तुकाराम गाथा/ गाथा पारायणाचे प्रारंभी म्हणावयाचे मंगल

विकिस्रोत कडून
Jump to navigation Jump to search

(श्री निळोबारायाकृत)[संपादन]

गाथा पारायणाचे प्रारंभी म्हणावयाचे मंगल[संपादन]

नमो सदगुरु तुकया ज्ञानदीपा ! नमो सदगुरु सच्चिदानंद रूपा ! नमो सदगुरु भक्तकल्याणमूर्ती ! नमो सदगुरु भास्करा पूर्ण कीर्ति !!1!! मनुष्याकृती राघवे ख्याति केली ! शिळा शिखरे सागरी तारियेली ! तुका स्वामी हा पूर्ण ब्रह्मप्रकाशी ! जळी रक्षिले निर्जिवा कागदासी !!2!! महाराज हा जन्मला मृत्यूलोकी ! दुजी उपमा नाढळे ईहलोकी !! भवसिंधूसीं बंधिला सेतू जेणें ! अनाथा दीनाकारणे तुकयानें !!3!! तुका भासला मानवी वेषधारी ! परे हा लिलाविग्रही निर्विकारी !! स्वयें श्रीहरी व्यापकु सर्वजीवा ! तुका तोचि तो हा परब्रह्म ठेवा !!4!! जयां पूजिले आदरें पांडुरंगे ! विमानस्थ केले प्रयाण प्रसंगे !! तनु मानवी दिव्यरूपीच केली ! न त्यागी तिये दिव्य लोकासी नेली !!5!!