चंदगडी बोली लोककथा

विकिस्रोत कडून
येथे जा: सुचालन, शोध

लोककथा यका गावात योक शेत्करी व्हता .त्यची न्हगड्यास पडली आय घरात र्‍हायी. घरात त्यच्या रायतावाबी दाडंगा व्हत्ता. खरं घरात सून सासूस मानी नसे. ती निसती सासूचा काटा काढूचा इच्यार करी. तरी तिस त्यच्यात कदी यास यऊस न्हाय. बगुन बगुन तिनं म आपल्या घोवास आपल्या कटात शामिल करून घेतंलं यवजलीन. त्येाबी तिचेबर त्यच्यात शामिल झाला.त्यंचं पेंडीस जातल्या वक्तास आयीस चिल्लात बांदोन नदीच्या पाण्यात लेाटून देतलं ठरलं. शेत्कर्‍यान कारभारनीचं आयकेान हे काम फत्ते केल्यान. त्यनं आईच मुटकुळं पुरात ढकलुन दिल्यान.तो घराडे परतोन यला तवं त्यची बायको ताक करी.ताक करीत करीत गीत्ती गावे.

ताक करुलोय मिय्या घरातऽऽ आतीबाय माझी व्हवेत नदीच्या पुरातऽऽ भायीरणं यल्ल्या नवर्‍यान हे आयीकल्यान. बायकोसकं त्यनंबी मोठ्यान गीत्ती गावोस चालू केल्यान. बारा बैलं दारात गंऽऽ, पट्याची आय घरात गंऽऽ हे आयकोन त्यची बायको काचबारली.बुचकाळ्यात पडली. तिनं पुरं घर हुडीकलीन. तर तिची सासू घरातुच व्हत्ती.आनी पाव्हणी म्हणुन यल्ली तिचीच आय पुरातन गेल्ली.

अनुवाद[संपादन]

एका गावात एक शेतकरी होता. त्याची आजारी आई घरी असे.त्याच्या घरी राबताही मोठा होता.पण घरामध्ये सून सासूला मानत नव्हती.तिच्या मनात सतत सासूचा काटा काढण्याचा विचार चालू असे.पण त्यामध्ये तिला मध्ये तिला कधी यश आले नाही.नंतर तिने आपल्या कटात आपल्या पतीला सामील करून घ्यायचे ठरवले. तोदेखील तिच्या कटात सामील झाला.या दोघांचे वैरणीला जातेवेळी पोत्यात बांधून आईला नदीत फेकून देण्याचे ठरले. हे काम यशस्वी करून तो घरी आला. तेंव्हा त्याची बायको ताक करीत होती.ताक करता करता ती गाणे म्हणत होती. ताक करते मी घरामध्येऽऽ आत्याबाई माझ्या पुरामध्ये ऽऽ बाहेरून आलेल्या नवर्‍याने हे आयीकले. हे आयकून तोही गाणे म्हणू लागला, बारा बैल दारात गऽऽ पट्टयाची आई घरात गऽऽ हे आयकून त्याची बायको गोधंळते. ती सारे घर शोधते.तर तिची सासूबाई घरातच असते. तर पाहुणी म्हणून आलेली तिचीच आई पुरातून वाहून गेलेली असते.