पान:'भारता'साठी ('Bharata'sathi).pdf/143

विकिस्रोत कडून
हे पान प्रमाणित केलेले आहे.

तेव्हा मराठवाड्याच्या लोकांची मोठी हवालदिल अवस्था झाली होती. इकडे आंध्र तिकडे कर्नाटक या राज्यासोबत राहण्यापेक्षा मराठी भाषिक महाराष्ट्रात जाण्याचा निर्णय थोडासा 'शारदा' नाटकातील 'शारदे' प्रमाणे झाला. तिचं जर का बुढ्याशी (जरठाशी) लग्न लागणार असेल. तर त्याच्यापेक्षा इकडं लागलेलं जास्त बरं असं महाराष्ट्राशी संपर्क आलेल्या लोकांना वाटलं असलं पाहिजे. अशा एका वातावरणात आणि गंभीरपणे हा निर्णय झाला असावा. गंभीरपणे हा निर्णय झाला असावा. निदान मराठवाड्याच्या लोकांमध्ये तरी अशी शंका आली नाही की, महाराष्ट्रात गेल्यामुळे आमच्यावर अन्याय होईल किंवा आपल्याला काही त्रास होईल! विदर्भाचे थोडे जास्त शहाणे, त्यांनी थोडा जास्त चांगला विचार करून लिहून घेतलं आणि त्या बावळ्यांना असं वाटलं की याच्याकडून लिहून घेतलं की आता आपल्यावरती काही होत नाही, तसं झालं असतं तर रामाचं युग चालू झालं असतं, एक वचनी राम गेले आज फक्त रामाच्या नावाने भांडणारे राहिले. त्याची काही परिपूर्ती होण्याची आवश्यकता नाही. अशा अवस्थेत मराठवाड्याने महाराष्ट्रात जायचं ठरवलं असावं.

 आणखी एक विशिष्ट परिस्थिती तेव्हा होती १९५७ साली जेव्हा एक समिती नेमली गेली तेव्हा अजून समाजवादी रचनेची घोषणा झालेली नव्हती; पण समाजवादी रचनेची घोषणा झालेली नव्हती; पण समाजवाद येतो आहे आणि भारत हा समाजवादाच्या दिशेने जातो आहे.याचा अर्थ असा की, शासन हे विकासाचं साधन राहणार आहे ही कल्पना त्यावेळी सर्वमान्य झालेली होती.आज आम्ही नेहरूंना नावे ठेवतो; पण त्यावेळेला आम्हीही म्हणत होतो की, समाजवाद हाच विकासाचा मार्ग आहे. आता राज्याच्या पुनर्रचनेचा विचार जो होतो आहे.समाजवादाकडे आज आपण येणारी पहाट म्हणून पाहात नाहीत तर एक बुडालेला सूर्य म्हणून पाहातो आहोत. आता विकासाचं साधन शासन नाही तर उद्योजकता आहे. अशा एका क्षितिजाकडे आपण वाटचाल करत असताना राज्याची पुनर्रबांधणी होते आहे.ही बदललेली परिस्थिती आपल्या चर्चेत लक्षात ठेवणे फार महत्त्वाचे आहे.एके काळी समाजवादी अर्थव्यवस्थमध्ये राज्याच्या सरहद्दी यांना काही अर्थ नव्हता.कारण शेवटी तुम्हाला काय द्यायचं हे सरकार ठरवणार होतं, म्हणून काही विद्वान असे होते की, त्यांनी म्हटलं, हे बेळगावचं भांडण, हे सरहद्दीचं भांडण.ही भांडण काढून टाका आणि हिंदुस्थानच्या नकाशावरती अशा उभ्या आडव्या चौकोनी रेषा. आखा.अमेरिकन संयुक्त राज्याची रचना अशीच झालीय हे नकाशात दिसतं.कारण तिथं भाषा आणि

भारतासाठी । १४३