Jump to content

अंगारवाटा...शोध शरद जोशींचा/परिशिष्ट ५ : शेतकरी संघटनेची शपथ

विकिस्रोत कडून
परिशिष्ट-५
 

शेतकरी संघटना

शपथ
मी शपथ घेतो की,
शेतकऱ्याचे लाचारीचे जिणे संपवून
त्यांना देशातील इतर नागरिकांप्रमाणे
सन्मानाने व सुखाने जगता यावे
याकरिता
'शेतीमालाला रास्त भाव'
या एक-कलमी कार्यक्रमासाठी
संघटनेचा पाईक म्हणून
मी सर्व शक्तीने प्रयत्न करेन.
या प्रयत्नात पक्ष, धर्म, जात वा इतर कोणत्याही भेदाभेदांचा
अडथळा येऊ देणार नाही.

(शेतकरी संघटनेच्या प्रत्येक सभेत सर्वजण उभे राहून, वळलेली मूठ उंचावत, सामुदायिकरीत्या ही शपथ घेत.)



लेखकपरिचय

 भानू काळे, सी २, गार्डन इस्टेट, नागरस रस्ता, औंध, पुणे ४११ ००७.
 स्थिरभाष : (०२०) २५८८३७२६ चलभाष : ९८५०८१००९१ .
 इमेल : bhamukale@gmail.com

लेखन :

  • तिसरी चांदणी : राजकीय पार्श्वभूमीवरील कादंबरीलेखन स्पर्धेतील पारितोषिकविजेती कादंबरी, पहिली आवृत्ती : मॅजेस्टिक प्रकाशन, मार्च १९७९, दुसरी आवृत्ती, मौज प्रकाशन, नोव्हेंबर २०१३
  • कॉम्रेड : कामगारचळवळीच्या पार्श्वभूमीवरील कादंबरी, पहिली आवृत्ती : ग्रंथाली प्रकाशन, जून १९८९, दुसरी आवृत्ती : मौज प्रकाशन, नोव्हेंबर २०१३
  • बदलता भारत : जागतिकीकरणाच्या लाटेत बदलणाऱ्या - तसेच न बदलणाऱ्या - भारताचा प्रवासवर्णनाच्या माध्यमातून घेतलेला शोध, मौज प्रकाशन, ऑगस्ट २००५ (सध्या पाचवी आवृत्ती) (पु. ल. देशपांडे स्मृती पुरस्कार, केशवराव कोठावळे स्मृती पुरस्कार, पुणे मराठी ग्रंथालयाचा न. चिं. केळकर पुरस्कार)
  • अंतरीचे धावे... : विविध सामाजिक-सांस्कृतिक विषयांवरील लेखांचा संग्रह, (सध्या तिसरी आवृत्ती) मौज प्रकाशन, जून २००९ (पुणे नगर वाचन मंदिर पुरस्कार, महाराष्ट्र साहित्य परिषदेचा सर्वोत्कृष्ट ललित ग्रंथासाठीचा पुरस्कार)
  • रंग याचा वेगळा... दत्तप्रसाद दाभोळकर लेखन आणि जीवन : (संपादन व प्रस्तावना), कॉन्टिनेन्टल प्रकाशन, ऑगस्ट २०१४ (सध्या दुसरी आवृत्ती)
  • अजुनी चालतोची वाट... रावसाहेब शिंदे जीवन आणि कार्य : ऊर्मी प्रकाशन, पहिली आवृत्ती डिसेंबर २०१४ (सध्या पाचवी आवृत्ती)

संकीर्ण :

  • मुंबईतील हिंमत या इंग्रजी साप्ताहिकातून १९७३मध्ये पत्रकारिता सुरू. १९७८ ते १९९४ मुंबईला मुद्रणव्यवसायात. १९९५मध्ये पुण्याहून अंतर्नाद या वाङ्मयीनवैचारिक मासिकाची सुरुवात. मराठीतील एक महत्त्वाचे मासिक म्हणून गेली बावीस वर्षे वाचक अंतर्नादकड़े पाहत आहेत.
  • शंकरराव किर्लोस्कर प्रतिष्ठान, प्रभाकर पाध्ये प्रतिष्ठान, पु. भा. भावे स्मृती समिती, भाऊसाहेब थोरात स्मृती समिती, मुंबई मराठी पत्रकार संघ, महाराष्ट्र साहित्य परिषद व अन्य अनेक प्रतिष्ठित संस्थांच्या पुरस्कारांनी सन्मानित
  • अध्यक्ष, समरसता साहित्य संमेलन, इचलकरंजी, २००८
  • Change for Better या नामांकित इंग्रजी त्रैमासिकाचे संस्थापक-संपादक
  • अनेक सामाजिक संस्थांशी निकटचा संबंध. विविध परिषदांमधील सहभागासाठी वीसहून अधिक देशांमधून प्रवास.

अंगारवाटा...
शोध
शरद जोशींचा
भानू काळे

शेतीमालाला रास्त भाव दिल्याशिवाय शेतकऱ्यांचे व एकूणच देशाचे दारिद्रय कधीही दूर होणार नाही हे प्रथमत: शरद जोशी यांनी मांडले. 'इंडिया' विरुद्ध भारत' हे भारताचे मूलभूत दुभंगलेपण अधोरेखित करणारेही ते पहिलेच.
शेतकरी आंदोलन हे स्वातंत्र्योत्तर भारतातील सर्वांत मोठे जनआंदोलन. केवळ स्वच्छ विचाराच्या बळावर, पाठीशी पैशाचे, घराण्याचे, जातीचे वा सत्तेचे कुठलेही बळ नसताना त्यांनी शेतकऱ्यांची संघटना उभारली. शरद जोशी हे विचाराच्या ताकदीचे जाज्वल्य प्रतीक आहे.
शरद जोशींचे संपूर्ण सहकार्य लाभलेले हे चरित्र म्हणजे त्यांचे व्यामिश्र व्यक्तिमत्त्व, कौटुंबिक जीवन, भारतीय टपाल सेवेतील दहा व स्वित्झर्लंडमधील आठ वर्षे, शेतकरी संघटनेची वाटचाल यांचा सखोल शोध आहे. अनेक घटना वाचकांपुढे प्रथमच आणणारा. चाकणपासून स्वित्झर्लंडपर्यंत शेकडो जणांना भेटून लिहिलेले हे चरित्र म्हणजे एका देदीप्यमान कालखंडाचे दस्तावेजीकरण आहे.


शेतकरी संघटना

किंमत ६०० रुपये