चर्चा:काय शिवाजी नॅशनल हिरो नाहीत ?

विकिस्रोत कडून
Jump to navigation Jump to search  • सध्या अनुवादाचे दोन प्रयत्न केले आहेत आपण तीसरा प्रयत्नही या चर्चा पानावर जोडू शकता.

अनुवाद प्रयत्न १[संपादन]

अनुवाद प्रयत्न १ (वाक्यगटानुसार)[संपादन]

(ता.क.-भाषांतराच्या व ते तपासण्याच्या सोयीसाठी, मूळ उतारा हा जागोजागी तोडण्यात आला आहे.नेहमीप्रमाणेच, मुद्रीत शोधन अनुवाद आणि शुद्धलेखन सुधारणा बाबत आपल्या अमुल्य साहाय्याची प्रार्थना आहे. )


मराठी अनुवाद मूळ इंग्लिश वाक्यगट क्र.


काय शिवाजी राष्ट्रीय आदर्श वीरपुरुष नाहीत??

मानवी स्वभावात आदर्श वीरपुरुषांची पूजा ही खोलवर रुजली आहे; आणि आपल्या मनास प्रेरणा देऊ शकेल अशा स्वदेशी आदर्श वीरपुरुषाच्या पूजेची, आपल्या राजकीय आकांक्षेस पूर्ण ताकद देण्याकरिता गरज आहे.

या कारणासाठी, शिवाजी हे भारताच्या इतिहासातील एकमेव आदर्श वीरपुरुष आहेत.

अनागोंदी कारभारापासून संपूर्ण राष्ट्रास सुटका पाहिजे होती, अशा काळात त्यांचा जन्म झाला होता; त्यांच्या आत्मबलीदानाने व धैर्याने त्यांनी जगास सिद्ध करून दाखविले की, भारत हा दुर्भाग्यशाली देश नव्हता (भाग्यवान देश होता).

हे खरे आहे, की मुसलमान व हिंदू तेव्हा विभागलेले होते.आणि शिवाजी मुसलमानांच्या धार्मिक विकल्पांचा आदर करीत असत, तरीपण लोकांना असह्य झालेल्या अश्या मुगल राज्यशासनाविरुद्ध लढावे लागले होते.

पण ' आजच्या काळात (जेव्हा) मुसलमान व हिंदू समान कायदे व नियमांनी बांधलेले आहेत आणि त्यांची पूर्वी त्यांचेपाशी असणारी ताकद समान रितीने छाटल्या गेली आहे, (तेव्हा), त्याचे काळात, जो त्याचेवेळच्या जुलूमशाही विरुद्ध धिटाईने उभा झाला, त्याला त्यांनी आदर्श वीरपुरुष म्हणून स्वीकारू नये, असा याचा अर्थ असा होत नाही.

शिवाजींनी अंगिकारलेल्या पद्धती सध्याच्या पिढीनेही अंगिकाराव्यात असा उपदेशही केला जात नाही आणि तशी अपेक्षाही अजिबात केली जात नाही.

आंग्ल -भारतीय लेखकांनी या संबंधी केलेला आरोप हा त्यांच्या बुद्धीचा कल्पनाविलास आहे व तो आमच्यात असणाऱ्या भित्र्यांना घाबरविण्यासाठी पुढे केला जातो आहे.

शिवाजीच्या जीवनातला प्रत्येक प्रसंग हा आजच्या काळात कोणीही जसाच्या तसा नकलवावा, असे कधी कोणास स्वप्नातही वाटत नाही.

ती प्रेरणा, ज्या प्रेरणेने शिवाजीस त्याच्या कार्यास उद्युक्त केले, पुढील पिढीने सतत नजरेसमोर ठेवण्यास योग्य आदर्श म्हणून, त्या प्रेरणेसच पुढे केल्या जाते.

कोणताही चुकीचा अन्वयार्थ या प्रश्नाबद्दलचा आमचा हा दृष्टिकोन आमच्या दृष्टीआड करण्यास सफल होणार नाही; आणि आम्हांस खात्री आहे आणि आम्ही यावर विश्वास ठेवतो की आमचे मुसलमान बांधव अश्या प्रकारच्या लबाड काव्यांनी दिशाभ्रमित होणार नाहीत.

इंग्लंडमध्ये नेल्सनला किंवा फ्रांसमध्ये महान नेपोलियनला पूज्य मानण्यास, (किंवा ततसंबंधी) असे राष्ट्रीय महोत्सव उभय देशांमधील, एका देशाचे दुसऱ्यासोबत असणारे सहानुभूतीचे संबंध दुरावण्यास कारणीभूत ठरतील किंवा भविष्यात, दोन्ही देशांत परस्पर सौहार्दपूर्ण संबंध राखणे अशक्य होईल या आधारावर आंग्ल भारतीय लेखक हरकत घेतील, असे आम्हांस वाटत नाही.

आणि तरीही, आम्ही आता, त्यांच्या डावपेचातील (तथाकथित) 'संपूर्णसत्याच्या' शब्दांना, पुरेसे अंगवळणी पडलो आहोत, ह्या वस्तुस्थितीचे भानही न ठेवता, आम्हांस आंग्ल-भारतीय टीकाकारांतर्फे, आश्रयदात्यासारख्या भाषेत, तोचतो सल्ला उगाळला जातो.

शिवाजी महोत्सव हा मुसलमानांना दूर करण्यास किंवा चिडविण्यासाठी साजरा केला जात नाही.

काळ बदलला आहे व वर सांगितल्या प्रमाणे, जनतेची राजकीय परिस्थिती लक्षात घेता, मुसलमान व हिंदू हे एकाच नावेतील प्रवासी आहेत किंवा एकाच मंचावर आहेत.


या परिस्थितीत आपण दोघेही शिवाजीच्या जीवनापासून काही प्रेरणा घेऊ शकत नाही काय? हाच मुद्दातील खरा प्रश्न आहे; व जर याचे 'होय' उत्तर दिल्या गेले तर 'शिवाजी हा महाराष्ट्रात जन्मला' ही दुय्यम बाब होते.


या प्रश्नाचा हा आयाम हा बंगालमधील 'पत्रिका' व 'बंगाली' या आघाडीच्या भारतीय वर्तमानपत्रांनी समजून स्पष्टपणे व्यक्त केला आहे; आणि आंग्लो-भारतीय लेखकांची सर्पबुद्धी त्यांच्या 'अभिप्रेत श्रोत्यां'कडून' डोळे झाकून स्वीकारली जाण्याची शक्यता कमीच आहे.


आम्ही अकबरासाठी किंवा जुन्या भारतीय इतिहासातील एखाद्या वीरपुरुषासाठी एखादा महोत्सव सुरू करण्याच्या विरुद्ध नाही.

अश्या महोत्सवांना त्यांचे स्वतःचे वेगळे मूल्य असेल; परंतु, शिवाजीस त्याचे स्वतःचे देशात वैशिष्ट्यपूर्ण मूल्यं आहे, व प्रत्येकाचे हे कर्तव्य आहे की या महोत्सवाची लक्षणे ही दुर्लक्षिल्या किंवा गैर-प्रकारे प्रदर्शित केल्या जाणार नाहीत.

कोणताही महानायक, तो भारतीय असो की युरोपियन, त्याचे कालानुसार कार्य करतो; व म्हणून आम्ही त्यांची वैयक्तिक कृत्ये त्या त्या काळाच्या मागणीनुसार पारखावयास हवीत.

जर हे तत्त्व मान्य केले तर, शिवाजीच्या जीवनात आम्हाला असे काहीही सापडणार नाही ज्यावर कोणीही आक्षेप घेऊ शकेल.

वर उल्लेखिल्याप्रमाणे, आम्हांस इतक्या दूर जायचे नाही.

शिवाजी सध्याचा राष्ट्रीय वीरपुरुष होण्याचे कारण हे आहे की, ती भावना जीने त्यास संपूर्णतया प्रेरित ठेवले न की त्याचे कार्य.


त्याचे जीवन स्पष्टपणे दाखविते की भारतीय वंशाचे लोक आपली ही विरता सहजासहजी सोडत नाहीत, जी त्यांना कठीण प्रसंगी सक्षम नायक देते.

या महान मराठा नायकाच्या इतिहासापासून मुसलमान व हिंदूंनी हा धडा घ्यावयास हवा; शिवाजी महोत्सव हा त्याच कारणांवर भर देण्यासाठी आहे.


शिवाजीची पूजा ही, मुसलमान किंवा सरकारसोबत लढाईस उद्युक्त करते असे वाटणे हे निव्वळ गैर-प्रातिनिधिक आहे.


शिवाजी महाराष्ट्रात जन्मल्या वेळीची राष्ट्राची राजकीय परिस्थिती अनुसरून, ती त्यावेळीची कृती होती.


परंतु, भविष्यातील नायक, कोण जाणे, भारतात कोठेही जन्मू शकतो अगदी एक मुस्लिम सुद्धा असू शकेल.

ही त्या प्रश्नाकडे पाहण्याची योग्य दृष्टी आहे व आम्हांस वाटत नाही की आंग्लो-भारतीय लेखक त्यापासून आमचे लक्ष दुसरीकडे वळविण्यास सफल होतील.

- बाळ गंगाधर टिळक

(दि.२४ जून १९०६ रोजी दैनिक मराठात प्रकाशित लेख)


Is Shivaji not a national hero??

Hero worship is a feeling deeply implanted in human nature ; and our political aspirations need all the strength which the worship of swadeshi hero is likely to inspire our minds.

For this purpose Shivaji is the only hero found in Indian history.

He was born at a time when the whole nation required relief from misrule; and by his self sacrifice and courage he proved to the world that India was not a country forsaken by providence.

It is true that Mohamedans and Hindus were then divided ; and Shivaji who respected religious scruples of the Mohamedans , had to fight against the Mogal rule that had become unbearable to the people.

But it does not follow from this that, 'now that the Mohamedans and Hindus are equally shorn of the power once they possessed and are governed by the same laws and rules , they should not agree to accept him as a hero who in his own days took a bold stand against the tyranny of his time.

It is not preached nor is it to be at all expected that the methods adapted by Shivaji should be adapted by the present generation.

The charge brought by the Anglo-Indian writers in this connection is a fiction of their brain and is put forward simply to frighten away the timid amongst us.

No one ever dreams that every incident in Shivaji’s life is o be copied by any one at present.


It is the spirit which actuated Shivaji in his doings that is held forth as the proper ideal to be kept constantly in view by the raising generations.

No amount of misinterpretation can succeed in shutting this view of the question from our vision ; and we hope and trust that our Mohamedan friends will not be misled by such wily methods.


We do not think that the Anglo Indian writers will object to England worshipping Nelson or France worshipping great Nepolean on the ground that such national festivals will alienate the sympathies of either nation from the other or would make the existence of amicable relations between two nations an impossibility in future.

And yet the same advice is administered to us in a patronizing tone by this Anglo Indian critics , being unmindful of the fact that we have now become sufficiently acquainted with their tactics to take their word for gospel truth.

The Shivaji festival is not celebrated to alienate or even irritate the Mohamedans.

Time has changed and as observed above the Mohamedans and Hindus stand in the same boat or on same platform so far as political condition of the people is concerned.

Can we not both of us derive some inspiration from the life of Shivaji under these circumstances ? That is the real question at issue ; and if this can be answered in the affirmative it matters little that Shivaji was born in Maharashtra.

This aspect of the question has been clearly perceived and exclaimed by the leading Indian papers in Bangal such as Patrika and Bengalee ; and there is little chance of the serpentine wisdom of the Anglo Indian writers being blindly accepted by the parties for whom it is meant.

We are not against a festival being started in honor of Akbar or any other hero from old Indian History .


Such festivals will have their own worth ; but that of Shivaji has a peculiar value of its own country , and it is the duty of every one to see that this characteristics of the festival is not ignored or misrepresented .

Every hero be he Indian or European , acts according to the spirit of his times ; and we must therefore judge of his individual acts by the prevalent in his time.

If this principle be accepted we can find nothing in Shivaji’s life to which one can take exception.

But as stated above we need not go so far.

What makes Shivaji a national hero for the present is the spirit which actuated him throughout and not his deeds as such.

His life clearly shows that Indian races do not so soon lose the vitality which gives them able leaders at critical times.

That is the lesson which the Mohamedans and the Hindus have to learn from the history of the great Maratha Chief ; and the Shivaji festival is intended to emphasise the same lesson.

It is the sheer misrepresentation to suppose that the worship of Shivaji includes invocation to fight either with the Mohamedans or with the Government.

It was only in conformity worth the political circumstances of the country at the time Shivaji was born in Maharashtra.

But a future leader may born anywhere in India who knows even may be a Mohamedan.

That is the right view of the question and we do not think that the Anglo Indian writers can succeed in diverting our attention from it.

Lokamanya Tilak

(Article published in The Maratta , 24th June, 1906)

१०११

१२१३

१४


१५
१६

१७


१८१९
२०२१


२२

२३२४२५
२६२७२८


२९३०

३१


अनुवाद प्रयत्न १ (वाक्यगटांचे एकीकृत स्वरूप)[संपादन]

काय शिवाजी राष्ट्रीय आदर्श वीरपुरुष नाहीत??

मानवी स्वभावात आदर्श वीरपुरुषांची पूजा ही खोलवर रुजली आहे; आणि आपल्या मनास प्रेरणा देऊ शकेल अशा स्वदेशी आदर्श वीरपुरुषाच्या पूजेची, आपल्या राजकीय आकांक्षेस पूर्ण ताकद देण्याकरिता गरज आहे. या कारणासाठी, शिवाजी हे भारताच्या इतिहासातील एकमेव आदर्श वीरपुरुष आहेत. अनागोंदी कारभारापासून संपूर्ण राष्ट्रास सुटका पाहिजे होती, अशा काळात त्यांचा जन्म झाला होता; त्यांच्या आत्मबलीदानाने व धैर्याने त्यांनी जगास सिद्ध करून दाखविले की, भारत हा दुर्भाग्यशाली देश नव्हता (भाग्यवान देश होता). हे खरे आहे, की मुसलमान व हिंदू तेव्हा विभागलेले होते. आणि शिवाजी मुसलमानांच्या धार्मिक विकल्पांचा आदर करीत असत, तरीपण लोकांना असह्य झालेल्या अश्या मुगल राज्यशासनाविरुद्ध लढावे लागले होते. पण ' आजच्या काळात (जेव्हा) मुसलमान व हिंदू समान कायदे व नियमांनी बांधलेले आहेत आणि त्यांची पूर्वी त्यांचेपाशी असणारी ताकद समान रितीने छाटल्या गेली आहे, (तेव्हा), त्याचे काळात, जो त्याचेवेळच्या जुलूमशाही विरुद्ध धिटाईने उभा झाला, त्याला त्यांनी आदर्श वीरपुरुष म्हणून स्वीकारू नये, असा याचा अर्थ असा होत नाही. शिवाजींनी अंगिकारलेल्या पद्धती सध्याच्या पिढीनेही अंगिकाराव्यात असा उपदेशही केला जात नाही आणि तशी अपेक्षाही अजिबात केली जात नाही.

आंग्ल -भारतीय लेखकांनी या संबंधी केलेला आरोप हा त्यांच्या बुद्धीचा कल्पनाविलास आहे व तो आमच्यात असणाऱ्या भित्र्यांना घाबरविण्यासाठी पुढे केला जातो आहे. शिवाजीच्या जीवनातला प्रत्येक प्रसंग हा आजच्या काळात कोणीही जसाच्या तसा नकलवावा, असे कधी कोणास स्वप्नातही वाटत नाही. ती प्रेरणा, ज्या प्रेरणेने शिवाजीस त्याच्या कार्यास उद्युक्त केले, पुढील पिढीने सतत नजरेसमोर ठेवण्यास योग्य आदर्श म्हणून, त्या प्रेरणेसच पुढे केल्या जाते. कोणताही चुकीचा अन्वयार्थ या प्रश्नाबद्दलचा आमचा हा दृष्टिकोन आमच्या दृष्टीआड करण्यास सफल होणार नाही; आणि आम्हांस खात्री आहे आणि आम्ही यावर विश्वास ठेवतो की आमचे मुसलमान बांधव अश्या प्रकारच्या लबाड काव्यांनी दिशाभ्रमित होणार नाहीत.


इंग्लंडमध्ये नेल्सनला किंवा फ्रांसमध्ये महान नेपोलियनला पूज्य मानण्यास, (किंवा ततसंबंधी) असे राष्ट्रीय महोत्सव उभय देशांमधील, एका देशाचे दुसऱ्यासोबत असणारे सहानुभूतीचे संबंध दुरावण्यास कारणीभूत ठरतील किंवा भविष्यात, दोन्ही देशांत परस्पर सौहार्दपूर्ण संबंध राखणे अशक्य होईल या आधारावर आंग्ल भारतीय लेखक हरकत घेतील, असे आम्हांस वाटत नाही. आणि तरीही, आम्ही आता, त्यांच्या डावपेचातील (तथाकथित) 'संपूर्णसत्याच्या' शब्दांना, पुरेसे अंगवळणी पडलो आहोत, ह्या वस्तुस्थितीचे भानही न ठेवता, आम्हांस आंग्ल-भारतीय टीकाकारांतर्फे, आश्रयदात्यासारख्या भाषेत, तोचतो सल्ला उगाळला जातो. शिवाजी महोत्सव हा मुसलमानांना दूर करण्यास किंवा चिडविण्यासाठी साजरा केला जात नाही. काळ बदलला आहे व वर सांगितल्या प्रमाणे, जनतेची राजकीय परिस्थिती लक्षात घेता, मुसलमान व हिंदू हे एकाच नावेतील प्रवासी आहेत किंवा एकाच मंचावर आहेत. या परिस्थितीत आपण दोघेही शिवाजीच्या जीवनापासून काही प्रेरणा घेऊ शकत नाही काय? हाच मुद्दातील खरा प्रश्न आहे; व जर याचे 'होय' उत्तर दिल्या गेले तर 'शिवाजी हा महाराष्ट्रात जन्मला' ही दुय्यम बाब होते.


या प्रश्नाचा हा आयाम हा बंगालमधील 'पत्रिका' व 'बंगाली' या आघाडीच्या भारतीय वर्तमानपत्रांनी समजून स्पष्टपणे व्यक्त केला आहे; आणि आंग्लो-भारतीय लेखकांची सर्पबुद्धी त्यांच्या 'अभिप्रेत श्रोत्यां'कडून' डोळे झाकून स्वीकारली जाण्याची शक्यता कमीच आहे. आम्ही अकबरासाठी किंवा जुन्या भारतीय इतिहासातील एखाद्या वीरपुरुषासाठी एखादा महोत्सव सुरू करण्याच्या विरुद्ध नाही. अश्या महोत्सवांना त्यांचे स्वतःचे वेगळे मूल्य असेल; परंतु, शिवाजीस त्याचे स्वतःचे देशात वैशिष्ट्यपूर्ण मूल्यं आहे, व प्रत्येकाचे हे कर्तव्य आहे की या महोत्सवाची लक्षणे ही दुर्लक्षिल्या किंवा गैर-प्रकारे प्रदर्शित केल्या जाणार नाहीत.

कोणताही महानायक, तो भारतीय असो की युरोपियन, त्याचे कालानुसार कार्य करतो; व म्हणून आम्ही त्यांची वैयक्तिक कृत्ये त्या त्या काळाच्या मागणीनुसार पारखावयास हवीत. जर हे तत्त्व मान्य केले तर, शिवाजीच्या जीवनात आम्हाला असे काहीही सापडणार नाही ज्यावर कोणीही आक्षेप घेऊ शकेल.

वर उल्लेखिल्याप्रमाणे, आम्हांस इतक्या दूर जायचे नाही. शिवाजी सध्याचा राष्ट्रीय वीरपुरुष होण्याचे कारण हे आहे की, ती भावना जीने त्यास संपूर्णतया प्रेरित ठेवले न की त्याचे कार्य. त्याचे जीवन स्पष्टपणे दाखविते की भारतीय वंशाचे लोक आपली ही विरता सहजासहजी सोडत नाहीत, जी त्यांना कठीण प्रसंगी सक्षम नायक देते. या महान मराठा नायकाच्या इतिहासापासून मुसलमान व हिंदूंनी हा धडा घ्यावयास हवा; शिवाजी महोत्सव हा त्याच कारणांवर भर देण्यासाठी आहे.

शिवाजीची पूजा ही, मुसलमान किंवा सरकारसोबत लढाईस उद्युक्त करते असे वाटणे हे निव्वळ गैर-प्रातिनिधिक आहे. शिवाजी महाराष्ट्रात जन्मल्या वेळीची राष्ट्राची राजकीय परिस्थिती अनुसरून, ती त्यावेळीची कृती होती. परंतु, भविष्यातील नायक, कोण जाणे, भारतात कोठेही जन्मू शकतो अगदी एक मुस्लिम सुद्धा असू शकेल. ही त्या प्रश्नाकडे पाहण्याची योग्य दृष्टी आहे व आम्हांस वाटत नाही की आंग्लो-भारतीय लेखक त्यापासून आमचे लक्ष दुसरीकडे वळविण्यास सफल होतील.


- बाळ गंगाधर टिळक

(दि.२४ जून १९०६ रोजी दैनिक मराठात प्रकाशित लेख)


अनुवाद प्रयत्न २ (मिपा चर्चा धाग्यास अनुसरून)[संपादन]

काय शिवाजी राष्ट्रीय आदर्श वीरपुरुष नाहीत??


मानवी स्वभावात राष्ट्रिय नेत्याचा उदो उदो करणे/ (जयजयकार करणे) हे खोलवर रुजली आहे; आणि आपल्या मनास प्रेरणा देऊ शकेल अशा स्वदेशी आदर्श वीरपुरुषाच्या पूजेची, आपल्या राजकीय आकांक्षेस पूर्ण ताकद देण्याकरिता गरज आहे. या कारणासाठी, शिवाजी हे भारताच्या इतिहासातील एकमेव आदर्श वीरपुरुष आहेत. ते अशा काळात जन्मले होते, ज्यावेळी संपूर्ण राष्ट्रास परवश झालेल्या शासनासून मुक्तता हवी होती; त्यांनी स्वार्थत्यागाने आणि धैर्याने जगाला असे दाखवून दिले की, भारत हा दैवाच्या विस्मृतीत गेलेला /(दैवाने साथ सोडलेला) देश नव्हता . हे खरे आहे, की मुसलमान व हिंदू तेव्हा विभागलेले होते. आणि शिवाजी मुसलमानांच्या धार्मिक विकल्पांचा आदर करीत असत, तरीपण लोकांना असह्य झालेल्या अश्या मुगल राज्यशासनाविरुद्ध लढावे लागले होते. पण ' आजच्या काळात (जेव्हा) मुसलमान व हिंदू समान कायदे व नियमांनी बांधलेले आहेत आणि सारखेच सत्ताविहीन झाले आहेत, (तेव्हा), त्याचे काळात, जो त्याकाळातील जुलूमशाही /(मनामानी कारभारा) विरुद्ध धिटाईने उभा झाला, त्याला त्यांनी आदर्श वीरपुरुष म्हणून स्वीकारू नये, असा याचा अर्थ असा होत नाही. शिवाजींनी अंगिकारलेल्या पद्धती सध्याच्या पिढीनेही अंगिकाराव्यात असा उपदेशही केला जात नाही आणि तशी अपेक्षाही अजिबात केली जात नाही.

आंग्ल -भारतीय लेखकांनी या संबंधी केलेला आरोप हा त्यांच्या बुद्धीचा कल्पनाविलास आहे व तो आमच्यात असणाऱ्या भित्र्यांना घाबरविण्यासाठी पुढे केला जातो आहे. शिवाजीच्या जीवनातला प्रत्येक प्रसंग हा आजच्या काळात कोणीही जसाच्या तसा नकलवावा, असे कधी कोणास स्वप्नातही वाटत नाही. ती प्रेरणा, ज्या प्रेरणेने शिवाजीस त्याच्या कार्यास उद्युक्त केले, पुढील पिढीने सतत नजरेसमोर ठेवण्यास योग्य आदर्श म्हणून, त्या प्रेरणेसच पुढे केल्या जाते. कोणताही चुकीचा अन्वयार्थ या प्रश्नाबद्दलचा आमचा हा दृष्टिकोन आमच्याकडून सोडून दिला जाण्यात सफल होणार नाही; आणि आम्हांस खात्री आहे आणि आम्ही यावर विश्वास ठेवतो की आमचे मुसलमान बांधव अश्या प्रकारच्या लबाड काव्यांनी दिशाभ्रमित होणार नाहीत.


इंग्लंडमध्ये नेल्सनला किंवा फ्रांसमध्ये महान नेपोलियनला पूज्य मानण्यास, (किंवा ततसंबंधी) असे राष्ट्रीय महोत्सव उभय देशांमधील, एका देशाचे दुसऱ्यासोबत असणारे मित्रत्वाचे संबंध दुरावण्यास कारणीभूत ठरतील किंवा भविष्यात, दोन्ही देशांत परस्पर सौहार्दपूर्ण संबंध राखणे अशक्य होईल या आधारावर आंग्ल भारतीय लेखक हरकत घेतील, असे आम्हांस वाटत नाही. आणि तरीही, आम्ही आता, त्यांच्या डावपेचातील (तथाकथित) 'संपूर्णसत्याच्या' शब्दांना, पुरेसे अंगवळणी पडलो आहोत, ह्या वस्तुस्थितीची पर्वा न करता, आम्हांस आंग्ल-भारतीय टीकाकारांतर्फे, आश्रयदात्यासारख्या भाषेत, तोचतो सल्ला उगाळला जातो. शिवाजी महोत्सव हा मुसलमानांना दूर करण्यास किंवा चिडविण्यासाठी साजरा केला जात नाही. काळ बदलला आहे व वर सांगितल्या प्रमाणे, जनतेची राजकीय परिस्थिती लक्षात घेता, मुसलमान व हिंदू हे एकाच नावेतील प्रवासी आहेत किंवा एकाच मंचावर आहेत. या परिस्थितीत आपण दोघेही शिवाजीच्या जीवनापासून काही प्रेरणा घेऊ शकत नाही काय? हाच मुद्दातील खरा प्रश्न आहे; व जर याचे 'होय' उत्तर दिल्या गेले तर 'शिवाजी हा महाराष्ट्रात जन्मला' ही दुय्यम बाब होते.


या प्रश्नाचा हा आयाम हा बंगालमधील 'पत्रिका' व 'बंगाली' या आघाडीच्या भारतीय वर्तमानपत्रांनी समजून स्पष्टपणे व्यक्त केला आहे; आणि आंग्लो-भारतीय लेखकांची सर्पबुद्धी त्यांच्या 'अभिप्रेत श्रोत्यां'कडून' डोळे झाकून स्वीकारली जाण्याची शक्यता कमीच आहे. आम्ही अकबरासाठी किंवा जुन्या भारतीय इतिहासातील एखाद्या वीरपुरुषासाठी एखादा महोत्सव सुरू करण्याच्या विरुद्ध नाही. अश्या महोत्सवांना त्यांचे स्वतःचे वेगळे मूल्य असेल; परंतु, शिवाजीस त्याचे स्वतःचे देशात वैशिष्ट्यपूर्ण मूल्यं आहे, व प्रत्येकाचे हे कर्तव्य आहे की या महोत्सवाची लक्षणे ही दुर्लक्षिल्या किंवा गैर-प्रकारे प्रदर्शित केल्या जाणार नाहीत.

कोणताही महानायक, तो भारतीय असो की युरोपियन, त्याचे कालानुसार कार्य करतो; व म्हणून आम्ही त्यांची वैयक्तिक कृत्ये त्या त्या काळाच्या मागणीनुसार पारखावयास हवीत. जर हे तत्त्व मान्य केले तर, शिवाजीच्या जीवनात आम्हाला असे काहीही सापडणार नाही ज्यावर कोणीही आक्षेप घेऊ शकेल.

वर उल्लेखिल्याप्रमाणे, आम्हांस इतक्या दूर जायचे नाही. शिवाजी सध्याचा राष्ट्रीय वीरपुरुष होण्याचे कारण हे आहे की, ती भावना जीने त्यास संपूर्णतया प्रेरित ठेवले न की त्याचे कार्य. त्याचे जीवन स्पष्टपणे दाखविते की भारतीय वंशाचे लोक आपली ही विरता सहजासहजी सोडत नाहीत, जी त्यांना कठीण प्रसंगी सक्षम नायक देते. या महान मराठा नायकाच्या इतिहासापासून मुसलमान व हिंदूंनी हा धडा घ्यावयास हवा; शिवाजी महोत्सव हा त्याच कारणांवर भर देण्यासाठी आहे.

शिवाजीची पूजा ही, मुसलमान किंवा सरकारसोबत लढाईस उद्युक्त करते असे वाटणे हे निव्वळ गैर-प्रातिनिधिक आहे. शिवाजी महाराष्ट्रात जन्मल्या वेळीची राष्ट्राची राजकीय परिस्थिती अनुसरून, ती त्यावेळीची कृती होती. परंतु, भविष्यातील नायक, कोण जाणे, भारतात कोठेही जन्मू शकतो अगदी एक मुस्लिम सुद्धा असू शकेल. ही त्या प्रश्नाकडे पाहण्याची योग्य दृष्टी आहे व आम्हांस वाटत नाही की आंग्लो-भारतीय लेखक त्यापासून आमचे लक्ष दुसरीकडे वळविण्यास सफल होतील.


- बाळ गंगाधर टिळक

(दि.२४ जून १९०६ रोजी दैनिक मराठात प्रकाशित लेख)


अनुवाद-समसमीक्षा[संपादन]

या अनुवाद लेखाचे येथे खाली अनुवाद-समसमीक्षण (अनुवादात वापरलेल्या शब्दांचे आणि अनुवाद पद्धतीचे समसमीक्षण (Peer Review of translation) करून हवे आहे.