पान:'चैतन्य'चे प्रेरणादायी व्यक्तिमत्त्व शशीताई राजगोपालन (Shashitai Rajgopalan).pdf/16

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

 अ. सहकार कायद्यात बदल घडवून आणणे.

 ब. सहकार क्षेत्रातील अवित्तीय व्यवसाय वाढीसाठीच्या फिरत्या निधीचे व्यवस्थापन.

 क. नवीन प्रकारच्या सहकारी संस्थांचे आरेखन आणि रचना विकसित करणे.'

 हा फिरता निधी सी.डी.एफ.ने उत्पादक सोसायटींना शेती उत्पादन, विक्री व्यवस्थापन विकिसित करण्यासाठी उपलब्ध करून दिला. त्याच्यावर मिळणाऱ्या व्याजामुळे सी.डी.एफ.चे ७५% खर्च निघत. हा फिरता निधी उत्पादन विक्री व्यवस्था वाढवण्यासाठी आणि नवीन प्रयोग करण्यासाठी वापरला जायचा. शशीताईंनी संचालिका म्हणून जेव्हा सी.डी.एफ.सोडले तेव्हा ३२,००० महिला, १०६ प्राथमिक सहकारी संस्था व सहा संघ संलग्न होत्या. तसेच १९,००० पुरुष, ६५ प्रायमरी सहकारी सोसायटी, पाच संघ संलग्न होत्या. सर्व संस्था, आर्थिकदृष्टया आणि व्यवसाय कौशल्याच्या दृष्टीने पूर्ण स्वावलंबी आणि सक्षम होत्या.

 सध्या देशभरात दीनदयाळ अंत्योदय योजना राष्ट्रीय ग्रामीण उपजीविका अभियान, (DAY-NRLM) दीनदयाळ अंत्योदय योजना राष्ट्रीय शहरी उपजीविका अभियान (DAY-NULM) अंतर्गत विकसित होणाऱ्या सर्व संघांनी हा मुद्दा लक्षात घेण्यासारखा आहे.

१६
'चैतन्य'चे प्रेरणादायी व्यक्तिमत्त्व - शशीताई राजगोपालन