चरदशा गणना

विकिस्रोत कडून
Jump to navigation Jump to search

चरदशा गणना  जैमिनी सुत्रम्

प्राचीवतिर्विष्मभेषु ।।२५।।

पराव़त्योत्तरेषु ।।२६।।

न क्वचित् ।।२७।।

१) चरदशा ही लग्न वगैरे १२ भावांची होते- सामान्यत: विषम राशि १,३,५,७,९,११ या क्रमाने मोजले असता राशीचक्राच्या क्रमाने मोजून गणना केली जाते-

उदा मिथुन राशीपासून चवथे स्थान माहित करायचे असेल तर मिथुन, कर्क, सिंह या क्रमाने गणना होईल-

२) सम राशी (२,४,६,८,१०,१२) यामध्ये गणना राशीचक्राच्या विरुदध दिशेने मोजून गणना केली जाते-

३) सुत्र २७ मध्ये याला अपवाद सांगण्यात आला आहे. हे नियम काही जागांवर लागू होत नाही, कारण विषयी सुत्रांमध्ये काही सांगण्यात आले नाही-

४) चरदशेमध्ये वृषभ व व़ृश्चिक (दोन सम राशी) आणि सिंह व कुंभ (दोन विषम राशी) या चार राशींसाठी सम राशिला राशीचक्राप्रमाणे व विषम राशीला राशीचक्र विरुदध दिशेने गणना केली जाईल हा अपवाद चर दशेसाठी आहे-  

चरदशावर्ष जाणून घेण्याची विधी

नायान्त: समा: प्रायेण ।।२८।।

५) प्रत्येक राशीचे दशावर्ष वेगवेगळे असतात याला कोणी सामान्य सिदधांत सांगितलेला नाही- ज्या राशीचे दशावर्ष माहित करायचे आहे, सर्वप्रथम त्याची स्थिती पहा. त्या राशीचा स्वामी राशीपासून जेवढे राशी दूर असेल तेवढे राशीची दशावर्षे असतील गणना कशी करायची हे मागील श्लोकामध्ये सांगितले आहे-  

उदा:- कर्क राशीची दशा जाणून घ्यायची आहे. जर कर्केचा स्वामी चंद्र सिंह राशीत आहे तर राशीपासून १२ वे स्थान मोजावे (राशीचक्र विरुदध दिशेने) म्हणजे कर्क राशीची दशा ११ वर्षे आहे असे मानावे-  

तस्मात् तदीशपर्यंतं संख्यामात्र दशां बिंदू: । वर्षदवादशकं तत्र न चेदेकं विनिदिर्शेत् ।।

६) या प्रकारे राशीपासून राशी स्वामी पर्यंत संख्या तुल्य दशा वर्ष असतात- जर त्याच राशीत राशी स्वामी असेल तर १२ वर्ष दशा मानावी-  

७) या दशा अवधीमध्ये वृदधी किंवा हानी नियमानुसार केली जाते-

१) जर कोणता ग्रह उच्च असेल तर १ वर्ष वाढवावे-

२) जर कोणता ग्रह निच असेल तर १ वर्ष कमी करणे-

द्वी राशीस्वामी नियम

१) वृश्चिक राशीला दोन स्वामी आहेत-केतु व मंगळ-

२) कुंभ राशीला दोन स्वामी आहेत-राहू व शनि-

या राशीना द्वीनाश म्हणतात यामध्ये दशा समजण्याचे नियम पुढीलप्रमाणे आहेत

१) जर दोन्ही स्वामी त्याच राशीत असतील तर १२ वर्ष दशा मानावी.

२) जर एक ग्रह स्वत: त्याच राशीत असेल व दुसरा अन्यत्र असेल तर अन्यत्र असणाऱ्या ग्रहाची चरदशा मानावी.

३) जर दोन्ही स्वामी ग्रह अन्य जागेवर असतील तर जो ग्रह बलवान असेल त्याची दशा मानावी.

यांच्या बलाचा निर्णय-निसर्गबल, ग्रहयुती, स्वगृह, उच्चगृह या बाबींना तपासून घ्यावा.

४) जर दोन्ही ग्रहांचे बल समान आहे तर राशी बल पहावे. म्हणजे ग्रह हीन राशीपेक्षा ग्रहवान राशी बलवान चर राशी पेक्षा स्थिर व स्थिर पेक्षा द्वीस्वभाव राशी बलवान मानावी.

५) जर राशीबल समान असेल तर ज्या ग्रहाची दशा वर्षे जास्त त्याला प्राधान्य दयावे.

६) जर दोघांपैकी एक राशी स्वामी उच्चस्थ असेल तर दशा वर्ष ऐवजी उच्चस्थ ग्रहाची दशा ग्राह्य धरावी.

जर सप्तम व लग्न राशीपैकी कुठेही ग्रह असला तरी ग्रहहीत राशीला देखील जास्त बलवान मानले पाहिजे.

७) सामान्यत: ग्रहहीत राशीपेक्षा ग्रहयुक्त राशी अधिक बली व अधिक ग्रह असलेली रास त्याहून अधिक बली मानावी.

वरील मतांपैकी काहींना पराशर ऋषींनी देखील मान्य केले आहे.