पान:'भारता'साठी ('Bharata'sathi).pdf/138

विकिस्रोत कडून
हे पान प्रमाणित केलेले आहे.


बळिराज्य - मराठवाडा


 'बळिराज्य मराठवाडा' म्हणून स्वतंत्र मराठवाडा राज्य मागणे म्हणजे काही स्वतंत्र खलिस्तान माणसे नाही, ही काही देशद्रोहाची मागणी नाही. ही मागणी केल्याने देशद्रोह होत नाही आणि मराठी भाषेशी द्रोहही होत नाही. एका मराठी राज्याची दोन तीन मराठी राज्ये झाली तर मराठी भाषा बुडेल, असे होण्याची सुतराम शक्यता नाही.
 आपण ज्योत पेटवली आता यातून एक चर्चेचा नंदादीप उभा राहिल. निर्णय काय व्हायचाय तो योग्यतेनुसार इतिहास करेल. वर्तमानपत्रात मराठवाड्याविषयी चर्चा होते, स्वतंत्र विदर्भाविषयी चर्चा होते तेव्हा त्या चर्चेमध्ये एक वाक्य हमखस असते की, "या पश्चिम महाराष्ट्राच्या लोकांनी आमची लूट केली आहे. यांच्यापासून आम्हाला वेगळं व्हायला पाहिजे!" अशी मांडणी बहुतांशी होत असताना आपण पश्चिम महाराष्ट्रात, अपघाताने का होईना जन्मलेल्या एका माणसाला या परिषदेचे उद्घाटन करण्यासाठी तुम्ही बोलावलेत त्याबद्दल मी तुमचे अभिनंदन करतो.
 इथं काही हिंदू, मुस्लिम, ब्राह्मण, मराठे असा जातीयवाद होणार नाही. पश्चिम महाराष्ट्राच्या लोकांनी जरी शहाणपण सांगितलं तर ते शिरोधार्य मानण्याची परंपरा मराठवाड्यात आहे ती यापुढेही चालू राहणार आहे. माझं काम तसं सोपं आहे. चर्चा आज व यापुढेही चांगली व्हावी यासाठी थोडासा मंच तयार करून देण्याची जबाबदारी माझी आहे. यासाठी मी इथे उभा आहे.

 १९६० साली सर्व राज्यांची एकदा आखणी आणि त्यानंतर हा प्रश्न सुटला असे आपण धरून चाचलो होतो. काही काही लोक म्हणायचे देशामध्ये कोणताही प्रश्न निर्माण झाला म्हणजे राष्ट्रीय भावनेचा अभाव आहे. संपादकांना पत्र लिहिणारे काही लोक म्हणत असत की, "देशामध्ये काही गोंधळ चाललाय ना,

भारतासाठी । १३८