडा काढला तर हा आकडा तर हा आकडा पाच ते सहा हजार कोटीचा येतो आणि मग महाराष्ट्राच्या स्थापनेपासून ३६ वर्षांचा अनुशेष काढायचा झाला तर ३६ गुणिले ५ म्हणजे १८० हजार कोटींचा हा अनुशेष आहे. हा कोण भरून देणार? हा अनुशेषाचा आकडा आहे आणि हा अनुशेष मराठवाड्यात आला याचं कारण हे पश्चिम महाराष्ट्राचे लोक दुष्ट आहेत नव्हे तर पश्चिम महाराष्ट्रात इंडियाचं प्रावल्य आहे. विदर्भात मराठवाड्यात भारत आहे आणि इंडिया आणि भारताची मैत्री ही अशी सापमुंगसाची आहे आणि त्यामुळे मराठवाडा आणि विदर्भाचा खरा अनुशेष हा शेतीमालाच्या शोषणाचा आहे. हा मुद्दा जर लक्षात घेतला तर मग पुढाऱ्यांच्या डावाला काटशह बसतो. पुढारी तुमचे जर सांगायला लागले की, मराठावाड्याचा शेतकऱ्यांचा अनुशेष हा अंदाजपत्रकातला आहे तर ते तुम्हाला बनवताहेत. नवीन जर का मराठवाडा झाला तर त्यांचा अनुशेष भरून निघेल; पण तुमचा शेतकऱ्यांचा अनुशेष निघेल किंवा नाही हा सर्वात महत्त्वाचा मुद्दा आहे. खलिस्तान निर्माण झाल्याने गव्हाला भाव मिळणार आहे का? तसे मराठवाडा राज्य निर्माण झाले तर तुमच्या कापसाला, ज्वारीला, तुरीला निदान खाली दाबून टाकलं जाणार नाही याची शाश्वती आहे का? या विषयावर चर्चा झाली पाहिजे.

 आणि जर का या प्रश्नाकडे आपण लक्ष दिलं नाही आणि उद्या समजा बाळासाहेबांनी एकदा बटण दाबलं की मराठवाडा राज्य होईल, मग काय सुरुवात होईल? पश्चिम महाराष्ट्राचे मनोहर जोशी एका बाजूला अन् मराठवाड्याचे गोपीनाथ मुंडे दुसऱ्या बाजूला. म्हणजे आजचे दोस्त दोस्त आहेत ते हे एकत्र

भारतासाठी । १४८