पान:'चैतन्य'चे प्रेरणादायी व्यक्तिमत्त्व शशीताई राजगोपालन (Shashitai Rajgopalan).pdf/40

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

गरज असते. प्रशिक्षक, सुलभकर्ता, पुस्तकपालन करणारा, लेखापाल, अंतर्गत लेखापरीक्षक आणि संस्थाचे संचालक या सर्वाना प्रशिक्षित केले पाहिजे.

स्वयंनियंत्रण प्रक्रिया एक प्रयोग

 चैतन्य संस्थासुद्धा संस्थांतर्गत, प्रत्येक पातळीवरील कार्यकर्त्याच्या क्षमता बांधणी आणि प्रशिक्षणासाठी जागरूकतेने प्रयत्न करत असते. एपिमासच्या सहयोगाने विकसित केलेल्या स्वयंनियंत्रण पुस्तिकांचे 'चैतन्य'ने मराठी रूपांतरण करून त्याप्रमाणे काम आपल्या क्षेत्रामध्ये राबविण्याचे प्रयत्न केले, आणि आजही करीत आहे. स्वयंनियंत्रण पुस्तिकांचा उद्देश्यच ‘स्वयंसहाय्य गटातील सभासदांची आर्थिक व सामाजिक प्रगती साधणे' हा आहे. त्यासाठी स्वयंसहाय्य गटातील सभासदांच्या शाश्वत, लोकशाही आधारित कायदेशीर संस्थांची उभारणी करणे हे ओघाने आलेच. या संस्थांची उभारणी करताना काही लक्ष्यकेंद्रित घटकांचे महत्त्व लक्षात ठेवावे लागेल आणि ते म्हणजे

  • सर्वांना उपयोगी पडणारी समान नोंद पुस्तके
  • सर्वांना उपयोगी पडणारे समान अहवाल
  • मान्यताप्राप्त उत्तम सेवा, कामगिरीचे निकष व संस्थात्मक स्वनियंत्रण
  • हिशोब लिखाणाची समान पद्धत निश्चिती, तसेच व्यवसाय, व्यवस्थापन आणि धोरणांची कार्यक्षम अंमलबजावणी
  • निधी संरक्षणार्थ पद्धतशीर लेखापरीक्षण व सनियंत्रण
  • पद्धतशीर निवडणूक
  • मूल्याधिष्ठित स्वत:चे कार्यकर्ते
  • सातत्याने शिक्षण / जागृती व प्रशिक्षण
  • संचालक मंडळ व त्यांचे प्रतिनिधी यांच्या प्राथमिक व संघ स्तरावरील भूमिकांची स्पष्टता
  • कायदेशीर पूर्तता

 चैतन्यसंस्थेने स्वयंसहाय्य गट व त्यांचे संघ उभारताना वरील घटकांचा विचार प्रकर्षाने केलेला आढळतो. यामुळेच 'चैतन्य'च्या कामाने प्रेरीत होऊन, ग्रामीण

४०
'चैतन्य'चे प्रेरणादायी व्यक्तिमत्त्व - शशीताई राजगोपालन