पान:'भारता'साठी ('Bharata'sathi).pdf/141

विकिस्रोत कडून
Jump to navigation Jump to search
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे


इंग्रजीत देतो अन् एक कारकून येऊन त्याला सांगतो 'पाटील तुमची जमीन गेली!' काय युक्तीवाद झाला हे त्या शेतकऱ्याला शेवटपर्यंत समजायची शक्यता नाही. याला काही राज्य कारभार म्हणत नाहीत. म्हणून कोणत्याही राज्याचा राज्यकारभार लोकांच्या भाषेत चालला पाहिजे असे ज्योतिबा फुले म्हणतात.
 एका राज्याची एकच भाषा असली पाहिजे हे तत्त्व भाषावर प्रांतरचनेत आहे. त्यासाठी एक भाषेचं एकच राज्य असंल पाहिजे अशी बिलकुल आवश्यकता नाही उदा. समजा उद्या कर्नाटकच्या लोकांनी असं म्हटलं की आमच्या कानडी भाषेपेक्षा मराठी भाषा शिकायची आहे. त्यांनी सगळ्यांनी मराठी भाषा शिकली तर मग काय तुम्ही महाराष्ट्र अधिक कर्नाटक असं मोठं राज्य करणार काय? किंवा आंध्रातील लोकांनीही असंच केलं तर महाराष्ट्र अधिक कर्नाटक अधिक आंध्र असं मोठं राज्य थोडंच कुणी करणारय?
 जे महाराष्ट्र हे राज्य तयार झालं तेव्हा लोकसंख्या तीन कोटी होती आज सात कोटी झाली आणि प्रशासनाच्या सोयीकरता या राज्याची दोन तीन राज्य करावी असं म्हटलं तर त्यामुळे मराठी भाषेचा मोठा द्रोह होतो असं नाही; महाराष्ट्र राज्याचा द्रोह होतो असं नाही; देशद्रोह होतो असं तर मुळीच नाही. जी चर्चा करायची आहे ती शिवराह चिखलफेक होऊन होऊ नये. त्यासाठी मुख्य मुद्दे हे असावेत.

 लहान आणि मोठी राज्ये या विषयावरही खूप चर्चा चालू आहे. माझं सर्वसाधारण मत असं आहे की, मोठ्या राज्यापेक्षा लहान राज्य असणंच अधिक चांगलं का? मला जर का माझं काही काम सोडवून घ्याचं असेल तर हायकोर्टात मुंबईला जावं लागतं. मुंबईला गेल्यावर राहायची माझीसुद्धा सोय नाही; पण जितकं जवळ केंद्र असेल, तितकं चागलं एवढंच मी म्हणेन; पण याचकरिता लहान राज्य केली पाहिजे व ते आवश्यकच आहे असं काही मला वाटत नाही; पण सध्याच्या युगात मला वाटतं राधनी असणं अनावश्यक ठरवलं जर मराठवाडा राज्य अस्तित्वात आले तर राजधानी कोणती? असा प्रश्न होईलच. एकदा पश्चिम महाराष्ट्राशी भांडण संपलं की, तुमची आपआपसात मारामारी होणारच आहे. राजधानी कोणती यावर! औरंगाबादचे समर्थन केले जाईल, मंत्री येतील जातील; पण ख.अ.ड. अधिकारी इतर जिल्ह्यात, तालुक्यात जायला तयार होणार नाहीत. त्यांना औरंगाबादच राजधानीचे योग्य ठिकाण वाटेल. तेव्हा तुमच्या परिषदेला न येणारांनी आजच औरंगाबादेत मोठ्या प्रमाणात जमिनी खेरदी करायला आताच सुरुवात केली आहे. जर का आपण असं

भारतासाठी । १४१