पान:'चैतन्य'चे प्रेरणादायी व्यक्तिमत्त्व शशीताई राजगोपालन (Shashitai Rajgopalan).pdf/33

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

उद्योजकता विकास यासाठी संस्था प्रयत्न करते. याशिवाय संस्था लोकाधरीत लघु वित्त व्यवस्थापन, बचत गट संघाचे व्यवस्थापन या विषयांवर अल्पमुदतीचे कोर्सेस घेणारे प्रशिक्षण व संशोधन केंद्र म्हणून कार्यरत आहे. संस्था सा-धन, Enable आणि अफार्म ह्या संस्थेची सदस्य आहे.

 ह्या संस्थेची सुरुवात डॉ. सुधा कोठारी आणि सुरेखाताई श्रोत्रिय ह्यांनी केली. सुधा कोठारी या सध्या अफार्म (ॲक्शन फॉर ॲग्रिकल्चरल रिन्युअल इन महाराष्ट्र), FWWB (फ्रेंड्स ऑफ वुमन्स वर्ल्ड बँकिंग), ज्ञानप्रबोधिनी इ. मान्यवर संस्थांच्या कार्यकारिणीत सदस्य आहेत. याआधी त्यांनी यशदा, साधन, एपिमास (आंध्र प्रदेश महिला अभिवृध्दी संगम), मायक्रोसेव्ह ह्यांच्या कार्यकारिणीतही कार्य केले आहे. रेखाताई श्रोत्रीय ह्या संस्थापक सदस्य आणि जिल्हा दक्षता समितीच्या सदस्य आहेत. कल्पना पंत ह्या कार्यकारी संचालक आहेत. ह्या सर्व संघांचे सारथी ग्रामीण महिला स्वयंसिद्ध संघ हे व्यासपीठ आहे. गटातून तयार झालेल्या अलकाताई मुळूक या संस्थेच्या अध्यक्ष म्हणून व कौशल्याताई थिगळे या प्रमुख कार्यकारिणीच्या व्यवस्थापक म्हणून काम पाहत आहेत.

❖❖❖
३३
'चैतन्य'चे प्रेरणादायी व्यक्तिमत्त्व - शशीताई राजगोपालन