पान:'भारता'साठी ('Bharata'sathi).pdf/147

विकिस्रोत कडून
हे पान प्रमाणित केलेले आहे.

नेले नाहीत तर आर्थिक प्रश्नावरती लक्ष केंद्रीत करता येतं याचा पुरावा तिथे मिळाला आणि डॉ. दाभोळकर, अर्थशास्त्रातल्या एका संशोधकाने असे लिहिले की, ज्यावेळी मोठे मोठे पुढारी पंजाबमध्ये एके-४७ घेतल्याशिवाय कुठे जाऊ शकत नव्हते त्यावेळी आम्ही गावागावात पंजाबमध्ये काठीचा तुकडासुद्धा न घेता हिंडत होतो.
 जातीयवाद, धर्मवाद न घेता अर्थवादावरच लोकांचं लक्ष रहावं म्हणून आम्ही विदर्भामराठवाड्याचे प्रश्न घेतले नव्हते.
 आज समाजवाद कुंठित झाला, समाजवादी नियोजनाने पुढे जाता येत नाही असे म्हटल्यावर नीचातल्या नीच फुटीरवाद्यांनी संपूर्ण देशाला गिळून टाकायला सुरुवात केली आहे. माझा शेजारी माझ्या जातीचा नाही, दुसऱ्या धर्माचा आहे म्हणून त्याचा द्वेष करावा असे सांगणारी मंडळीही मान्यवर हृदयसम्राट होऊन राहिलीत.
 यावेळी मला असं वाटते की, काट्यानं काटा काढायचा असेल तर विदर्भवाद आणि मराठवाडावाद हा जातीवाद आणि धर्मवादाच्या तुलनेने जास्त उदारवादी आहे असं सिद्ध करून दाखवायला हवे.
 मुंबईहून जातीवाद या रोगाची सुरुवात झाली आणि महाराष्ट्रात या रोगाच्या विरुद्ध बोलण्यास कुणीही धजत नव्हते तेव्हा मी एकटा बोलत होतो. मुंबई महानगरपालिका हातात आल्यानंतर त्याचे पैसे गावागावात गेले, गावागावात वाघाची तोंड दिसायला लागली आणि सगळ्या महाराष्ट्रभर हा रोग पसरला. ज्या भागामध्ये आणि विदर्भ आणि मराठवाडा ही दोन नाव मी मुद्दाम घेतो, की जिथं अशा तऱ्हेचा जातीवाद आणि धर्मवाद अजून फार बोकाळला नाही. या प्रदेशांना जर का मुंबईहून निघालेल्या या कॅन्सरमधून वाचवायचं असेल तर एक तऱ्हेची शस्त्रक्रिया (ऑपरेशन) करणं उपयुक्त आणि आवश्यक ठरेल, असं माझं स्पष्ट मत आहे. हे केवळ माझंच मत नाही. फाजल अली कमिशनने असं म्हटलंय की विदर्भाने महाराष्ट्रात गेला तर विदर्भातही जातीवाद येईल ही भीती फाजल अली कमिशनने व्यक्त केली होती हाही मुद्दा आपण चर्चा करताना लक्षात ठेवावा.

 मराठवाड्याला अनुशेष आहे, पश्चिम महाराष्ट्रापेक्षा तो अनुशेष जास्त आहे, विदर्भालाही पश्चिम महाराष्ट्रापेक्षा जास्त अनुशेष आहे, हा अनुशेष सिद्ध करण्याची आकडेवारी म्हणजे सरकारी बजेटातून किती रक्कम येथे आली. साखर कारखाने किती निघाले? सूत गिरण्या किती निघाल्या ही खरी आकडेवारी नाही. मला

भारतासाठी । १४७