नच सुंदरि करूं कोपा

विकिस्रोत कडून
Jump to navigation Jump to search

<poem>

नच सुंदरि करूं कोपा । मजवरि धरिं अनुकंपा । रागानें तव तनु ही पावत कशि कंपा ॥

नारी मज बहु असती । परि प्रीती तुजवरती । जाणसि हें तूं चित्तीं । मग कां ही अशि रीती । करिं मी कोठें वसती । तरि तव मूर्ती दिसती । प्रेमा तो मजवरिचा नेऊं नको लोपा ॥

करपाशीं या तनुला । बांधुनि करि शिक्षेला । धरुनीयां केशांला । दंतव्रण करि गाला । कुचभल्ली वक्षाला । टोंचुनि दुखवीं मजला । हचि दंड योग्य असे सखये मत्पापा ॥

<poem>

PD-icon.svg हे साहित्य भारतात तयार झालेले असून ते आता प्रताधिकार मुक्त झाले आहे. भारतीय प्रताधिकार कायदा १९५७ नुसार भारतीय साहित्यिकाच्या मृत्युनंतर ६० वर्षांनी त्याचे साहित्य प्रताधिकारमुक्त होते. त्यानुसार १ जानेवारी १९५६ पूर्वीचे अशा लेखकांचे सर्व साहित्य प्रताधिकारमुक्त होते. Flag of India.svg