इंग्रजी-मराठी पारिभाषिक संज्ञा

विकिस्रोत कडून
Jump to navigation Jump to search

शीघ्रसंदर्भ
A - B - C - D - E - F - G - H - I - J - K - L - M - N - O - P - Q - R - S - T - U - V - W - X - Y - Z

विशिष्ट ज्ञान शाखेच्या संदर्भात खास अर्थाने वापरलेल्या शब्दास 'W:पारिभाषिक शब्द' असे म्हणतात. कोणत्याही भाषेतील शब्दसमुच्चयाचे 'सामान्य शब्द' आणि 'पारिभाषिक शब्द' असे दोन प्रकारात वर्गीकरण करता येईल.

सामान्यतः 'सामान्य शब्द' हे सर्वसाधारण व्यवहारात वापरले जातात. 'पारिभाषिक शब्द' मर्यादित क्षेत्रासाठी. उदाहरणार्थ 'तत्सम' हा शब्द मराठीत सर्व सामान्यपणे जेव्हा वापरतात तेंव्हा त्याचा अर्थ 'त्या सारखे (त्या श्रेणीतले)' असा होतो.

तर मराठी व्याकरणशुद्धलेखनाच्या बाबतीत 'संस्कृत' या शब्दाचा अर्थ संस्कृत भाषेतून जसेच्या तसे -अपभ्रंश नसलेले- बदल न होता आलेले शब्द असा होतो. पहा:पारिभाषिक शब्दांची एक शीघ्र संदर्भसूची

पारिभाषिक शब्दांची गरज[संपादन]

जागतिक स्तरावर विस्तारित होणाऱ्या ज्ञानशाखा, तंत्रज्ञानात वेगाने होणारे बदल तसेच माहितीक्षेत्रातील क्रांतीमुळे सर्वच भाषांना विशिष्ट अर्थ अभिप्रेत करणाऱ्या 'पारिभाषिक शब्दांची' मोठ्या प्रमाणावर गरज भासू लागलेली आहे. वापरातील बोलीभाषांच्या शब्दभांडारांच्या मर्यादांमुळे सर्वच भाषांना विविध पुरातन भाषांतील शब्दभांडाराचा आधार घेऊन नवीन शब्द बनवण्याची गरज भासत आहे. इंग्रजी पारिभाषिक शब्द बनवण्यासाठी लॅटिन, ग्रीक व युरोपातील अर्वाचीन वा अतिप्राचीन भाषांचा आधार घेते तर भारतीय भाषा मुख्यत्वे संस्कृत भाषेच्या समृद्ध शब्दभांडाराचा आधार घेतात.

भौतिकशास्त्र, रसायनशास्त्र, प्राणिविज्ञान, तत्त्वज्ञान,गणित,अभियांत्रिकी,विधी,वाणिज्य, अर्थशास्त्र,मनोविज्ञान,भूगोल अशा अनेक ज्ञान-विज्ञान शाखांमध्ये विशिष्ट व्याख्येस न्याय देणार्‍या असंख्य शब्दांची गरज भासते.

भारतीय भाषेपासून पारिभाषिक शब्द बनवता आला नाही तर इंग्रजी व इतर भाषेतील अनोळखी शब्दाची उसनवारी करावी लागते. असा इतर भाषेतील शब्द कालांतराने मातृभाषेत 'बेमालूम'पणे मिसळून जातो व त्याचा अर्थ सांगावा लागत नाही. .

सामान्य मराठी वाचकांच्या सोयीसाठी[संपादन]

सध्या विकिपीडिया सारखा मुक्त ज्ञानकोश मराठीत निर्माण करताना योग्य शब्द मिळवणे ही एक प्रमुख व प्राथमिक गरज आहे. मराठी पारिभाषिक शब्दांचे कोश शासनदरबारी, तसेच वाचनालयांमध्ये उपलब्ध असले तरी ते छोट्या पुस्तकाच्या दुकानात सहजासहजी मिळत नाहीत. त्यामुळे असे नवे शब्द शोधणे, तयार करणे, वापरणे, रुळवणे इत्यादी सर्व जबाबदारी महाजाल(internet) वापरणार्‍या सर्व सामान्य मराठी नागरिकांसच बजावावी लागणार आहे.

या हेतूने सर्वसामान्य मराठी वाचकाच्या सोयीसाठी इंग्रजी, मराठी, संस्कृत भाषेतील इंटरनेट वर सहज उपलब्ध असलेले विविध संदर्भ या लेखात इथे दिले आहेत. तसेच जरूर ते शब्द तातडीने मिळवण्याकरिता इथे शीघ्रसंदर्भ पाहता येईल.

शब्द कसे निवडावे[संपादन]

  • मिलिंद भांडारकर लिहितात..."शब्द वापरूनच प्रचलित होतात. अवघ्या साठ वर्षांपूर्वी मराठीत मेयर, चेक, ट्रेझरर या इंग्रजी शब्दांना प्रतिशब्द नव्हते. आज आपण महापौर, धनादेश, कोषाध्यक्ष हे शब्द सर्रास वापरतो. प्रयत्‍न केल्यास आपल्यालाही तांत्रिक संकल्पनांसाठी सोपे शब्द का तयार करता येणार नाहीत ?"
  • भाषा इंडिया संकेत स्थळाला दिलेल्या मुलाखतीत ज्येष्ठ संपादक कै.श्री.पु. भागवत म्हणतात ""शब्दाला प्रतिशब्द काढू नये. एक शब्द निवडून त्याला एकापेक्षा अधिक शब्द काढावे. मूळ शब्दाला सर्वांत जवळ जाणारा आणि सोपा शब्द निवडावा. जो शब्द रुळेल तो प्रमाण म्हणून घ्यावा. मराठीमध्ये रुळलेले काही इंग्रजी शब्द तसेच ठेवा. पुढे वाचा

पारिभाषिक संज्ञा व मराठी विक्शनरी[संपादन]

येथे नमूद केलेल्या संज्ञाच सध्या शीघ्र संदर्भाकरिता उपलब्ध आहेत. तसेच या संज्ञा मराठी विक्शनरी प्रकल्पावर अपेक्षित आहेत. टप्याटप्याने येथील सर्व माहिती मराठी विक्शनरीवर स्थानांतरित केली जाईल. परंतु मराठी विक्शनरीची मांडणी अद्याप आखणीपटावरच असल्यामुळे वाचकांनी सध्या हा लेखच प्रमाण मानावा.

शीघ्र संदर्भ[संपादन]

A - B - C - D - E - F - G

H - I - J - K - L - M - N
O - P - Q - R - S - T - U
V - W - X - Y - Z


पारिभाषिक संज्ञा मुळाक्षर A ते G[संपादन]

A - B - C - D - E - F - G

मुळाक्षर A[संपादन]

वर

Access प्रवेश, पोहोच, शिरकाव Accessory (Accessories) उपसाधन (उपसाधने) Act क्रिया Action क्रियमान, कृत्य
Activate सक्रिय करणे Active सक्रिय, क्रियाशील Activity सक्रियता
Add मिळविणे, भर घालणे, जोडणे, बेरीज करणे, वाढविणे, समावेश करणे, समाविष्ट करणे, सामावून घेणे Addition भर, बेरीज, वाढ Additional अधिकचा, जास्तीचा Additive भरीचा
Add-on भरतीचे Advanced प्रगत Advertise जाहिरात, विज्ञापन
Aerospace १. पृथीवरच्या वातावरणासंबंधी आणि त्या पलीकडच्या अंतराळासंबंधी. २.विमानोड्डाणाच्या तंत्रासंबंधी Aerospace Maintenance & Regeneration Group विमानाच्या उड्डाणमार्गाची देखरेख आणि व्यवस्थापन करणारे.
Aggregate गोळाबेरीज Aggregator संचयक
Album संचयिका Allocate नेमणे Allocation नेमणूक Alphabet मुळाक्षर
Alphabetic अक्षरी Alphabetical अकारविल्हे Alphanumeric अक्षरांकी Alternative पर्यायी
Amoeboid Shape अनियमित आकार
Analysis विश्लेषण Analytics विश्लेषके Animation संचेतन Animator संचेतक
(To) Announce घोषित करणे, घोषणा-निवेदन करणे Announcement घोषणा, उद्घोषणा, निवेदन, जहिरात, प्रसिद्ध करणे Antivirus विषाणूरोधक
Apical Placentation अग्रीय (टोकाची) वार-रचना Appendix परिशिष्ट Apply लावणे, अर्ज करणे, प्रयोग करणे Application प्रयोग, वापर, अर्ज, आवेदनपत्र, मलमपट्टी, अवधान, लक्ष Approval अनुमोदन
Aquatic जलीय, जलचर
Archives लेखागार Archival लेखसंचायक Area क्षेत्र, क्षेत्रफळ, प्रदेश, विस्तार, विभाग Area Code विभागसंकेतक
Arithmetic अंकगणित Arrangement आयोजना, व्यवस्था, मांडामांड, मांडणी, विन्यास, रचना, तजवीज, इंतजाम, बस्तान, समेट, बनावट Article लेख
At मध्ये, नजीक,(या)कडे, (इतक्या) वाजता, (अमुक)वेळी, (या) ठिकाणी, स्थिती Attach संलग्न,जोडा Attachment संलग्नता, बांधणी, जोडणी, जप्ती, प्रेम, जिव्हाळा, अनुरक्ती, अनुराग, सक्ती Attribute विशेष गुणधर्म
Automate स्वयंचलित करणे Automatic स्वयंचलित Auxiliary साहाय्यकारी
Available उपलब्ध Average सरासरी
Axial Placentation अक्षीय वार-रचना Axis अक्ष

मुळाक्षर B[संपादन]

वर

Back-slash अपच्छेद (अप म्हणजे मागे) Backspace अपदिक् (अप म्हणजे मागे) Background पार्श्वभूमी Back up अनुप्रत
Bank पतपेढी Banner फलक Bandwidth वहन क्षमता Bar पट्टी, दंड, वडी
Bar Code दंडसंकेत Base-address मुक्कामाचा पत्ता, तळ-पत्ता (मूळ-पत्ता) Basel Placentation तलीय (तळाची) वार-रचना
Beta ग्रीक वर्णमालेतील दुसरे मुळाक्षर Beta Version असिद्द आवृत्ती,अपूर्ण आवृत्ती
Binary द्विमान Biology जीवशास्त्र
Blood Bank रक्तपेढी Blog Blogroll) जालपत्रिका, अनुदिनी Blogger जालपत्रलेखक Blog Post जालपत्रिकासूची, जालपत्रसूची
Blogosphere जालपत्रिकाविश्व, अनुदिनीविश्व,ब्लॉगजगत Blue Tooth नीलदंत
Bold ठळक Bookmark वाचनखूण, पृष्ठचिन्ह, पृष्ठनिशाण Bot सांगकाम्या Botanical वनस्पतिशास्त्रविषयक, वनस्पतीय, वानस्पतीक
Botanical garden वनस्पतीय उद्यान, वानस्पतीक उद्यान Botany वनस्पतिशास्त्र Box पेटी, डब्बा
Broad band विस्तारीत वहन Browse चाळणे (करमणुकीकरिता वाचणे), विचरण, विचरणे Browser न्याहाळक, विचरक
Budget अर्थसंकल्प Buffet स्वयंभोजन, स्वभोज Bug कीडा Button कळ
Buzz गुणगुण, गुंजन, गुंजारव

मुळाक्षर C[संपादन]

वर

Cache संचय, संचित, साठा,स्मृतीसाठा, साठवणी (To) Call up पाचारण करणे, पाचारणे Camera चित्रग्राहक Cancellation रद्दीकरण
Carbohydrates कर्बोदके Carbon gas कर्बवायू Card पत्र, पत्रक, पत्रिका Career व्यवसाय, कारकीर्द
Cassette ध्वनिमुद्रिका, ध्वनिफीत Category वर्ग, श्रेणी,प्रवर्ग, गट
Cell पेशी, विद्युतघट Center मध्य, केंद्र Central or Free Placentation केंद्रीय किंवा मुक्त वार-रचना Central Processing Unit (CPU) केंद्रीय प्रक्रीयक <केंद्रीय कार्यकारी एकक>
Chat गप्पा Chatroom गप्पाकक्ष Character वर्ण, चारित्र्य Character Set वर्णमाला
Change बदल Charge भार (To) Check mail संदेश तपासणे Cheque धनादेश
Circuit (Circuitry) मंडल (परिमंडल, परिपथ) Circumference परिघ, घेरा, परिधि, वेढा Circumflex स्वरितचिन्ह (^), स्वरितचिन्ह असलेला
Classification वर्गीकरण Click टिचकी, कळ Clockwise दक्षिणावर्त, घड्याळाप्रमाणे डावीकडून उजवीकडे जाणारा Clone प्रतिकृती, प्रतिरूप
Code (Coding) संकेत (संकेतन) Colon विसर्ग Colour / Color रंग Content management system मजकूर व्यवस्थापन प्रणाली
Continental खंडाचा, खंडविषयक Continental Drift खंडीय प्रवाहन, खंडीय हालचाल Contribution योगदान
Comma स्वल्पविराम Comment अभिप्राय, टिप्पणी Community समूह, समुदाय, गट, मंडळ Compact Disc (CD) चकती
Compatible (Compatibility) अनुरूप, सुसंगत (अनुरूपता, सुसंगती) Compile (Compiler) संकलन (संकलक) Complex क्लिष्ट, जटिल Complex {Architecture} संकुल {वास्तुविषयक}
Compose message संदेश तयार करा, संदेश बनवा, संदेश लिहा Composer रचनाकार, रचयिता Compound संयुक्त, संयुग, कुंपण Comprehensive व्यापक
Computer संगणक Configure (Configuration) एकत्र जुळवणे, एकत्र मांडणी करणे, बाह्यस्वरूप, आकार, (<स्वरूपण>) (To) Confirm खात्री करणे, निश्चिती करणे Confirmatory email निश्चितक विपत्र
Confirmatory Test निश्चितक परिक्षा Connect जोडणे Console सांत्वन, समाधान Constant स्थिरांक, स्थिर , अचल
Contact संपर्क Content <भरवण>, मजकुर Continent खंड Control नियंत्रण
Control नियंत्रण Control key नियंत्रक कळ, नियामक कळ Convention परंपरा, रूढी, पद्धत Conversion परिवर्तन, बदल
Cookie स्मृतिशेष Coordinates गुणक, अंश (रेखांश, अक्षांश) Copy प्रत, नक्कल Copyright प्रताधिकार
Core memory <गाभास्मृति, मध्यस्मृति, अंतःस्मृती>, केंद्रीय स्मृती Count संख्या, मोजणे, गणना Cousin मातृक किंवा पैतृक नातेभावंड, नातेभावंड
(To) Crack छेदन, छेदणे Cracker छेदक Crawl रांगणे Credit Card पतपत्र
Cross-reference उलट संदर्भ Cryptogams अपुष्प वनस्पती
Culture (Cultural Heritage) संस्कृती (सांस्कृतिक वारसा) Current प्रचलित (विशेषण म्हणून), प्रवाह (नाम म्हणून) Cursor बाण, निर्देशक, (परीनिर्देशक) Customer Support Executive कार्यकारी ग्राहक मदतनीस
(To) Cut कापणे
Cycle चक्र, दुचाकी

मुळाक्षर D[संपादन]

वर

Dance नृत्य Dark गडद Datum (Data) विदित, आरंभिक माहिती Database विदितागार, माहिती-तळ, (Data साठी आणखीन चांगला शब्द शोधता येईल.)
Debuging कीडविमोचन Decimal (Decimal Point) दशमान (दशांश) Decode (Decoding) संकेत उकलन Default स्वयंचलित (संगणकासंदर्भात), अध्याऋत, अभावात्मक
Definition व्याख्या (To) Degenerate अवनति होणे, र्‍हास होणे, अधोगतीला जाणे, अधःपतन, बिघडणे, निकृष्ट बनणे Design आखणी Desk पट
Detailed सविस्तर Developer रचयिता, बनवणारा, तयार करणारा
Diagram आकृती Dicky (in car) सामानवाहक, सामानाचा मागचा कप्पा
Digit अंक Digital अंकिक Digital Camera अंकीक चित्रग्राहक
Digital Versatile Disc (DVD) अंकिक बहुविध चकती (अंबच) Digital Video Disc (DVD) अंकिक चित्रिय चकती (अंचिच) Digital Versatile / Video Disc Recordable (DVDR) अंकिक बहुविध नोंदक चकती (अंबनोंच),अंकिक चित्रिय नोंदक चकती (अंचिनोंच) Digital Versatile / Video Disc ReWritable (DVDRW) अंकिक बहुविध पुनर्नोंदक चकती (अंबपुर्नोंच), अंकिक चित्रिय पुनर्नोंदक चकती (अंचिपुर्नोंच)
Directory मार्गदर्शिका, निर्देशिका Disable बंद करणे, अक्षम Disambiguation (Disambiguity) निसंदग्धीकरण (निसंदग्धता) Disc/k चकती, तबकडी, बिंब, मंडल (उदा. solar disc => सूर्यबिंब)
Display (To Display) प्रदर्शन (प्रदर्शित करणे), दाखवणे, देखावा, प्रकटन, प्रकटक, प्रदर्शक Distortion विरूपण, विपर्यास, विकृती
Document दस्तऐवज Domain क्षेत्र, कार्यक्षेत्र, विचारक्षेत्र Domain Name System क्षेत्रनामप्रणाली (To) Download उतरवणे
Draft मसुदा Drag and Drop ओढून टाका Drill गिरमिट Drift ओढ, खेच, प्रवाहाबरोबर वाहत जाणे
(To)Drive चालविणे, चलन
Download उतरवणे, उतरवून घेणे
Dynamo विद्युत जनित्र

मुळाक्षर E[संपादन]

वर

Ecologist पर्यावरणशास्त्रज्ञ, पर्यावरणतज्ञ, पर्यावरण अभ्यासक Ecology परिस्थितीकी, पर्यावरणशास्त्र Eco friendly परिमित्रक, परिमित्रतेने e-commerce संगणकीकृत वाणिज्य
Edit (Editor) संपादन (संपादक)
Elimentary सुलभ, सोपे, प्राथमिक स्वरुपाचे, आरंभिक Elements मूलद्रव्ये, मुलतत्वे, सूक्ष्मघटक, पंचमहाभूते
Email संदेश, विरोप, विपत्र Emoticon भावना, भावचिन्हे Emphasis जोर Employer नियोक्ता
Enable चालू करणे, सक्रिय करणे, कार्यक्षम करणे Encode (Encoding) संकेत स्वरूपण, संकेतात रुपांतर करणे (संकेत रूपांतरण) Encoded सांकेतिक Enter (Entry) प्रवेश करणॅ (प्रवेश)
Equal बरोबर, समान Equilibrium समतोल, समतुलना Equilibrium Constant संतुलन स्थिरांक
Erase खोडणे Error त्रुटी/त्रुटी, चुक,चुका
Escape(Esc key) विमोचन, सुटका, निसटणे, पसार, पळवाट, पळून जाणे, गच्छंती, कूच, झुकांडी देणे, झुगारा, बहिर्गमन, निभणे, निभाव (विमोचन कळ, बहिर्गमन कळ, बहिर्गामी कळ)
Et Cetera, etc वगैरे, इत्यादी
Exchange विनिमय Exit बाहेर Expected अपेक्षित Explore शोध घेणे
Export निर्यात Express (1) व्यक्त करणे Express (2) जलदगती गाडी, द्रुतगती गाडी,किंवा नुसतेच जलदगती, द्रुतगती किंवा त्वरा Express way द्रुतगती मार्ग
Extension विस्तार External (External Link) बाह्य (बाह्य दुवा)

| Environment || वातावरण

मुळाक्षर F[संपादन]

वर

Facility सुविधा FAQ नेहमी विचारलेले(विचारले जाणारे?) प्रश्न Fatal घातक
Feature विशेषता Feed ग्रहण (subscription च्या संदर्भात)भरण, पोषण, पुरवणे, पुरवठा Feedback पुनर्भरण,प्रतिसाद Fetch आणणे, जाऊन आणणे
Fibre Optics तंतुप्रकाशक File प्रक्रमिका, नस्ती (शासकीय शब्द), संचिका Filter गाळणयंत्र, गाळणे, चाळून घेणे Filterpaper गाळणकागद
Find शोधणे Finder शोधक, शोधकर्ता Firewall जहालकवच
Flag ध्वज, झेंडा, निशाण Floppy चुंबकचकती
Folder धारिका, संचयिका Font टंक, छाप, वळण Form (Format) रूप (स्वरूप) Forum चर्चापीठ
Forward अग्रप्रेषण, पुढारलेला, पुढे
Frame चौकट Free or Central Placentation मुक्त किंवा केंद्रीय वार-रचना
To Fuse (Electric Fuse) सांधणे, वितळणे (वितळक)

मुळाक्षर G[संपादन]

वर

मुळाक्षर H N[संपादन]

H - I - J - K - L - M - N

मुळाक्षर H[संपादन]

वर

Gadget साधन, कळ, यंत्रसाधन Gap खंड Garbage कचरा Gate फाटक
Get मिळवणे, प्राप्त करणे Gene जनुक
Glyph लिपीचिन्ह
Goto ...च्याकडे जाणे, ...कडे जा
Grade श्रेणी Grammar व्याकरण Graphical प्रतिमांवर आधारित Group समूह, गट(जीवशास्त्रीय संदर्भात), मंडळ, समुदाय
Gulf आखात
GUI चिञस्वरूप आज्ञाफलक
(To) hack कब्जा करणे Hacker कब्जक, कब्जेदार, कब्जा करणारा Handshake हस्तांदोलन Hangar विमानगृह
Hanger टांगणी, अडकवणी Hard-disk स्थिर-चक्रिका Hardware यंत्रांकन (यंत्रांकित भाग), जड भाग / सामान, धातुयुक्त भाग / सामान
Header शीर्षक Helicopter चक्रपाख Help मदत, साहाय्य Herb नाजूक वनस्पती
Heritage वारसा
Hexadecimal षोडषमान
(To) Highlight चमकवणे, परिप्रकाशणे High speed जलदगती, तीव्रगती History इतिहास Hit आघात, टोला, लाभ
Home घर, गृह Home-Page मुख्यपृष्ठ Host आयोजक, यजमान
Hydra जलव्याल Hydried उदिद Hydrocarbon उत्कर्ब Hydroelectric जलविद्युतीय
Hydrogen (gas) उद्जन (वायू) Hydrosatic जलस्थैतिक, द्रवस्थैतिक Hydrostatic Equilibrium द्रवस्थैतिक संतुलन Hydroxide उत्प्राणिद
Hyperbola (Hyperbolic) अपास्त (अपास्तिक) Hyperbole अतिशयोक्ती Hyperlink अतिदुवा Hypertext अतिसंहिता
Hypertext Markup Language (HTML) अतिसंहिता अंकनभाषा Hypertext Transfer Protocol (HTTP) अतिसंहिता स्थानांतरण शिष्टाचार Hypoyhesis गृहीतक

मुळाक्षर I[संपादन]

वर

Ice-cream शीतलक Icon चिह्न, प्रतीक
Idol आदर्श
(To) ignore दुर्लक्षित करणे Ignore list दुर्लक्षित सूची
Image चित्र Image Stabilization चित्र-स्थिरीकरण Image Stabilizer चित्र-स्थिरक Import आयात
Improvement सुधारणा
Inbox आलेले संदेश Index समास Index (Index Key) सूची, अनुक्रमणिका Information माहिती
Input निवेश (To) Insert समावेश करणे, अंतर्भूत करणे (To) Install, Installation उभारणे, उभारणी Instruction सूचना
Instruction Sign सूचकचिन्ह Interface आंतरपीठ Internet आंतरजाल Internet Protocol Address (IP Address) आंतरजाल शिष्टाचार पत्ता
Internet Service Provider (ISP) आंतरजाल सेवा पुरवठादार Internet Speed Tester आंतरजाल वेग परीक्षक Interruption (To Interrupt) अडथळा, खंड (खंडित करणे) Interval मध्यंतर
Intranet आंतरिकजाल
(To) Impress प्रभावित करणे, छाप पाडणे
Italics तिरके Item नगImpress----a


मुळाक्षर J[संपादन]

वर

Join जोडणे, सदस्य बनणे, सामील होणे

मुळाक्षर K[संपादन]

वर

Key कळ Keyboard कळपटल, कळपट, कळफलक, कळसंच, कुंजीपटल, कुंजीपट, कुंजीफलक Kill समाप्त करणे

मुळाक्षर L[संपादन]

वर

Label संदर्भनामे, नामपत्र, खूणचिठ्ठी Lane मार्गिका, गल्ली, बोळ Language भाषा Laptop उरुसंगणक
Latitude अक्षांश Layer स्तर, थर Layout आरेखन
liability दायित्व, जबाबदारि Light प्रकाश Linear रेषीय Link दुवा List यादी, सुची
Literature साहित्य
Local स्थानिक, स्थानीय Local Area Network (LAN) स्थानीय क्षेत्र जालक (स्थाजा) location जागा, स्थान Logarithm (घातांकन)
Login प्रवेश, आगमन Logo बोधचिन्ह Log Out गमन, निर्गमन, बहिर्गमन Longitude रेखांश
Loss तोटा, हानी Loudspeaker ध्वनिक्षेपक, पोंगा, कर्णा, ध्वनिविस्तारक Lower case छोटे अक्षर, लघुरूप
Luminiscence प्रकाशमानता, आभा Luminosity तेजस्विता Luminous प्रकाशमान, तेजस्वी

मुळाक्षर M[संपादन]

वर

Magnet(Magnetic) चुंबक (चुंबकीय) Magnitude परिमाण, परिमिती, प्रत, आकार, आवाका Mail टपाल Mailing-list टपालाची यादी (टपालयादी)
Maintenance निर्वाह, परिरक्षण, योगक्षेम Manager(Management) व्यवस्थापक(व्यवस्थापन) Mall महाभांडार, महाबाजार Map मानचित्र, नकाशा
Marginal Placentation उपांतिक (कडेची) वार-रचना Markup अंकन Margin समास Mass वस्तुमान
Mayor महापौर
Medium मध्यम, माध्यम Memory स्मृती Membership सदस्यत्व, सदस्यता (To) Mention नमूद करणे, उल्लेख करणे
Menu यादी, सूची Message संदेश Messenger निरोप्या, दूत
Migration स्थानांतरण Mirror-site प्रतिस्थळ, (प्रतिबिंब स्थळ)
Mobile (phone) भ्रमणध्वनी Moderator नियामक Modem (आरोहावरोहक)(मोडेम) Monitor Screen प्रदर्शक, दर्शकपट, दर्शकपटल
Mouse मूषक Mouse pointer मूषकबाण Movie चित्रपट

मुळाक्षर N[संपादन]

वर

Nature निसर्ग Natural नैसर्गिक Navigation जालपर्यटन
Necessary आवश्यक Netiquette जालशिष्टाचार Netizen जालवासी Network जालक, जालविस्तार, उद्योगाचे पसरलेले जाळे
Newsgroup वृत्तसमूह, बातमी-समूह, वार्तासमूह Newsreader वृत्तवाचक, वाचक, बातमी-वाचक, वार्तावाचक
Node (रोपट्याचा) डोळा, गुडघ्याची सूज, गाठ Norms प्रमाणके Note नोंदविणे, नोंद Nucleus केंद्रक (पेशीकेंद्रक, अणुकेंद्रक)

मुळाक्षर O-U[संपादन]

O - P - Q - R - S - T - U

मुळाक्षर O[संपादन]

वर

Offline अनुपलब्ध Online उपलब्ध, जालसंपर्कीत Online Shopping जालखरेदी, जालीय खरेदी Online Store जालभांडार, जालदुकान, जालीय दुकान
Opacity अपारदर्शकता Opaque अपारदर्शक Open Content मुक्त मजकूर Open Source मुक्त स्रोत
Operator संचालक, यंत्रचालक Operating System संचालन प्रणाली, कार्यप्रणाली(वापरप्रणाली) Optical Illusion दृष्टीभ्रम Opinion मत Option पर्याय, विकल्प
Output उत्पादिते, उत्पादन, उत्पादन केलेला माल
Owner (for groups and communities) मालक, चालक, संचालक oxygen (gas) प्राणवायू

मुळाक्षर P[संपादन]

वर

Paper कागद, लिखित किंवा छापील कागदपत्रं, प्रश्नपत्रिका, वर्तमानपत्र, तज्ञांपुढे वाचायचा प्रबंध Paragraph परिच्छेद Parameter मानक, परिमाण Parital Placentation भित्तीय किंवा परिघीय वार-रचना
Password संकेतशब्दपरवलीचा शब्द (कूटशब्द) Passport पारपत्र Paste डकवणे, चिकटवणे Pause (music, video etc.) विराम, विश्राम
Pay Load अधिदानभार
Permalink स्थिरदुवा, स्थायी दुवा Person व्यक्ती Pest कीड
Phanerogams सपुष्प वनस्पती Photograph छायाचित्र, प्रकाशचित्र Photography छायाचित्रण, प्रकाशचित्रण
Picture चित्र Ping पाचारण करणे, पाचारणे
Placenta वार, गर्भवेष्टन Placentation (in plants - Axial, Parietal, Basal, Apical, Marginal, Free or Central) वार-रचना (वनस्पतींमध्ये - अक्षीय, भित्तीय किंवा परिघीय, तलीय(तळाची), अग्रीय(टोकाची), उपांतिक (कडेची), मुक्त किंवा केंद्रीत) Play (music, video etc.) चालू करा, सुरूवात Play नाटक, चित्रपटाचा खेळ
Pliers पक्कड Plug-in (for computer) जोडणी
Pop-up प्रकटन, उघडणे, प्रकटक Pop-up window प्रकटक खिडकी Port बंदर Portal प्रवेशद्वार
Post (To Post) टपाल, डाक (टपाल पाठविणे, पाठविणे)
Preferences आवड, पसंती Preview पूर्वावलोकन, झलक दाखवणे Print मुद्रण, छापणे Priority अग्रक्रम, प्राधान्य
Processor प्रक्रियक Program कार्यक्रम, संगणक प्रणाली (आज्ञावली) Profile माहिती, रुपरेखा, रुपरेषा Project प्रकल्प
Protocol शिष्टाचार Proxy प्रतिनिधी
Pseudopodia / Pseudopodium छद्मपाद
Public Domain सार्वजनिक

मुळाक्षर Q[संपादन]

वर

Quality गुणवत्ता Quick शीघ्र Quick reference शीघ्र संदर्भ
Quick time plug-in जलदगती जोडणी Queue रांग

मुळाक्षर R[संपादन]

वर

Reader वाचक Reference संदर्भ Regeneration निर्मिती, पुनर्निर्मिती, पुन्हा उत्पन्न करणे / होणे Related निगडित
Relative नातलग / सापेक्ष Relativity सापेक्षता Relevance औचित्य Relevant संबंधित, प्रस्तुत, तदनुषंगिक, समयोचित, सुसंबद्ध, निगडित
Reminder स्मरणिका, स्मरणक Remote Control (for TV etc.) दूरनियंत्रक Remote Sensing दूरसंवेदन, दूरसंवेदनशील Rename नाव बदलणे
Report अहवाल Reply प्रत्युत्तर, उत्तर Request विनंती Result निकाल
Resource (Resources) स्त्रोत Revenue महसूल Review समीक्षा, परिक्षण, आढावा, पुनरावलोकन, समालोचन, तपासणी, आलोचना Revision उजळणी, फेरतपासणी, सुधारीत आवृत्ती, पुनरावृत्ती
Router पथदर्शक, वाटाड्या
RSS अत्यधिक सरल प्रकाशन Registrar Deputy Registrar उपकुलसचिव,

मुळाक्षर S[संपादन]

वर

Saint संत Save जतन करणे, वाचवणे Save as या नावाने जतन करा
Scanned Image चित्रप्रत Scanning विद्युतचुंबकीय आरेखन Scrap चिठोरा Scrap Book चिठोरेवही
Screen प्रदर्शक, दर्शकपट, दर्शकपटल, पडदा Screenshot चित्रवेध Script (Computer Script) लिपी (आज्ञावली)
Search engine शोधयंत्र Security सुरक्षा Select निवडणे Server जालवितरक, अधिसेवक
Service सेवा Settings संस्थापने (To) Setup (प्रती) प्रस्थापित करणे, स्थापन करणे
Shift (key) बदलणे (कळ) Shopping center खरेदीकेंद्र Shopping Complex खरेदीसंकुल Short Period लघुकाल
Shortage कमतरता Shower तुषारक
Sign चिन्ह Signal संदेशक, सांकेतिक खूण, इशारा, इशारत, निशाणी, संदेश Site स्थळ, जागा Size माप, आकार
Sky Walk आकाश मार्गिका
Slideshow चलचित्रफीत
Snippet झलक
Source स्रोत Software आज्ञांकन, (संगणक आज्ञा)
Spacebar अंतरक Spam अनैच्छिक, नकोसे Spark ठिणगी, चमक Speed गती
Spell Checker शब्द तपासक, शुद्धीचिकीत्सक spore बीज, बीजाणू Sporangium बीजाणूधानी, बीजाणूकोश Sporogenous बीजोत्पादित, बीजोत्पादन
Sporocarp बीजकवचिका Spreadsheet पृष्ठपुरवणी, प्रसारकपृष्ठ Spyware हेरसावधक (हेरगीर)
Square चौरस
Stand - for keeping things,(Stand for vehicles) रचक, स्थापक, मांडणी (वाहनतळ) Standard मानक / प्रमाण Stop (music, video etc.) थांबवा, थांबवणे, शेवट Stop (for bus) थांबा
Studio for cinema, photos, Art) चित्रणस्थळ, प्रकाशचित्रालय / प्रकाशचित्रस्थळ, कलाचित्रस्थळ
Sub-continent उपखंड Subcribe ( By email / By RSS) अधिग्रहण करा (संदेशातून / असप्र - अत्याधिक सरल प्रकाशन) Subscriber अधिग्राहक Subscription अधिग्रहित
(To) Submit सादर करणे, सुपूर्द करणे, पेश करणे, विचारार्थ पुढे जाणे, शरण जाणे, पड खाणे Suggest सुचविणे Support आधार, पाठिंबा, मदत, सहाय्य Surf भ्रमंती, भटकंती
System Operator , Sysop प्रणाली संचालक System Administrator प्रणाली प्रशासक System प्रणाली, तंत्र

मुळाक्षर T[संपादन]

वर

Tab खुणेची फीत, उपखिडकी (संगणकाच्या संदर्भात एका खिडकीत -window उघडणारी) Table तक्ता Tag (Meta tag) (Tag in blog) खूण (संदर्भ खूण) (शब्दखूण)
Telephone दूरध्वनी Template आकृतीबंध, रचनाबंध, साचा Terminal टोक, टोकाचे Terminology परिभाषा
Terminological पारिभाषिक Text संहिता, पाठ्य, मजकूर
Theorem प्रमेय Thinker विचारवंत Thumbnail सूक्ष्मचित्र
Toilet प्रसाधनगृह, स्वच्छतागृह Tool साधन Toolbar साधनपट्टी Toolbox साधनपेटी
Torque चक्रीय प्रेरणा, चक्रीय बल Tower मनोरा, बुरूज, गोपुर
Track माग घेणे, मागोवा Trademark व्यापारचिन्ह, व्यापारमुद्रा Traffic वाहतूकीची कोंडी Translation भाषांतर
Transiliteraion रुपांतरण (इंग्रजी अक्षरांचे मराठीत/देवनागरीत) Trash कचरा, निरूपयोगी, संदेश-कचरा, Treasurer खजिनदार, कोषाध्यक्ष, कोषपाल
Type टंकन करणे, टंक, प्रकार

मुळाक्षर U[संपादन]

वर

Underline अधोरेखित Uniform Resourse Identifier (URI) एकत्र स्त्रोत ओळखकनारा Uniform Resourse Locator (URL) एकत्र स्त्रोत निश्चित करनारा (एस्त्रोनि - जाळीय पत्ता)
Ultra Violet अतिनील
Update / Updates अद्ययावत, सुधारित / सुधारित (अनेक सुधारित आव्रुत्या) Upload वर भरवणे, चढवणे, पाठवने Upper case मोठे अक्षर
Ultra अति, टोकाचा Ultra High-Speed Broadband Network अति जलदगती विस्तारीत-वहन जाळ Ultrasonic अतिकंपन, प्रचंड कंपनसंख्या असलेले Ultra Violet अतिनील
URI एकत्र स्त्रोत ओळखक URL एकत्र स्त्रोत निश्चितक (एस्त्रोनि - जाळीय पत्ता), जाळीय पत्ता
Username सदस्य नाव USB (Universal Serial Bus) वैक्रस्था (वैश्विक क्रमिक स्थानांतरक)

मुळाक्षर V-Z[संपादन]

V - W - X - Y - Z

मुळाक्षर V[संपादन]

वर

Vast अथांग/अफाट
Vending Machine विक्रीयंत्र, वस्तुविक्रीयंत्र
Virus - AntiVirus विषाणू - विषाणूरोधक Visitor अभ्यागत, अतिथी, पाहुणा
VoIP जाळध्वनी

मुळाक्षर W[संपादन]

वर

Water जल, पाणी Water mark जलांकन, (जलसदृश अंकन) Wafers काचर्‍या, चकत्या
Web जाळ Web address जाळपत्ता Webpage जाळपान Weblog Publishing System जाळपत्रिका प्रकाशन प्रणाली
Webmaster जाळप्रमुख Website संकेतस्थळ Week आठवडा, सप्ताह Weekend सप्ताहांत
Widget संकेतसाधन (संगणकीय लिपी संदर्भात), तंत्रसाधन, साधन
Word शब्द (Intelligent)Word संज्ञा Window खिडकी, गवाक्ष
World Wide Web विश्वव्यापी जाळ

मुळाक्षर X[संपादन]

वर

XML विस्तारीत अंकनभाषा
मुळाक्षर Y[संपादन]

वरमुळाक्षर Z[संपादन]

वर

Zip एकत्र बांधणे - सोडून वेगळे करणे


संदर्भ बाह्य दुवे[संपादन]

हेसुद्धा पाहा[संपादन]