पान:'चैतन्य'चे प्रेरणादायी व्यक्तिमत्त्व शशीताई राजगोपालन (Shashitai Rajgopalan).pdf/19

विकिस्रोत कडून
Jump to navigation Jump to search
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

नेहमी पुढाकार असे.”

 अभ्यास दौऱ्यांद्वारे व्यक्तींचे कौशल्य आणि क्षमता वाढवता येतात, असा शशीताईंचा विश्वास होता. एकदा त्यांनी मकादापुरम, ध्यानसंगमला भेट दिली. या भेटीत त्यांच्या प्रभावी व्यक्तिमत्त्वाने आणि वक्तृत्वाने मी मोहित झाले. या कालावधीत सहविकास म्हणजेच, CDF ने आम्हाला गुजरात येथील सेवा संस्थेला भेट देण्याची संधी दिली. या सर्व घटनेचा माझ्यावर अत्यंत सकारात्मक परिणाम झाला.

राजकारणापासून अलिप्त

 शशीताई राजकारणापासून नेहमी अलिप्त असायच्या. त्या नेहमी म्हणत, की राजकारणाशी कमीत कमी संपर्क असावा. नाही तर गटाच्या एकजुटीवर नकारात्मक परिणाम होतील. पंचायत निवडणुकीच्या वेळी मला निवडणुकीला उभे राहायला सांगितले होते आणि मी ते नाकारले हे त्यावेळी शशीताईंना कळाल्यावर त्यांनी माझे कौतुक केले.

नेतृत्वाची दुसरी फळी

 शशीताईंचा विश्वास होता की, कोणत्याही संस्थेमध्ये नेतृत्वाची दुसरी फळी तयार करणे महत्त्वाचे असते. त्यामुळे संस्था चिरकाल टिकतात. सहकार्याने चांगले निर्णय घेतले जातात. त्यांचा आग्रह असे की प्रत्येक माहिती प्रत्येक सभासदांपर्यंत पोहचली पाहिजे.

 शशीताईंनी सीडीएफ सोडल्यानंतर रिझर्व्ह बँक ऑफ इंडियामध्ये संचालकपद स्वीकारले. त्यानंतरही त्यांनी सीडीएफला भेट दिली. या भेटीदरम्यान त्यांनी सांगितले की कौशल्य फक्त तुम्हाला माहीत असून चालणार नाही. जेव्हा पदाधिकारी आणि सभासदांनाही ते शिकविले जाते तेव्हा त्याचे मोल वाढते.

 तसेच त्यांनी मला सांगितले की, विविध मुद्यांवरचे ज्ञान पदाधिकाऱ्यापर्यंत

१९
'चैतन्य'चे प्रेरणादायी व्यक्तिमत्त्व - शशीताई राजगोपालन