Jump to content

पान:'चैतन्य'चे प्रेरणादायी व्यक्तिमत्त्व शशीताई राजगोपालन (Shashitai Rajgopalan).pdf/25

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

यापूर्वी आम्ही फक्त कार्यक्रमाच्या दृष्टीने काय कामं केली हे पाहत होतो.

 उत्तम काम करणं, उत्तरदायित्व आणि सचोटीसाठी त्या आदर्श होत्या. असं एकही काम नव्हतं की ज्यासाठी त्या तयार नसायच्या. त्यांनी एकदा कामाला सुरुवात केली की त्या पूर्णपणे त्यात असायच्या आणि एखाद्या भेटीचा निरीक्षणासह पूर्ण अहवाल त्यांच्याकडून आला नाही अशी एक पण भेट नसेल.

 शशीताईंचे तपशीलांकडे बारीक लक्ष असायचे. त्यांनी अहवालासाठी ' कॅम्ब्रिया फॉन्ट' वापरण्याचा निर्णय घेतला, तो क्षण मला आठवतो. त्या म्हणाल्या की मी हे पाहिलं की वाचायला सोपं काय जातं आणि चांगलं पण दिसतं असे, वेगवेगळे पर्याय वापरून ते बघून मी या फॉन्टची निवड माझ्यासाठी केली. आता माझ्यासाठी पण हाच फॉन्ट ...असं श्यामलाताई लिहितात. शशीताईंना कोणत्याही प्रकारचा अव्यवस्थितपणा, ढिसाळपणा किंवा उशीर चालत नसे. त्यांनी जी अपेक्षा दुसऱ्यांकडून केली, त्यांनी तोच उच्च दर्जा स्वतःसाठी ठेवला.

 जर कोणी म्हणाले 'मी या कामासाठी माझे १००% दिले' तर त्या त्यांना त्या प्रश्न करीत- 'तुम्हाला जे साध्य करायचे होते, ते झाले का ? काही कमतरता राहिली असल्यास ती भरून काढण्यासाठी पर्यायी मार्ग शोधले का ?'

 कोणाच्याही बाबतीत निर्णय घेताना त्या शिक्षण, उत्पन्न, नोकरी, लिंग ह्याच्या आधारे घेत नसत. सचोटी/इमानदारी, पारदर्शकता आणि उत्तरदायित्व ह्या त्यांच्या व्यक्तीच्या मोजमाप करण्याच्या कसोट्या असत.

 श्यामलाताई म्हणतात की 'मी' स्वतःला फार इमानदार समजत होते. त्यांनी मला दाखवून दिले की, कार्यक्षमतेचा अभाव, वेळेचा अपव्यय, आणि वाजवीपेक्षा जास्त खर्च सहन करणे हे सुद्धा सचोटीला मारक आहे. शशीताई स्वतः संबंधित पूर्ण माहिती द्यायच्या. कधीकधी इतकी माहिती त्या देत असत की आपल्याला आश्चर्य वाटे आणि तसंच रडू पण यायचे. त्यांनी स्वत:ची शक्तीस्थानं कधीही लपवली नाहीत, तसंच स्वतःच्या खोलवर रुजलेल्या असुरक्षिततेची भावनाही दडवली नाही. त्यांच्या कामातून त्या जे शिकत ते त्या नेहमीच सांगत, कधी सांगितलं नाही असं होत नसे. पण त्यांनी कधीच शिकवण्याचा प्रयत्न केला नाही."

 एकदा त्यांच्या हॉटेलच्या खोलीत अपरात्री अचानक एक अनोळखी व्यक्ती

२५
'चैतन्य'चे प्रेरणादायी व्यक्तिमत्त्व - शशीताई राजगोपालन