उंदीर

विकिस्रोत कडून
Jump to navigation Jump to search
उंदीर.djvu
उंदीर

जे.वी.एस. हल्डेन


कोणे एके काळी स्मिथ नावाचा एक मनुष्य लंडनमध्ये क्लॅमहॅम येथे राहात होता. तो भाजीपाला विकायचा. त्याला चार मुले होती. त्यातील सर्वात मोठ्या मुलाचे नाव जॉर्ज होते जे राजाच्या नावावरून ठेवले होते. जॉर्ज वडिलांच्या मागे वारसाहक्काने भाजीचे दुकान चालविणार अशी व्यवस्था करण्यात आली होती. त्यामुळे शाळेत तो वनस्पतीशास्त्राच्या विशेष शाखेत शिकत होता आणि दीडशे प्रकारचे कोबी व ४४ प्रकारचे लेटयूसचे प्रकार अभ्यासत असे. तसेच तो प्राणिशास्त्राच्या वर्गात कोबीत राहाणारे ७७ प्रकारचे सुरवंट आणि कोबीवर जर साबणाचे पाणी फवारले तर वाहेर येणार हिरवे तसेच खा-या पाण्यातील तंबाखूच्या रसासारख्या रेघा असलेले तपकिरी सुरवंट यांचाही अभ्यास करीत असे.

त्यामुळे तो मोठा झाल्यावर लंडनमधील सर्वोत्कृष्ट भाजीविक्रेता बनला आणि त्याच्या कडील कोबीत कोणालाही कधीही एखादा सुद्धा सुरवंट सापडत नसे.

पण स्मिथ यांचे भाजीचे एकच दुकान असल्यामुळे बाकीच्या तिन्ही मुलांना स्वतच्या उदरनिर्वाहाची तरतूद करणे भाग होते. दुस-या मुलाचे नाव जेम्स होते आणि अर्थातच त्याला जिम या नावाने हाक मारीत असत. तो शाळेत जाऊ लागला आणि इंग्रजी निबंधलेखनात त्याने सर्व बक्षीसे पटकावली. तो शाळेच्या फूटबॉल टीमचा कप्तान होता आणि हाफबॅक या पद्धतीने खेळत असे. तो अनेक प्रकारच्या क्लृप्त्या करण्यात तरवबेज होता आणि शिक्षकांवर व इतर लोकांवर तो त्या वापरत असे. एक दिवस त्याने काडेपेटीच्या काडीचे टोक खडूत घुसविले. ती काडी खरेतर सुरक्षित नव्हती. सर्वसामान्य निळयापांढ-या काड्या, ज्या कशावरही आदळतात त्यातीलच ती होती.

त्यानंतर शिक्षकांनी जेव्हा खडूने फळ्यावर लिहायला सुरूवात केली तेव्हा पुढची पाच मिनिटे कोणीच फारसे काही करू शकले नाही. दुस-या एका दिवशी त्याने मिथिलयुक्त स्पिरीट शाईच्या बाटल्यांमध्ये ओतले आणि शाई पेनला चिकटतच नव्हती. शिक्षकांना सर्व वाटल्यातील शाई बदलायला अर्धा तास लागला आणि त्या दिवशी मग फ्रेंचचा तास होऊच शकला नाही...तसेही जिमला फ्रेंच आवडत नव्हतेच म्हणा. पण त्याने किल्लीच्या भोकात लांबी भरणे किंवा शिक्षकांच्या टेवलावर मेलेले उंदीर ठेवणे असल्या सामान्य खोडया कधीच केल्या नाहीत.

तिसरा मुलगा म्हणजे चार्ल्स, तो गणित आणि इतिहास यात साधारण होता. आणि किकेटच्या ११ जणांच्या संघात डावखुरा मंदगती गोलंदाज म्हणून त्याची निवड झाली होती. पण एकमेव विषयात तो तरबेज होता ते म्हणजे, रसायनशास्त्र. तो त्याच्या शाळेतील किंवा मला माहीत असलेल्या इतर मुलांमध्ये देखील एकमेव होता ज्याने पॅराडिमेथिलअमायनोबेंझलडिहाईड किंवा अगदी आरबिटॉल बनविले होते, जे बनवायला खरोखर फार अवघड असते आणि ज्याचा उंदराशी काही संबंध नसतो. जर त्याला वाटले असते तर त्याने भयंकर वासाचे द्रव्य वनविले
उंदीर.djvu

 असते कारण ते त्याला जमत होते .पण तो एक चांगला मुलगा होता आणि त्याने तसे केले नाही. अर्थात त्याचवरोवर महत्त्वाचे कारण म्हणजे इतरजण त्यामुळे त्याचे रसायनशास्त्र शिकणे थांबवू शकले असते आणि ते त्याला नको होते .कारण त्याला आयुष्यभर ते शिकायचे होते.

चौथ्या मुलाचे नाव होते जॅक.तो अभ्यासात फारसा हुशार नव्हता आणि खेळातदेखील. तो चेंडूला एखादी सरळपणे लाथ मारू शकत नसे आणि किकेट खेळताना त्याला झोप येई. त्याला उत्तम जमणारी एकमेव गोष्ट म्हणजे बिनतारी. घरातील व्हाल्व्ह सोडून अनेक वस्तू त्याने चांगल्या प्रकारे बनविल्या होत्या. आपल्या कथेला सुरूवात होत असताना तो व्हाल्व्ह बनविणे शिकत होता. त्याची माटिल्डा नावाची एक काकू होती ती इतकी म्हातारी होती की लंडनपासून डोव्हरची रेल्वेलाईन वांधली जात असतानाच्या तिच्याकडे आठवणी होत्या. तिला चालता येत नव्हते आणि ती सतत अंथरूणावर पडून असे. जॅकने तिच्यासाठी कानाचे फोन्स वनविले होते आणि ती त्याच्यावर खूप खुष होती. ती म्हणत असे की राणी व्हिक्टोरियाच्या काळापासून तिला इतका आनंद कधीच झाला नव्हता. जॅक इतर इलेक्ट्रिकल वस्तू वनविण्यात देखील फार हुशार होता.

त्याने आपल्या घरात विजेचे असे उपकरण वनविले ज्याद्वारे घरात वीजप्रवाह चालू राही पण मीटरवर त्याची नोंदच होत नसे. एका आठवड्यानंतर त्याच्या वडिलांना याचा पत्ता लागला आणि ते म्हणाले की “आपण असे करायला नको. हे म्हणजे वीज कंपनीकडून वीज चोरण्यासारखे आहे”. “मला नाही वाटत ही चोरी आहे." जॅक म्हणाला. “कंपनी म्हणजे एक माणूस नव्हे. तसेच आपल्याकडे वीज येते, दिवे लागतात आणि परत मुख्य ठिकाणी जातात. आपण ती काही आपल्याकडे ठेवत नाही. आपण फक्त उसनी घेतो." पण त्याच्या वडिलांनी ते उपकरण त्याला काढायला लावले. त्यांनी वीज कंपनीकडे मधल्या आठवड्याचे पैसे देखील भरले, कारण ते प्रामाणिक होते.

श्री.स्मिथ यांना ल्यूसिल नावाची एक मुलगी होती. पण सर्वजण तिला पेगी म्हणत असत. आपल्या या कथेत ती फारशी नाही त्यामुळे मी शेवटपर्यंत तिच्याबद्दल फारसे सांगणार नाही. अर्थात एक गोष्ट सोडून, ती म्हणजे , तिचे पुढचे दात लहान असताना बाहेर आले होते पण शेवटी ते आत ढकलण्यात ती यशस्वी झाली.

सध्या लंडनच्या गोदीत उंदरांच्या प्लेगची भयंकर साथ चाली होती. ते प्रामुख्याने भयंकर उंदीर होते. त्यांचे पूर्वज हॉंगकॉंगहून चहा, आले, रेशीम व तांदूळ यांच्यासोबत जहाजावर आले होते. हे उंदीर लंडनला येणारे सर्व प्रकारचे धान्य खात असत. कारण आम्ही लंडनमध्ये सर्वांना पुरेसे धान्य निर्माण करू शकत नव्हतो. ते कॅनडातून येणारे गहू, हॉलंडहून येणारे चीज, न्यूझीलंडहून येणारे मटण आणि अर्जेटिनाहून येणारे बीफ खात. त्यांची बिळे वनविण्यासाठी ते इराणी गालिचे कुरतडत आणि चीनच्या रेशमाला ते पाय पुसायचे.

आता लंडनमधल्या सर्व गोदामांचा प्रमुख हा पोर्ट ऑफ लंडन ऑथारिटीचा अध्यक्ष म्हणविला जायचा आणि तो खरोखरच एक मोठा माणूस होता.त्याचे टॉवर हिलजवळ बकिंगहॅमच्या राजवाड्याइतके मोठे ऑफिस होते. तो
उंदीर.djvu


उंदरावर प्रचंड रागावलेला होता कारण जहाजांवर येणा-या वस्तू पुढे पाठविण्याच्या यंत्रणेचा तो मुख्य होता. या वस्तू जहाजावरून आल्यानंतर ट्रक, रेल्वे, घोडागाड्यांमधून पुढे पोचविल्या जाईपर्यतची सर्व जवाबदारी त्याची होती आणि उंदरांनी खाल्लेल्या वस्तूंचे पैसे त्याला भरावे लागत. उंदीर पकडणारी उत्तमोत्तम माणसे त्याने या कामाला लावली. पण त्यांनी फक्त शेकडो उंदीर पकडले कारण उंदीर फार धूर्त होते. त्यांचा एक राजा होता जो एका खोल विळात राहात असे. सर्व उंदीर विशेषतः त्याच्यासाठी चांगले खादय घेऊन येत. ते स्वित्झर्लंडचे चॉकोलेट, फान्सची टर्की, अल्जीअर्सहून खजूर इ. खादयपदार्थ आणत. आणि तो इतर उंदरांना काय काय करा ते सांगत असे. एखादा उंदीर सापळ्यात अडकला तर तो त्याच्या खास खब-यांतर्फे धोक्याची सूचना देणारे निरोप पाठवीत असे. त्याच्याकडे दहा हजार तरूण व हुशार उंदरांची फौज होती आणि ते त्यांच्याविरूद्ध कोणत्याही प्राण्यावरोवर लढू शकत. एक टेरियर जातीचा कुत्रा एक दोन उंदीर सहज मारू शकतो पण शेकडो उंदीर त्याच्यावर एका वेळी तुटून पडले ...तर तो त्यातील चारपाच जणांना मारेलही, पण अखेरीस ते सर्वजणच त्याला मारणार हे उघड आहे. मजबूत दाताच्या उंदराना अभियंत्याचे प्रशिक्षण दिल्यामुळे सापळयाच्या लोखंडी तारा कुरतडून आत अडकलेल्या उंदरांना ते सहज वाहेर काढू शकत.

तर एकूण या उंदरांनी एका महिन्यात १८१ मांजरे, ४९ कुत्रे, ९५ घुशींचा फडशा पाडला. आणि अनेकांना त्यांनी अशा प्रकारे जखमी केले की दुरून उंदरांचा वास आला तरी ते पळून जात. आणि त्यांनी ७४२ कैदी उंदरांना ६१८ सापळयांमधून मुक्त केले. त्यामुळे उंदीर पकडणारे लोक त्यांच्याकडील उत्तमोत्तम कुत्र्यांना मांजरांना व घुशींना मुकले. आणि दुःखाने त्यांनी नोकरी सोडून दिली. गोदीतील लोकांनी केमिस्टकडून उंदीर मारायचे सर्वात जहाल विष आणले आणि सर्व प्रकारच्या आमिषांमध्ये मिसळून ते सर्वत्र पसरले. पण राजा उंदराने हुकूम दिला की एखादया खोक्यातून किंवा पुडक्यातून थेट आलेले अन्न फक्त खायचे. यामुळे आज्ञाधारक

नसलेल्या काही उंदरांना फक्त विषवाधा झाली. आणि इतर त्यातून वाचले. आणि ते विष कुत्रे, घुशी आणि सापळयांसाठी कामाला आले.

मग पोर्ट ऑफ लंडन ऑथारिटीचा अध्यक्षाने अधिका-यांची त्याच्या ऑफिसमध्ये एक बैठक आयोजित केली. तो म्हणाला उंदरांचा बंदोवस्त कसा करावा यावावत तुमच्या काही सूचना आहेत का ? मग उपाध्यक्षांनी वर्तमानपत्रात जाहिरात दयावी असे सुचविले. पुढच्या आठवड्यात सर्व वर्तमानपत्रात एक जाहिरात आली. ती संपूर्ण पानभर आणि मोठ्या अक्षरांमध्ये छापलेली होती ज्यायोगे लंडनमधील सर्वजण ती वाचू शकले. स्मिथ कुटुंबातील माटिल्डा आजी जी वर्तमानपत्रे कधीही वाचत नसे (कारण ती सर्व वातम्या रेडिओवर ऐकत असे) ती सोडून सर्वानी ही जाहिरात वाचली.

या जाहिरातीपुढे इतर सर्व स्पर्धा एकदम तुच्छ भासत होत्या. कारण पोर्ट ऑफ लंडन ऑथारिटीचा अध्यक्षाने गोदीतील सर्व उंदीर मारणा-या माणसासाठी १०० हजार पौंड व स्वतःच्या मुलीचे त्याच्याशी लग्न ..असे बक्षीस

उंदीर.djvu

 जाहीर केले होते. अर्थात जर जिंकणा-या माणसाचे लग्न झालेले असले तर या लग्नाला परवानगी नव्हती व तसे असल्यास त्याच्या बायकोला हि-यांची बांगडी असे बक्षीस मिळणार होते. जाहिरातीत १०० हजार पौंडांचा फोटो होता व त्यात कागदी नोटा नसून अस्सल सोन्याची नाणी होती. आणि त्या मुलीचाही फोटो होता, जी खूप सुंदर होती तिचे केस सोनेरी आणि निळे डोळे होते. याशिवाय तिला व्हायोलिन वाजविता येत होते. तिने पाककौशल्यात, जलतरणात आणि स्केटिंगमध्ये बक्षीसे मिळविली होती. यात फक्त एकच खोच होती ती म्हणजे स्पर्धकांनी उंदीर मारण्यासाठी स्वतः वस्तू आणायच्या होत्या ज्यासाठी बरेच पैसे लागणार होते.

तरीही हजारो लोक यात सहभागी झाले. अध्यक्षांकडे दुस-या दिवशी सकाळी इच्छुकांची पत्रे पोहोचविण्यासाठी तीन जास्त पोस्टमन नेमावे लागले. आणि इतक्या लोकांनी फोन केले की टेलिफोनच्या तारा वितळल्या. महिनोनमहिने अनेक प्रकारच्या लोकांनी आपले दैव अजमावले. ते रसायनशास्त्रज्ञ, प्राणिशास्त्रज्ञ, अध्यात्मिक वृत्तीचे आणि सिंहाला मारणारे शिकारी अशा प्रकारचे लोक होते पण कोणालाच थोडेसे उंदीर मारण्यापलीकडे यश आले नाही. आणि सर्वात वाईट म्हणजे त्या सर्वानी जहाजांतून खोकी उतरविण्याच्या कारभारात ढवळाढवळ केल्यामुळे बराचसा मका लंडनच्याऐवजी लिव्हरपूल, कार्डिफ, हल आणि साऊदॅम्पटनवरून पाठवावा लागला.

दैव आजमावणा-या लोकांमध्ये जिम, चार्ल्स , जॅक स्मिथही होते. जिमला वाटत होते की जसा तो शाळेत शिक्षकांना चकवत असे तशा प्रकारे सामान्य दिसणारा सापळा बनवायचा की जो उंदरांना चकवू शकेल. त्याला माहिती होते की गोदीत अनेक पत्र्याचे डबे इतस्ततः पडलेले असतात म्हणून त्याने विशेष प्रकारचा एक सापळा पत्र्याच्या डब्यापासून बनविला. उंदरांना आतल्या गळाचा वास आला आणि त्यांनी त्यावर उडी मारली. पण झाकण हे सापळयाचे झाकण होते त्यामुळे उंदीर आत पडले व परत त्यांना वाहेर येताच येइना. त्याचा सर्व मोकळा वेळ त्याने हे सापळे वनविण्यात घालवला अर्थात त्याच्या काही मित्रांनी त्याला मदत केली. त्याने त्याच्या वडिलांकडून १० पौंड घेतले आणि बिल जॉन्सनला गाठला, जो बेकार असलेला लोहार होता व जास्त डबे बनविले. शेवटी त्याने १३९४ सापळे बनविले पण १७ जरा खराब होते ते त्याने मग आणलेच नाहीत.

तो वडिलांची एक घोडागाडी घेऊन एकटाच टॉवर हिल येथे गेला. तिथे त्याला उपाध्यक्ष भेटले...ते सरदार होते. आणि उंदीर मारण्याच्या मोहीमेकडे बघत होते. उपाध्यक्ष म्हणाले “अर्थातच संपूर्ण गोदीला पुरतील इतके हे सापळे नाहीत ..पण आपण प्रयत्न करू." मग त्यांनी पश्चिमेकडच्या गोदीत ..जिथे जमैका आणि आजूबाजूच्या बेटांवरून साखर, केळी, काकवी, रम इ. येत असे तेथे प्रयत्न केला. मला वाटत नाही की या प्रयोगाला ही जागा योग्य होती कारण तेथील उंदीर सतत काकवी, दारूची पिपे अशात तरंगत. हळू चालणारे त्यात अडकते व संपून जात. फक्त जलद चालणारे पळून जात. त्यामुळे तेथील उंदीर फार जलद आणि उत्तम चढणारे होते .

जिमचे अर्धे सापळे चीज व अर्धे बेकनचे होते. पहिल्या रात्री त्यांनी ९१८ उंदीर मारले. जिम फार खुष झाला . . आणि त्याला वाटले की तोच बक्षीस जिंकणार. पण पुढील रात्री फक्त ३ उंदीरच मेले. आणि तिस-या रात्री तर दोनच. राजा उंदराने त्याच्या सर्व सहका-यांना पत्र्याच्या डब्यापासून दूर राहाण्याची ताकीद दिली आणि फक्त मूर्ख व आज्ञा न पाळणारे पकडले गेले. चौथ्या रात्री त्यांनी सापळे व्हिक्टोरिया वंदरात हलविले पण फक्त ४ उंदीर पकडले. सावधानीचा इशारा सर्वाना मिळाला होता. मग जिम दुःखी अंत:करणाने घरी गेला. त्याने बराच वेळ आणि १० पौंड घालविले होते. आणि शाळेतील मुलांनी त्याला पत्रयाचा उंदीर असे नामाभिधान दिले.

...... चार्ल्स स्मिथकडे एक खुपच वेगळ्या प्रकारची योजना होती. त्याने रंग किंवा चव नसलेले एक विष शोधून काढले. मी तुम्हाला ते कसे होते किंवा कसे बनविले होते ते सांगत बसणार नाही कारण काही खुनी ही कथा वाचून सर्व प्रकारच्या लोकांचा खून करतील. त्याने या प्रकारचे भरपूर विष तयार केले आणि रॉकफोर्ट चीजला वास देणारे एक साहित्य सुद्धा भरपूर बनविले. रॉकफोर्ट हे फ्रान्समधील विशिष्ट प्रकारचे चीज आहे. याला मेथिलहेप्टाडेकिलकीटोन म्हणतात आणि मला वाटते तो फार मस्त वास आहे. काही माणसांना तो आवडत नाही पण उंदरांना आवडतो. त्याने त्याच्या वडिलांकडून २० पौंड उसने घेतले आणि १०० स्वस्त आणि बेकार चीज विकते घेतले. त्या सर्वाचे त्याने प्रत्येकी १०० तुकडे केले. ते त्याने प्रथम जहाल विषात बुडवून ठेवले आणि नंतर रॉकफोर्टला वास देणाऱ्या द्रावणात बुडविले. आणि नंतर दहा हजार पुठ्ठयांच्या खोक्यात ते भरले. त्याने विचार केला की उंदरांना वाटेल की हे विखुरलेले नेहमीचे विषाचे सापळे नाहीत. पुठ्याच्या खोक्यात असल्यामुळे उंदीर त्यात सहज अडकतील.

एक पूर्ण दिवस दोन माणसे १०००० चीजचे खोके वेगळ्या ठिकाणी ठेवण्यासाठी हातगाड्यांवरून गोदीभर फिरली. चार्ल्स त्यांच्यामागे एक पिचकारी घेऊन चीज फवारत होता. पूर्व लंडनमधील सर्व रहिवाशांना चीजचा वास आला. त्या संध्याकाळी सूर्यास्तानंतर उंदीर बिळातून वाहेर आले आणि एकमेकांत कुजबुजू लागले.... “हे नक्कीच स्वादिष्ट चीज असले पाहिजे. एका छोट्या खोक्याचा वास साध्या चीजच्या मोठ्या खोक्यासारखाच येतो आहे” . त्यानंतर त्यांच्यातील ब-याचजणांनी चीज खाल्ले. त्यांनी राजा उंदरासाठीसुद्धा थोडे चीज नेले. पण त्याच्या नशीबाने त्याने भाजलेला सामन मासा, बदाम यांचे पोटभर जेवण केले होते आणि त्याला अजिवात भूक नव्हती. विषाने आपले काम साधायला थोडा वेळ लागला आणि सकाळी तीनपर्यंत उंदीर मरायला सुरूवात झाली नाही. राजाला त्यानंतर चीजचा संशय आला व त्याने खब-यांमार्फत तसा निरोप दिला.

त्यांच्यात स्वत:च्या मुलांना खाल्ल्यावद्दल फाशीची शिक्षा झालेला एक दुष्ट उंदीर होता. त्याला मिळालेला चीजचा तुकडा त्याने खाल्ला. तो मेला तेव्हा चीज विषारी होते हे सिद्ध झाले आणि त्याने इतर अनेक खब-यांना पाठविले. दुस-या दिवशी सकाळी ४५१४ मेलेले उंदीर पकडण्यात आले. काही त्यांच्या बिळात मरून पडले होते. आणि काहीजण गंभीररीत्या आजारी होते. अध्यक्ष इतके खुष झाले की त्यांनी तसे चीज आणायला चार्ल्सला भरपूर पैसे दिले. पण त्यांनी दोन दिवसांनी पाहाणी केल्यानंतर त्यांना असे आढळले की आठ हजारमधील दोनच खोकी उघडली गेली आहेत. उंदीर त्यांच्यापेक्षा जास्त हुशार आहेत असे त्यांच्या परत एकदा लक्षात आले. चार्ल्सला खरोखर फार दुःख झाले. त्याला स्वतःबद्दल इतकी खात्री होती की अध्यक्षांच्या मुलीवरोवर लग्न करण्यासाठी त्याने अंगठी बनवायला टाकली आणि कॅंंटरबरीच्या पाद्रींना विवाहविधी संपन्न करण्याचे आमंत्रण दिले होते. आता सराफाला व पाद्रींना तो लग्न करू शकत नसल्याचे त्याला कळवायला लागणार होते. आणि सर्वात वाईट म्हणजे चीजचा वास त्याच्या अंगाला महिनाभर चिकटला. त्याला परत शाळेत घेईनात आणि कोळशाच्या वखारीत झोपावे लागले.
उंदीर.djvuशेवटी जॅकने प्रयत्न केला. त्याच्या युक्तीसाठी भरपूर पैसे लागत होते. आणि वडिलांकडून त्याने ३० पौंड घेतले असले तरी ते पुरेसे नव्हते.पण त्याने काही पैसे माझ्याकडून घेतले आणि स्वतः बनविलेले काही बिनतारी यंत्रे विकली. आणि अखेरीस त्याच्याकडे पुरेसे पैसे जमले. त्याने नेहमीच्या लोखंडाच्या चु-यापेक्षा अतिशय बारीक असा चुरा आणला.तो भाजला. आणि बिस्कीटांमध्ये मिसळला. ती बिस्कीटे गोदीत विखुरली. प्रथम उंदीर त्यांना हात लावायला देखील तयार नव्हते. पण नंतर त्यांच्या लक्षात आले की त्यापासून त्यांना काही इजा होत नाही तेव्हा त्यांनी खायला सुरूवात केली. मधल्या काळात जॅकने प्रभावशाली ७ विदयुतचुंबक आणले आणि विविध ठिकाणी गोदीमध्ये ठेवले. प्रत्येक एक व्यवस्थित कडा असलेल्या खोल खड्ड्यात ठेवले होते. आणि शहर रेल्वे आणि पूर्व लंडन रेल्वे मधून विदयुतप्रवाह सोडता येईल अशा प्रकारे तारा टाकल्या होत्या.

योगायोगाने जॅक जमिनीखालील रेल्वेच्या प्रमुख इलेक्ट्रिकल अभियंत्याला ओळखत होता कारण दोघांनाही बिनतारी या विषयात फार रूची होती. त्यामुळे त्याला विदयुतप्रवाह उसना घेणे सोपे गेले. उंदरांनी पुरेसा लोखंडाचा चुरा खाल्ला असे लक्षात आल्यावरोवर त्याने चुंबकातून प्रवाह जाईल अशी व्यवस्था केली. सर्व लोखंड, स्टील, निकेलच्या वस्तू वेगळया बांधून ठेवल्या गेल्या आणि जहाजे स्टील आणि लोखंडाची असल्यामुळे तीही बांधून ठेवावी लागली. आणि गोदीतल्या माणसांना त्या रात्री विशेष प्रकारचे खिळे नसलेले बूट घालावे लागले. अर्थात ...उपाध्यक्ष सोडून कारण ते राजघराण्यातील होते आणि त्यांच्या बूटाला सोन्याचे खिळे होते.

रात्री दीड वाजता शेवटची भुयारी रेल्वे थांबली. आणि रेल्वेला लागणारा सर्व विदयुतप्रवाह त्यांनी पहिल्या विदयुतचुंबकात सोडला. काही गंजलेले खिळे आणि पत्र्याचे डबे ओढले गेले. आणि उंदीर देखील, पण जास्त सावकाशीने. उंदरामध्ये लोखंडाचा चुरा पूर्णपणे भरलेला होता. आणि चुंबक त्यांना सहज ओढून घेत होते. लवकरच चुंबकाभोवतीचा खड्डा उंदरांनी भरून गेला. मग त्यांनी प्रवाह पुढच्या चुंबकाकडे नेला. नंतर ते तिस-या चुंबकाकडे वळले. अर्थात फक्त जमिनीवर असलेले उंदीर खड्ड्यांमध्ये चुंबकाकडे आकर्षित होत होते. पण ते परत परत विदयुतप्रवाह सोडत होते आणि बिळातून वाहेर पडून जास्तीत जास्त उंदीर चुंबकाच्या खड्ड्यात पडत होते.

राजा उंदराच्या लक्षात आले की काहीतरी चुकते आहे आणि त्याला स्वतःला बिळाच्या एका बाजूला खेचले गेल्यासारखे वाटले. त्याने खब-यांना पाठविले पण ते परत आलेच नाहीत. शेवटी तो स्वतः गेला आणि एका खड्डयातील चुंबकाकडे ओढला गेला. सकाळ झाल्यावर त्यांनी पाण्याचे नळ चालू केले आणि चुंबकाकडे आकर्षित झालले सर्व उंदीर पाण्यात बुडून मेले. या उंदरांचे वजन १५० टन भरले. कोणी ते मोजले नाहीत पण त्यांनी अंदाज केला की एक लाखाच्या पाऊण पट असावेत.

यात काही दुर्धर प्रसंग सुद्धा ओढवले. रात्रपाळीचा टिमिन्स नावाचा राखणदार खिळयांशिवायचे बूट घालायचे विसरला. चुंबकाने प्रथम त्याचे पाय ओढले. उंदरांसाठी खोदलेल्या एका खड्ड्यात तो खरे तर पडायचाच..पण तेवढ्यात बूट काढण्यात तो यशस्वी झाला. पण त्याच्या दोन्ही पायांच्या बोटांवर एकेक उंदीर लटकला आणि ते
उंदीर.djvu

________________

उंदीर चुंबकामुळे इतके जोरात खेचले गेले की त्याची बोटे निखळून आली. तर आता त्याच्या पायांना बोटेच नाहीत आणि तो लहान आकाराचे बूट घेतो. पण बर्ट हिगीस नावाचा दुस-या रखवालदाराचे नशीब जरा चांगले होते म्हणायचे. युद्धापूर्वी तो एक उत्तम बिलीयर्ड खेळाडू होता. पण त्याच्या डोक्यात एक छोटा लोखंडी तुकडा गेला आणि त्याचे विलीयर्डस् खेळणे बंद झाले. एकाही डॉक्टरला तो तुकडा काढता आला नाही. जॅकने जेव्हा विदयुतचुंबक चालू केला तेव्हा त्याच्या डोक्यातून तो तुकडा पटकन बाहेर आला आणि त्याचा मेंदू अजूनच तल्लख झाला आणि तो परत एकदा बिलीयर्डचा निष्णात खेळाडू बनला.

दुस-या रात्री त्यांनी चुंबक परत चालू केले आणि परत भरपूर म्हणजे हजारो टन उंदीर मारले. त्यांचा राजा मुद्धा मेला आणि पुढे काय करावे ते त्यांना सुचेना. जे काही थोडे उंदीर उरले होते ते इतके घाबरले की तेथून पळूनच गेले. काही जहाजांवरून परदेशात निघून गेले. काही लंडनला गेले आणि तेथील लोकांची डोकेदुखी होऊन बसले पण कोणीच गोदीत राहिले नाहीत. चौथ्या रात्री ते कुत्र्यांना घेऊन शोधाशोध करत होते तरीही त्यांना एकही उंदीर मिळाला नाही.

तर जॅक स्मिथला १०० हजार पौंड मिळाले आणि त्याने अध्यक्षांच्या मुलीशी एका जहाजावरील समारंभात विवाह केला. त्याला चर्चमध्ये लग्न करायचे नव्हते आणि रजिस्ट्रारचे ऑफिस त्याला अजागळ वाटले मग त्याने एक जहाज भाड्याने घेतले. आणि ते समुद्रकिना-यापासून तीन मैलांवर असताना कप्तानाने त्यांचे लग्न लावले, जर ते अडीच मैलांवर असते तर त्याने लग्न लावले नसते कारण तसा मुळी कायदाच होता. त्यांना दोन मुले व दोन मुली झाल्या आणि जॅकला बी.बी.सी.येथे अभियंत्याची नोकरी मिळाली. एवढया पैशात तो खरेतर सगळे आयुष्य आरामात काहीही न करता काढू शकला असता....पण त्याला बिनतारीची इतकी आवड होती की त्याच्यावर सतत काम करत असे.

त्याच्या बहिणीने सरदाराशी लग्न केले ..मग ती सरदारीण झाली....अर्थात पूर्वी सरदारीण जितकी महत्त्वपूर्ण असे तितकी आता राहिली नाही. तिच्या बूटांना नव-याच्या बूटांना असलेल्या सोन्याच्या खिळयांना शोभावेत म्हणून हिरे जडविलेले होते. जॅकने आपले भाऊ जिम आणि चार्ल्स यांना व्यवसाय सुरू करण्यासाठी पैसे दिले. मग जिमने जादूच्या छडया ..टोप्या यात घालविले आणि तो एक जादूगार बनला आणि त्यातही उत्कृष्ट ठरला. चार्ल्स विदयापीठात रसायनशास्त्राचा पाध्यापक बनला. मी सुद्धा एक प्राध्यापक आहे आणि त्याला चांगला ओळखतो. आणि मग ते सर्वजण सुखाने नांदू लागले .

अनुवाद : नीलांवरी जोशी