गोंधळ - उदो उदो गर्जुनी

विकिस्रोत कडून
Jump to navigation Jump to search

<poem> उदो उदो गर्जुनी करीतो मुजरा मानाचा । गोंधळी मी अंबेचा हो गोंधळी आ‌ईचा ॥धृ.॥

तुणतुण हातात झांजेच्या नादात ढोलाचा ढमढमाट वाजतो ठेक्यात प्रकाश मशालीचा दिवा गं अंधाराचा गोंधळी मी अंबेचा हो गोंधळी आ‌ईचा ॥१॥

आसूड हातात पाथीवरी मारीतो सुपलीत अंबाबा‌ई घेवूनी नाचतो मळवट भरिला कुम्कुम हळदीचा गोंधळी मी अंबेचा हो गोंधळी आ‌ईचा ॥२॥

कवड्यांच्या माळांनी परडी भरली पिठांनी अनंत भोप्या कमला जोगिणी हो‌ऊनी अखंड वंदा रे प्रणाम प्रेमाचा गोंधळी मी अंबेचा हो गोंधळी आ‌ईचा ॥३॥

<poem>

PD-icon.svg हे साहित्य भारतात तयार झालेले असून ते आता प्रताधिकार मुक्त झाले आहे. भारतीय प्रताधिकार कायदा १९५७ नुसार भारतीय साहित्यिकाच्या मृत्युनंतर ६० वर्षांनी त्याचे साहित्य प्रताधिकारमुक्त होते. त्यानुसार १ जानेवारी १९५६ पूर्वीचे अशा लेखकांचे सर्व साहित्य प्रताधिकारमुक्त होते. Flag of India.svg
| मागील =   
| पुढील       = 
| वर्ष       = 
| टिपण      = 

}} <poem>