काय शिवाजी नॅशनल हिरो नाहीत ?

विकिस्रोत कडून
Jump to navigation Jump to search
अनुवाद[संपादन]

अनुवाद (पर्याय १ला)[संपादन]

काय शिवाजी राष्ट्रीय आदर्श वीरपुरुष[श १] नाहीत??

मानवी स्वभावात आदर्श वीरपुरुषांची पूजा ही खोलवर रुजली आहे; आणि आपल्या मनास प्रेरणा देऊ शकेल अशा स्वदेशी आदर्श वीरपुरुषाच्या पूजेची, आपल्या राजकीय आकांक्षेस पूर्ण ताकद देण्याकरिता गरज आहे. या कारणासाठी, शिवाजी हे भारताच्या इतिहासातील एकमेव आदर्श वीरपुरुष आहेत. अनागोंदी कारभारापासून संपूर्ण राष्ट्रास सुटका पाहिजे होती, अशा काळात त्यांचा जन्म झाला होता; त्यांच्या आत्मबलीदानाने व धैर्याने त्यांनी जगास सिद्ध करून दाखविले की, भारत हा दुर्भाग्यशाली देश नव्हता (भाग्यवान देश होता). हे खरे आहे, की मुसलमान व हिंदू तेव्हा विभागलेले होते. आणि शिवाजी मुसलमानांच्या धार्मिक विकल्पांचा आदर करीत असत, तरीपण लोकांना असह्य झालेल्या अश्या मुगल राज्यशासनाविरुद्ध लढावे लागले होते. पण ' आजच्या काळात (जेव्हा) मुसलमान व हिंदू समान कायदे व नियमांनी बांधलेले आहेत आणि त्यांची पूर्वी त्यांचेपाशी असणारी ताकद समान रितीने छाटल्या गेली आहे, (तेव्हा), त्याचे काळात, जो त्याचेवेळच्या जुलूमशाही विरुद्ध धिटाईने उभा झाला, त्याला त्यांनी आदर्श वीरपुरुष म्हणून स्वीकारू नये, असा याचा अर्थ असा होत नाही. शिवाजींनी अंगिकारलेल्या पद्धती सध्याच्या पिढीनेही अंगिकाराव्यात असा उपदेशही केला जात नाही आणि तशी अपेक्षाही अजिबात केली जात नाही.

आंग्ल -भारतीय लेखकांनी या संबंधी केलेला आरोप हा त्यांच्या बुद्धीचा कल्पनाविलास आहे व तो आमच्यात असणाऱ्या भित्र्यांना घाबरविण्यासाठी पुढे केला जातो आहे. शिवाजीच्या जीवनातला प्रत्येक प्रसंग हा आजच्या काळात कोणीही जसाच्या तसा नकलवावा, असे कधी कोणास स्वप्नातही वाटत नाही. ती प्रेरणा, ज्या प्रेरणेने शिवाजीस त्याच्या कार्यास उद्युक्त केले, पुढील पिढीने सतत नजरेसमोर ठेवण्यास योग्य आदर्श म्हणून, त्या प्रेरणेसच पुढे केल्या जाते. कोणताही चुकीचा अन्वयार्थ या प्रश्नाबद्दलचा आमचा हा दृष्टिकोन आमच्या दृष्टीआड करण्यास सफल होणार नाही; आणि आम्हांस खात्री आहे आणि आम्ही यावर विश्वास ठेवतो की आमचे मुसलमान बांधव अश्या प्रकारच्या लबाड काव्यांनी दिशाभ्रमित होणार नाहीत.


इंग्लंडमध्ये नेल्सनला किंवा फ्रांसमध्ये महान नेपोलियनला पूज्य मानण्यास, (किंवा ततसंबंधी) असे राष्ट्रीय महोत्सव उभय देशांमधील, एका देशाचे दुसऱ्यासोबत असणारे सहानुभूतीचे संबंध दुरावण्यास कारणीभूत ठरतील किंवा भविष्यात, दोन्ही देशांत परस्पर सौहार्दपूर्ण संबंध राखणे अशक्य होईल या आधारावर आंग्ल भारतीय लेखक हरकत घेतील, असे आम्हांस वाटत नाही. आणि तरीही, आम्ही आता, त्यांच्या डावपेचातील (तथाकथित) 'संपूर्णसत्याच्या' शब्दांना, पुरेसे अंगवळणी पडलो आहोत, ह्या वस्तुस्थितीचे भानही न ठेवता, आम्हांस आंग्ल-भारतीय टीकाकारांतर्फे, आश्रयदात्यासारख्या भाषेत, तोचतो सल्ला उगाळला जातो. शिवाजी महोत्सव हा मुसलमानांना दूर करण्यास किंवा चिडविण्यासाठी साजरा केला जात नाही. काळ बदलला आहे व वर सांगितल्या प्रमाणे, जनतेची राजकीय परिस्थिती लक्षात घेता, मुसलमान व हिंदू हे एकाच नावेतील प्रवासी आहेत किंवा एकाच मंचावर आहेत. या परिस्थितीत आपण दोघेही शिवाजीच्या जीवनापासून काही प्रेरणा घेऊ शकत नाही काय? हाच मुद्दातील खरा प्रश्न आहे; व जर याचे 'होय' उत्तर दिल्या गेले तर 'शिवाजी हा महाराष्ट्रात जन्मला' ही दुय्यम बाब होते.


या प्रश्नाचा हा आयाम हा बंगालमधील 'पत्रिका' व 'बंगाली' या आघाडीच्या भारतीय वर्तमानपत्रांनी समजून स्पष्टपणे व्यक्त केला आहे; आणि आंग्लो-भारतीय लेखकांची सर्पबुद्धी त्यांच्या 'अभिप्रेत श्रोत्यां'कडून' डोळे झाकून स्वीकारली जाण्याची शक्यता कमीच आहे. आम्ही अकबरासाठी किंवा जुन्या भारतीय इतिहासातील एखाद्या वीरपुरुषासाठी एखादा महोत्सव सुरू करण्याच्या विरुद्ध नाही. अश्या महोत्सवांना त्यांचे स्वतःचे वेगळे मूल्य असेल; परंतु, शिवाजीस त्याचे स्वतःचे देशात वैशिष्ट्यपूर्ण मूल्यं आहे, व प्रत्येकाचे हे कर्तव्य आहे की या महोत्सवाची लक्षणे ही दुर्लक्षिल्या किंवा गैर-प्रकारे प्रदर्शित केल्या जाणार नाहीत.

कोणताही महानायक, तो भारतीय असो की युरोपियन, त्याचे कालानुसार कार्य करतो; व म्हणून आम्ही त्यांची वैयक्तिक कृत्ये त्या त्या काळाच्या मागणीनुसार पारखावयास हवीत. जर हे तत्त्व मान्य केले तर, शिवाजीच्या जीवनात आम्हाला असे काहीही सापडणार नाही ज्यावर कोणीही आक्षेप घेऊ शकेल.

वर उल्लेखिल्याप्रमाणे, आम्हांस इतक्या दूर जायचे नाही. शिवाजी सध्याचा राष्ट्रीय वीरपुरुष होण्याचे कारण हे आहे की, ती भावना जीने त्यास संपूर्णतया प्रेरित ठेवले न की त्याचे कार्य. त्याचे जीवन स्पष्टपणे दाखविते की भारतीय वंशाचे लोक आपली ही विरता सहजासहजी सोडत नाहीत, जी त्यांना कठीण प्रसंगी सक्षम नायक देते. या महान मराठा नायकाच्या इतिहासापासून मुसलमान व हिंदूंनी हा धडा घ्यावयास हवा; शिवाजी महोत्सव हा त्याच कारणांवर भर देण्यासाठी आहे.

शिवाजीची पूजा ही, मुसलमान किंवा सरकारसोबत लढाईस उद्युक्त करते असे वाटणे हे निव्वळ गैर-प्रातिनिधिक आहे. शिवाजी महाराष्ट्रात जन्मल्या वेळीची राष्ट्राची राजकीय परिस्थिती अनुसरून, ती त्यावेळीची कृती होती. परंतु, भविष्यातील नायक, कोण जाणे, भारतात कोठेही जन्मू शकतो अगदी एक मुस्लिम सुद्धा असू शकेल. ही त्या प्रश्नाकडे पाहण्याची योग्य दृष्टी आहे व आम्हांस वाटत नाही की आंग्लो-भारतीय लेखक त्यापासून आमचे लक्ष दुसरीकडे वळविण्यास सफल होतील.


- बाळ गंगाधर टिळक

(दि.२४ जून १९०६ रोजी दैनिक मराठात प्रकाशित लेख)


टीपा[संपादन]

तळटीपा[संपादन]

  1. *अनुसरलेल्या अनुवाद पद्धती साठी कृपया या अनुवाद लेखाचे चर्चापान पहावे.

शब्दार्थ टीप[संपादन]

  1. इंग्लिश:
    national hero
    , मराठी:
    राष्ट्रीय आदर्श वीरपुरुष

पारिभाषिक शब्दसूची[संपादन]

अनुवादात वापरलेल्या इंग्रजी मराठी संज्ञा[संपादन]

क्रमांक मूळ लेखातील इंग्रजी संज्ञा मूळ लेखातील परिच्छेद क्रमांक मूळ लेखातील ओळ क्रमांक मराठी शब्द
उदाहरण NATIONAL HERO उदाहरण उदाहरण उदाहरण
उदाहरण deeply implanted उदाहरण उदाहरण उदाहरण
उदाहरण religious scruples उदाहरण उदाहरण उदाहरण
उदाहरण equally shorn of the power उदाहरण उदाहरण उदाहरण
उदाहरण tyranny उदाहरण उदाहरण उदाहरण
उदाहरण spirit उदाहरण उदाहरण उदाहरण
उदाहरण actuated उदाहरण उदाहरण उदाहरण
उदाहरण national hero उदाहरण उदाहरण उदाहरण
उदाहरण Hero worship उदाहरण उदाहरण उदाहरण
उदाहरण deeply implanted उदाहरण उदाहरण उदाहरण
उदाहरण human nature उदाहरण उदाहरण उदाहरण
उदाहरण forsaken by providence उदाहरण उदाहरण उदाहरण
उदाहरण shorn of the power उदाहरण उदाहरण उदाहरण
उदाहरण tyranny of his time. उदाहरण उदाहरण उदाहरण
उदाहरण actuated उदाहरण उदाहरण उदाहरण
उदाहरण shutting this view उदाहरण उदाहरण उदाहरण
उदाहरण amicable relations उदाहरण उदाहरण उदाहरण
उदाहरण unmindful उदाहरण उदाहरण उदाहरण
उदाहरण acquainted with उदाहरण उदाहरण उदाहरण
उदाहरण gospel truth. उदाहरण उदाहरण उदाहरण
उदाहरण the real question at issue ; उदाहरण उदाहरण उदाहरण
उदाहरण This aspect of the question has been clearly perceived and exclaimed by the leading Indian papers in Bangal such as Patrika and Bengalee उदाहरण उदाहरण उदाहरण
उदाहरण serpentine wisdom उदाहरण उदाहरण उदाहरण
उदाहरण peculiar value उदाहरण उदाहरण उदाहरण
उदाहरण actuated उदाहरण उदाहरण उदाहरण
उदाहरण vitality उदाहरण उदाहरण उदाहरण
उदाहरण able leaders उदाहरण उदाहरण उदाहरण
उदाहरण great Maratha Chief उदाहरण उदाहरण उदाहरण
उदाहरण to emphasise उदाहरण उदाहरण उदाहरण
उदाहरण sheer misrepresentation उदाहरण उदाहरण उदाहरण
उदाहरण invocation to fight उदाहरण उदाहरण उदाहरण
उदाहरण only in conformity worth the political circumstances of the country उदाहरण उदाहरण उदाहरण

संदर्भ[संपादन]