पान:'भारता'साठी ('Bharata'sathi).pdf/144

विकिस्रोत कडून
हे पान प्रमाणित केलेले आहे.

संस्कृतीचा फारसा प्रश्नच नव्हता. सगळेच लोक गेल्या २००-३०० वर्षांत तिथे जाऊन राहिलेले, तर अशाच तऱ्हेने राज्यांची बांधणी हिंदुस्थानातसुद्धा करावी कारण तुम्हाला किती मिळणार आहे. हे कुणी ठरवायचं? सरकारने ठरायचंय. विदर्भाचा विकास,मराठवाड्याचा विकास कशावर अवलंबून आहे? राज्याच्या अंदाजपत्रकामध्ये जी रक्कम येते त्याची वाटणी करण्यावर अवलंबून आहे आणि ती जर का वाटणी सरकारने योग्य तऱ्हेने केली तर नकाशे कसे आखावेत याला काही फारसे महत्त्व नाही. याच कल्पनेने विदर्भातील लोकांनी अकोला करार केला नागपूर करार केला आणि लिहून घेतलं की जी काही साधन संपत्ती येईल त्या साधन संपत्तीचं वाटप एक किंवा दोन मार्गांनी होईल. क्षेत्रफळाच्या आधारांनी अगर लोकसंख्येच्या आधारानी साधनाचं वाटप झालं म्हणजे मग वादांना काही कारण नाही राहिलं.
 त्याच्या पलीकडे जाऊन आणखी एक मागणी होती की, मराठवाडा आणि विदर्भ हे मागासलेले प्रदेश आहेत. त्यांच्यावरती विशेष खर्च झाला पाहिजे. ही कलम घातल्यावर आता काही अडचण राहणार नाही. मराठवाड्याचा, विदर्भाचा विकास व्यवस्थितपणे होऊ लागेल. कारण महाराष्ट्राची साधन संपत्ती नीट वाटली जाणर आहे असं गृहीत धरलेलं. यातूनच अनुशेष म्हणजेच 'बॅकलॉग' हा शब्द आलाय. म्हणजे पश्चिम महाराष्ट्राच्या तुलनेत आम्हाला (विदर्भ मराठवाड्याला) जितकं मिळायला पाहिजे तितकं मिळालेलं नाही हा पश्चिम महाराष्ट्राच्या लोकांनी दुष्टपणे आमच्याकडून हे काढून घेतलं. याच्यातला रावण कोण असेल तर आख्खा पश्चिम महाराष्ट्र आणि सज्जन कोण तर तुमच्या कमलकिशोर कदमांसह सर्व धरून मराठवाड्यात जेवढे असतील ते सर्व सज्जन आणि पश्चिन महाराष्ट्रात जितके आहेत तितके सारे दुर्योधन अशी मांडणी करण्यात आली. मला प्रामुख्याने या विषयावर बोलायचंय, कारण माझा अभ्यासाचा विषय प्रामुख्याने हा आहे.

 एकूण करांपैकी किती कराची रक्कम मराठवाड्यावर खर्च व्हायला पाहिजे होती अन् प्रत्यक्षात किती झाली? हा हिशोब सर्वसाधारण जनतेच्या दृष्टीने निरर्थक आहे. पश्चिम महाराष्ट्रामध्ये साखर कारखाने काढले; पण विदर्भात काढले नाहीत. मराठवाड्यात काढले नाहीत ही भाषा सर्वसामान्य लोकांची, नाही पश्चिम महाराष्ट्रात जसे साखर सम्राट बनले तसे विदर्भात बनले नाहीत, किमान तसे सूत सम्राट किंवा कपास सम्राट बनावेत, अशी ज्यांची मनीषा आहे त्या लोकांनी ही भाषा सुरू केली आहे. याच्यामध्ये आकडे आहेत हे खरे

भारतासाठी । १४४