पान:'भारता'साठी ('Bharata'sathi).pdf/133

विकिस्रोत कडून
Jump to navigation Jump to search
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहेमांडणीच मतलबी आणि अवास्तव आहे.
 विहिरी कम, पंप जास्त
 शेतीला होणाऱ्या वीजपुरवठ्यामध्ये मोठी सवलत आहे असे युक्तिवादाकरिता गृहीत धरू; दय्यम दर्जाच्या पुरवठ्याकरिता जो उत्पादनखर्च होत असेल त्या तुलनेनेही शेतीला ज्या सवलती द्यायला पाहिजे त्याहीपेक्षा जास्त सवलती आज शेतीला मिळत आहेत हेही थोडावेळ खरे धरू. तरी एक प्रश्न उरतो. यश खाती शेतीला मिळणाऱ्या लाभाचा आकडा काय असेल? म.रा.वि.मं. याबाबतीत मोठी हातचलाखी करत आहे. ते शेतीला होणारा वीजपुरवठा फुगवून दाखवत आहे. शेतीपंपाकरिता वापरल्या जाणाऱ्या विजेचा आकडा फुगवत आहेत आणि या सगळ्या बेहिशेबी गोंधळात मंडळाचा गैरकारभार आणि अधिकाऱ्याचा भ्रष्टाचार लपवत आहेत.
 महामंडळाच्या म्हणण्याप्रमाणे महाराष्ट्रात २० लाख शेतीपंप कामात आहेत. महाराष्ट्रातील विहिरींची संख्या ९ लाखाच्या आसपास आहे. नदी, तळी, कालवे या वरील उपसा, सिंचन योजनेतील पंपांची संख्या विहिरीवर बसवलेल्या पंपापेक्षा २ लाखाने जास्त असेल हे मान्य कसे करावे? सगळ्या देशात मिळून शेती पंपाची संख्या १ कोटी आहे. म्हणजे देशातील एकूण शेतीपंपापैकी २०% या कोरडवाहू महाराष्ट्रातच आहे! पंजाब, उत्तर प्रदेश, हरियाना, गुजरात, कर्नाटक, तामिळनाडू या राज्यांत विजेचे पंप सर्वत्र मोठ्या संख्येने वापरले जातात. याउलट महाराष्ट्रात पंपांचे प्रमाणे चार जिल्ह्यातच विशेषत्वाने आहे. ही सर्वत्र आकडेवारी मोठी संशयस्पद आहे.
 १९७४ ते ९४ या काळात शेती पंपांची संख्या ८.६% या गतीने वाढली आणि हॉर्सपॉवरवर आकारणी असलेल्या पंपांचा वापर ५.५% नी वाढत जाऊन सध्या शेती पंपांचा सरासरी वापर दरवर्षी १३८० तास आहे. असे महामंडळाचे म्हणणे आहे. महाराष्ट्रातील कोरडवाहू शेतीत पावसाळ्याच्या चार महिन्यांत पंप अपवादानेच चालतात. उन्हाळ्याच्या चार महिन्यातील दोन महिने तरी बहुतेक पंप पाण्याअभावी बंदच राहतात. रब्बीच्या पिकात चार महिने पंप चालतात; पण २४ तास पंप चालतील अशा विहिरी महाराष्ट्रात दुर्मिळ आहेत. आठवड्यातून तीनही फेजेस चालू आहेत. अशा काळातच मोटारी चालणार. मग हा १३८० चा अवाढव्य आकडा आला कोठून? म.रा.वि.मं. ची हातचलाखी बारकाईने समजून घेतली पाहिजे.

 म.रा.वि.मं. शेती पंपाचा आकडा फुगवीत राहते. नवीन पंपांची नोंद होते;

भारतासाठी । १३३