दत्त करुणा पंचपदी

विकिस्रोत कडून
Jump to navigation Jump to search

[[१]][संपादन]

!! श्री गुरुदेव दत्त !!=[संपादन]

प.पु.श्री छन्नूभाई महाराज[संपादन]
श्री योगानंद महाराज संस्थान गुंज (खु) ता.पाथरी जि.परभणी[संपादन]
यांच्या प्रेरणेने व आशीर्वादाने हि दत्तात्रय पंचपदीची सी.डी सर्व[संपादन]
दत्त भक्ताकडून भगवान दत्तात्रयास सादर समर्पित[संपादन]
!! जय गुरुदेव दत्त !![संपादन]

|| श्री गुरुदेव दत्त ||[संपादन]

करुणा पंचपदी[संपादन]

पद १[संपादन]

उध्दरिं गुरुराया । अनसूया तनया दत्तात्रेया ॥ धृ. ॥

जो अनसूयेच्या भावाला । भुलुनियां तत्सुत झाला । दत्तात्रेय अशा नामाला । मिरवी वंद्य सुराला । तो तूं मुनिवर्या । निजपाया स्मरता वारिसी माया ॥ १ ॥

जो माहूर पुरी शयन करी । सह्याद्रीचे शिखरी निवसें गंगेचे स्नान करी भिक्षा कोल्हापूरी । स्मरता दर्शन दे वारि भया । तो तू आगमगेया ॥ २ ॥

तो तूं वांझेसी सुत देसी । सौभाग्या वाढविसी । मरता प्रेतासी जीवविसी । सद्वरदाना देसी । यास्तव वासुदेव तव पाया । धरी त्या तारीं सदया ॥ ३ ॥ उध्दरिं गुरुराया । अनसूया तनया दत्तात्रेया ॥ धृ. ॥

|| श्री गुरुदेव दत्त ||[संपादन]

करुणा पंचपदी[संपादन]

पद 2[संपादन]

शांत हो श्रीगुरुदत्ता | ममचित्ता शमवी आतां ||धृ|| तू केवल माता जनिता | सर्वथा तू हितकर्ता | तू आप्त स्वजन भ्राता | सर्वथा तूची त्राता | भयकर्ता तू भयहर्ता | दंड धरिता तू परिपाता | तुज वाचुनी न दूजी वार्ता | तू आर्ता आश्रय दत्ता | मम चित्ता शमवी आता | शांत हो श्रीगुरुदत्ता ||धृ||

अपराधास्तव गुरुनाथा | जरी दंडा धरिसी यथार्था | तरी आम्ही गाऊनि गाथा | तवा चरणी नमवू माथा || तू तथापि दंडिशी देवा | कोणाचा मग करू धावा | सोडाविता दुसरा तेंव्हा | कोण दत्ता आह्मा त्राता | मम चित्ता शमवी आता | शांत हो श्रीगुरुदत्ता ||धृ||

तूं नटसा होवूनी कोपी | दंडिताही आम्हां पापी | पुनारापिही चुकतां तथापि | आम्हावरी नच संतापी || गच्छ्त:स्खलनं क्वापी | असे मानुनी नच हो कोपी | मम चित्ता शमवी आता | शांत हो श्रीगुरुदत्ता ||धृ||

तवं पदरी असता ताता | आड़मार्गी पाउलं पड़ता | सांभाळूनी मार्ग वरिता | आणिता न दुजा त्राता || निज बिरुदा आणुनि चित्ता | तू पतित पवन दत्ता | वळे आतां आम्हां वरतां | करुणा घन तूं गुरुनाथा || मम चित्ता शमवी आता | शांत हो श्रीगुरुदत्ता ||धृ||

सहकुटूंब सहपरिवार | दास आम्ही हे घरदार| तवपदी अर्पू असार | संसाराहित हा भार | परि हरिसी करुणा सिन्धो | तूं दिनानाथ सुबंधो | आम्हा अघलेश न बाधो | वासुदेव प्रार्थीत दत्ता || मम चित्ता शमवी आता | शांत हो श्रीगुरुदत्ता ||धृ||

|| श्री गुरुदेव दत्त ||[संपादन]

करुणा पंचपदी[संपादन]

पद 3[संपादन]

श्री गुरुदत्ता जय भगवन्ता |ते मन निष्ठुर न करी आतां ||धृ||

चोरे द्विजासी मारिता मन जे | कळवळले ते कळवळो आतां । श्री गुरुदत्ता ॥१॥ पोटशुळाने द्विज तडफडता | कळवळले ते कळवळो आतां । श्री गुरुदत्ता ॥२॥ द्विजसुत मरतां वळले ते मन | हो की उदासीन न वळे आतां । श्री गुरुदत्ता ॥३॥ सतिपति मरतां काकुळती येतां |वळले ते मन न वळे की आतां| श्री गुरुदत्ता ॥४॥ श्री गुरुदत्ता त्यजि निष्ठुरता | कोमलचित्ता वळवी आतां । श्री गुरुदत्ता ॥५॥

श्री गुरुदत्ता जय भगवन्ता |ते मन निष्ठुर न करी आतां ||धृ||


|| श्री गुरुदेव दत्त ||[संपादन]

करुणा पंचपदी[संपादन]

पद 4[संपादन]

जय करुणाघन निज जनजीवन अनसूयानंदन पाहि जनार्दन||धृ||

निज अपराधे उफराटी दृष्टि होऊनि पोटी भय धरु पावन । जय करुणाघन ॥१॥ तूं करुणाकर कधी आम्हांवर रुससि न किंकर वरद कृपाघन । जय करुणाघन ॥२॥ वारी अपराध तूं मायबाप तव मनी कोप लेश न वामन । जय करुणाघन ॥३॥ बालक अपराधा गणे जरी माता तरी कोण त्राता देईल जीवन । जय करुणाघन ॥४॥ प्रार्थी वासुदेव पदी ठेवी भाव पदी देवो ठाव देव अत्रिनंदन । जय करुणाघन ॥५॥ जय करुणाघन निज जनजीवन अनसूयानंदन पाहि जनार्दन||धृ||


|| श्री गुरुदेव दत्त ||[संपादन]

करुणा पंचपदी[संपादन]

पद 5[संपादन]

आठविं चित्ता तूं गुरुदत्ता । जो भवसागर पतितां त्रातां ||धृ|| आहे जयाचें कोमल हृदय । सदयिचा हा भव हरि वरदाता ॥ १ ॥

पाप पदोपदिं होई जरी तरी । स्मरतां तारीं भाविकपाता ॥ २ ॥

संकट येतां जो निज अंतरी । चित्ती तया शिरी कर धरीं त्राता ॥३॥

जो निज जिवींचे हितगूज साचें । ध्यान योगियाचे तो हा ध्याता ॥४॥

सज्जन जीवन अनसुयानंदन । वासुदेव ध्यान हा यतिभर्ता ॥५॥