पान:'भारता'साठी ('Bharata'sathi).pdf/146

विकिस्रोत कडून
Jump to navigation Jump to search
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे


तरीसुद्धा त्याच्या अर्थ असा की, पश्चिम महाराष्ट्रातले पुढारी जितके भामटे निघाले तितके भामटे आमचे नेते होऊ शकले नाहीत.दोन चोरांच्या वाटणीचा हा प्रश्न आहे. त्याचं काही फारसं तत्त्वज्ञान करण्याची गरज नाही. तुम्ही जसे दुष्काळ पडल्यावर खडी फोडायला जाता तसेच पश्चिम महाराष्टातले शेतकरीही जातात. तेव्हा जो अनुशेष आहे किंवा देण्याघेण्याचा भाग आहे तो पश्चिम पहाराष्ट्र आणि मराठवाड्यातला नाही. तर पश्चिम महाराष्ट्रातला 'इंडिया' आणि मराठवाड्यातला 'भारत' यांच्यातला देण्याघेण्याचा भाग आहे. राज्याराज्यातल्या लोकांना प्रदेशाप्रदेशाशी द्वेष करण्यासाठी जर कुणी अनुशेषांची भाषा वापरायला लागलं तर काय जो अन्याय झाला असेल त्याचे हिशेब मांडू, ते दुरुस्त करून घेऊ. एका प्रदेशातील माणसाने दुसऱ्या प्रदेशातील माणसांचा द्वेष करायचा नाही ही या चर्चेमध्ये कायम शिस्त बांधून घेऊ.
 मी जेव्हा १९८० साली विदर्भात गेलो तेव्हा विदर्भामध्ये माझ्या जवळचे सहकारी सुद्धा म्हणत होते की वेगळ्या विदर्भाचे आंदोलन झालं पाहिजे आणि मी असं म्हणत असे की मी जो सार्वजनिक आयष्यात आलोय तो अर्थवादी चर्चा करण्याकरता आलोय. कोण कोणत्या जातीत, धर्मात, प्रदेशात जन्मला आणि कोण कोणती भाषा बोलतो या विषयावर लोकांचे तुकडे पाडण्यात मला स्वारस्य नाही. विदर्भाने माझे काही नुकसान होणार आहे का? नाही होणार; पण मी आज जर का विदर्भाचं आंदोलन चालू केलं तर कापसाच्या शोषणावरचे लोकांचे लक्ष दुसरीकडे जाईल, चुकीच्या जागी जाईल. त्यामुळे तसं लक्ष जाऊ नये म्हणून असं आंदोलन आम्ही हाती घेत नाही अशी भूमिका आम्ही त्यावेळी मांडली.

साचा:Gaहा मुद्दा आणखी स्पष्ट करतो, असं कुणाला वाटू नये की, मी आज काही वेगळी भाषा बोलतोय म्हणून पूर्वीचे संदर्भ देतोय. १९८४ साली आम्ही पंजाबात गेलो तेव्हा राज्यपाल भवनास घेराव घालायला ८० हजार शीख शेतकरी आणि पंजाबचे मुख्यमंत्री दरबारसिंग यांच्या खुनाचा प्रयत्न झाला. पंजाबमध्ये आम खून पडत होते. बसमध्ये खून पडायचे. खलिस्तानची मागणी जोर धरत होती, चंडीगढला ८० हजार शीख सरदार बसलेले असताना मी अशी मांडणी केली की तुम्हाला खलिस्तान पाहिजे? तुमच्या खलिस्तानमध्ये शेतीमालाला भाव मिळेल याची काही खात्री आहे का? जर तुमच्या खलिस्तानमध्ये शेतीमालाला भाव मिळणार असेल तर अशी मागणी करतो की नांदेडमध्ये गुरुद्वारा आहे. खलिस्तान नांदेडपर्यंत आले पाहिजे. जर का जातीचे, भाषेचे प्रश्न आपण पुढे

भारतासाठी । १४६