पान:'चैतन्य'चे प्रेरणादायी व्यक्तिमत्त्व शशीताई राजगोपालन (Shashitai Rajgopalan).pdf/24

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

त्या कोणाच्या मताशी असहमत असत, तेव्हा त्यांच्या चेहऱ्यावर काही वेगळेच खट्याळ भाव असायचे.

 एखाद्याने स्वत:वर जास्त खर्च करू नये असे त्यांचे ठाम मत होते. याच कारणाने शेवटी त्यांनी स्वत:च्या आजारपणावर खर्चिक उपचार नाकारले. त्या निसगोर्पचाराकडे वळल्या. त्या कोणावर दबावही टाकायच्या नाहीत. 'मोठमोठ्या पदावर सदस्य असलेली इतकी मोठी व्यक्ती सहजपणे सगळयांबरोबर वावरत होती. 'डाऊन टू अर्थ', जमिनीवर पाय असणे म्हणजे काय हे त्यांच्याकडे पाहून कळत असे.'

परिणामकारकता

 शशीताईंसोबत सोबत श्यामलाताईनी काम केले. त्या लिहितात- “पहिल्या आठवड्यात असं ठरलं की आपण तीन वर्ष संस्थात्मक व्यवस्था आणि प्रक्रिया मजबूत करता येईल असं काम करावं. प्रत्येकानं एकमेकांवर विश्वास ठेवावा. त्यातून परस्परावलंबन होतं. स्वत:च्या भूमिकांबद्दल जागरूकता आणि उत्साहपूर्ण सौहार्दपूर्ण भावना, एकत्रित काम करण्यास आवश्यक असतात. आम्ही छान प्रवास केला. या प्रवासात खुली चर्चा, खुले वादविवाद आणि आपल्या मुद्यांवर टीका सहन करण्याची तयारी आवश्यक होती. एकदा स्पष्टता आल्यावर प्रत्येकाची बांधिलकी असायची आणि प्रत्येकजण आपली जबाबदारी पार पाडायचे. त्यामुळे वेगवेगळी मतं एकत्र करून समान, आनंददायी कृतीकडे वाटचाल झाली."

उत्तरदायित्व

 साऊथ इंडिया एड्स एक्शन प्रोग्राम (एस.आय.ए.ए.पी) च्या कार्यकर्त्यांसाठी शशीताई कडक शिस्तीच्या मास्तर होत्या. जे ठरवलं आहे ते झालंच पाहिजे, असं त्यांचं ठाम मत होतं. त्यामुळे उत्तरदायित्व वाढतं असं त्या म्हणायच्या.

 प्रत्येक कार्यकर्त्यासाठी एका कामाला किती वेळ, किती तास लागतील हे त्या ठरवायला सांगत आणि टीम मेंबर्ससोबत चर्चा करून वेळ कमी किंवा जास्त करायला सांगत. त्या खात्री करून घेत की ही चर्चा खुली असावी आणि पुराव्यानिशी मांडणी व्हावी. त्यांनी आणखी एक महत्त्वाची गोष्ट त्यांनी सांगितली आणि ती म्हणजे मासिक बैठकीमध्ये उपक्रम, तिची आर्थिक बाजू आणि साध्य झालेला उद्देश पाहिले जावे.

२४
'चैतन्य'चे प्रेरणादायी व्यक्तिमत्त्व - शशीताई राजगोपालन