Jump to content

अंगारवाटा...शोध शरद जोशींचा/परिशिष्ट १ : शरद जोशी जीवनपट : शंभर प्रमुख घटना

विकिस्रोत कडून


परिशिष्ट-१

शरद जोशी जीवनपट : शंभर प्रमुख घटना


क्रमांक दिनांक घटना
३ सप्टेंबर १९३५ सातारा येथे जन्म
६ जून १९५१ पार्ले टिळक विद्यालय, मुंबई, येथून अकरावीची परीक्षा उत्तीर्ण
२८ जून १९५७ सिडनम महाविद्यालय, मुंबई, येथून एम.कॉम. उत्तीर्ण
१ ऑगस्ट १९५८ भारतीय टपाल खात्यातील नोकरी सुरू
२५ जून १९६१ मुंबईच्या लीला कोनकर यांच्याशी विवाह
७ एप्रिल १९६२ ज्येष्ठ कन्या श्रेया यांचा जन्म
२३ नोव्हेंबर १९६३ कनिष्ठ कन्या गौरी यांचा जन्म
२० ऑगस्ट १९६७ फ्रान्समधील सात महिन्यांचे प्रशिक्षण सुरू
३० एप्रिल १९६८ भारतीय टपालखात्यातील नोकरीचा राजीनामा
१० १ मे १९६८ युनिव्हर्सल पोस्टल युनियन, स्वित्झर्लंड, येथे रूजू
११ १ मे १९७६ स्वित्झर्लंडमधील नोकरी सोडून भारतात परत
१२ १ जानेवारी १९७७ आंबेठाण, तालुका खेड, येथे शेतीला सुरुवात
१३ २५ मार्च १९७८ चाकण येथील पहिले कांदा आंदोलन
१४ ८ ऑगस्ट १९७९ शेतकरी संघटना स्थापन
१५ ३ नोव्हेंबर १९७९ 'वारकरी' साप्ताहिक सुरू
१६ २४ जानेवारी १९८० वांद्रे-चाकण रस्त्यासाठी ६४ किलोमीटर महामोर्चा
१७ १ मार्च १९८० पुन्हा कांदा आंदोलन. पहिले रास्ता रोको.
१८ ८ मार्च १९८० पहिले बेमुदत उपोषण सुरू
१९ १६ मार्च १९८० वाढीव भावाने कांदा खरेदी सुरू. आंदोलनाची यशस्वी सांगता. उपोषण समाप्त.
२० ६ एप्रिल १९८० आळंदी येथे पहिले कार्यकर्ता शिबिर सुरू
२१ ३ मे १९८० पोलिसांकडून पहिली अटक. आत्महत्येचा आरोप.
२२ १५ ऑगस्ट १९८० निफाड येथे ऊस आंदोलनाला सुरुवात
२३ ९ ऑक्टोबर १९८० निफाड सहकारी साखर कारखान्याच्या सर्वसाधारण सभेत उसाला ३०० रुपये टन हा भाव मिळायला हवा असा ठराव संमत
२४ १० नोव्हेंबर १९८० खेरवाडी येथील 'रेल रोको'मध्ये दोन शेतकरी पोलीस गोळीबारात हुतात्मा. संघटनेतर्फे हा दिवस हुतात्मा दिन म्हणून साजरा होतो.
२५ ११ नोव्हेंबर १९८० नाशिक कोर्टात शरद जोशी यांना हजर केले गेले. इतर ३१,००० शेतकरीही अटकेत
२६ २७ नोव्हेंबर १९८० मुख्यमंत्री अंतुले यांच्याकडून टनाला रुपये ३०० हा भाव मंजूर
२७ १४ डिसेंबर १९८० पिंपळगाव बसवंत येथे विजय मेळावा
२८ १ फेब्रुवारी १९८१ निपाणीतील सुभाष जोशी यांच्यासमवेत पहिली सभा
२९ २४ फेब्रुवारी १९८१ तंबाखू शेतकरी व विडी कामगार यांची निपाणीत पहिली संयुक्त सभा. सात प्रमुख मागण्या सादर.
३० २६ फेब्रुवारी १९८१ अंबाजोगाई येथे प्रशिक्षण शिबिर सुरू
३१ १४ मार्च १९८१ निपाणी तंबाखू आंदोलन सुरू, १५,००० शेतकरी 'रास्ता रोको'त सामील.
३२ ६ एप्रिल १९८१ पोलिस गोळीबारात १२ शेतकरी हुतात्मे. शरद जोशी बेल्लारी तुरुंगात.
३३ १ जानेवारी १९८२ संघटनेचे सटाणा येथील पहिले अधिवेशन सुरू. खुल्या अधिवेशनाला तीन लाख शेतकरी हजर.
३४ २८ मे १९८२ पंजाबातील 'भारती किसान युनियन'ची बैठक
३५ २८ जून १९८२ महाराष्ट्रात दूध आंदोलन सुरू. चार दिवसांनी माघार.
३६ ३० ऑक्टोबर १९८२ वर्धा येथे देशभरातील शेतकरी प्रतिनिधींचा मेळावा व 'आंतरराज्य समन्वय समिती'ची स्थापना
३७ ३१ ऑक्टोबर १९८२ पत्नी लीला जोशी यांचे पुणे येथे निधन
३८ २० फेब्रुवारी १९८३ 'शेतकरी संघटना - विचार आणि कार्यपद्धती','प्रचलित अर्थव्यवस्थेवर नवा प्रकाश' व 'भारतीय शेतीची पराधीनता' ही पुस्तके प्रकाशित
३९ ६ एप्रिल १९८३ 'शेतकरी संघटक' पाक्षिक सुरू
४०   १६ नोव्हेंबर १९८३ पंढरपूर येथे 'विठोबाला साकडे' मेळाव्यात कृषिमूल्य आयोग बरखास्तीची मागणी
४१ १२ मार्च १९८४ चंडीगढ येथील राजभवन वेढा सुरू. इतर राज्यांतील प्रतिनिधींसह एक लाख शेतकरी सहभागी.
४२ १८ मार्च १९८४ चंडीगढच्या परेड ग्राउंडवर विजयोत्सव
४३ २७ मे १९८४ संघटनेची पहिली कार्यकारिणी नाशिक येथे स्थापन
४४ २ ऑक्टोबर १९८४ गुजरात व महाराष्ट्रभर प्रचारयात्रा सुरू
४५ ३१ ऑक्टोबर १९८४ टेहेरे येथे यात्रासमारोप, तीन लाख शेतकऱ्यांचा मेळावा.
४६ २२ नोव्हेंबर १९८४ पुणे येथील बैठकीत राजकीय भूमिकेवर निर्णय
४७ २१ जानेवारी १९८५ धुळे अधिवेशन, सर्व राजकीय पक्षांना शेतीमाल

भावाविषयी भूमिका मांडण्यासाठी निमंत्रण.

४८ २ ऑक्टोबर १९८५ राजीवस्त्रविरोधी आंदोलन सुरू. महाराष्ट्रभर एकूण

२५० ठिकाणी राजीवस्त्रांची होळी.

४९ ६ ऑक्टोबर १९८५ राहुरी येथे उस परिषद. चरणसिंग, शरद पवार, प्रमोद महाजन इत्यादि राजकीय नेत्यांची हजेरी.
५० १२ डिसेंबर १९८५ मुंबई येथे दत्ता सामंत यांच्यासमवेत पहिला शेतकरी कामगार मेळावा. राजीवस्त्रांची जाहीर होळी.
५१ २३ जानेवारी १९८६ आंबेठाण येथे असताना हृदयविकाराचा पहिला झटका
५२ २ ऑक्टोबर १९८६ अकोला येथे कपास किसान संमेलन
५३ ९ नोव्हेंबर १९८६ चांदवड येथील पहिले महिला अधिवेशन. खुल्या अधिवेशनात तीन लाख महिलांचा सहभाग.
५४ ७ डिसेंबर १९८६ राजीवस्त्रांवर 'ठप्पा मारो' आंदोलन. हुतात्मा बाबू गेनू स्मृती सप्ताह सुरू.
५५ १० डिसेंबर १९८६ कपाशी आंदोलनात सुरेगाव, जिल्हा हिंगोली, येथे पोलीस गोळीबारात तीन शेतकरी ठार
५६ १२ डिसेंबर १९८६ वर्धा येथील रेल रोको. विदर्भात ६०,००० तर मराठवाड्यात ३०,००० शेतकरी तुरुंगात.
५७ १५ फेब्रुवारी १९८७ २५,००० शेतकरी मुंबईतील चौपाटीवर दाखल. मुख्यमंत्र्यांच्या निवासस्थानी ठिय्या आंदोलन.
५८  १६ जानेवारी १९८८ सांगली येथे व्ही. पी. सिंग यांच्या उपस्थितीत मेळावा
५९ १८ एप्रिल १९८८ जळगाव येथे शेतकऱ्यांचा राजा शिवाजी व दलितांचा कैवारी बाबासाहेब आंबेडकर यांच्या संयुक्त जयंतीचा मेळावा. कर्जमुक्ती आंदोलनाची घोषणा.
६० १ मे १९८९ दारू दुकान बंदी आंदोलन सुरू
६१ ३ जुलै १९८९ महिला आघाडीचे जिल्हा परिषद कब्जा आंदोलन
६२ २ ऑक्टोबर १९८९ बोट क्लब, नवी दिल्ली, येथे पाच लाखांचा किसान जवान मेळावा. महेंद्रसिंग टिकैत यांनी उधळून दिलेला.
६३ ८ नोव्हेंबर १९८९ अमरावती येथे महिला आघाडीचे दुसरे अधिवेशन. शेतकरी महिलांच्या संपत्ती अधिकारासाठी 'मंगल सावकाराचे देणे फेडण्याचे आवाहन. जातीयवादी घटकांना गावबंदी करण्याचा निर्णय.
६४ ३१ डिसेंबर १९८९ दिल्ली येथे किसान समन्वय समितीची बैठक, नवनिर्वाचित पंतप्रधान व्ही. पी. सिंग व उपपंतप्रधान देवी लाल उपस्थित.
६५ २ जानेवारी १९९० महाराष्ट्राच्या २६ जिल्ह्यांमधून 'अर्थवादी चळवळीला क्षुद्रवादाचा धोका' समजावून सांगण्यासाठी फुले आंबेडकर विचारयात्रा सुरू
६६ १४ मार्च १९९० व्ही. पी. सिंग यांनी शरद जोशी यांच्या अध्यक्षतेखाली कृषी सल्लागार समिती स्थापन केली
६७ २ ऑक्टोबर १९९० लक्ष्मी मुक्ती अभियान सुरू. जमिनीची मालकी शेतकरी महिलांच्याही नावे व्हावी ह्यासाठी.
६८ १० नोव्हेंबर १९९१ शेगाव येथील शेतकरी मेळाव्यात चतुरंग शेतीची योजना. खुल्या अर्थव्यवस्थेचे स्वागत.
६९ ३१ मार्च १९९३ डंकेल प्रस्तावाच्या स्वागतासाठी दिल्ली येथे शेतकऱ्यांचा 'आर्थिक मुक्ती मोर्चा'
७० २९ ऑक्टोबर १९९३ औरंगाबाद अधिवेशनात डंकेल प्रस्तावाला जाहीर पाठिंबा व 'चतुरंग शेती'च्या अंमलबजावणीसाठी 'शिवार ॲग्रो प्रा. लि. कंपनीची घोषणा
७१ ६ नोव्हेंबर १९९४ नागपूर येथे स्वतंत्र भारत पक्षाची स्थापना
७२  १३ मार्च १९९५ हिंगणघाट (वर्धा) व बिलोली (नांदेड) येथून विधानसभा निवडणुकीत पराभूत.
७३ ८ एप्रिल १९९५ हैदराबाद येथे ॲन्जिओप्लास्टी
७४ १० डिसेंबर १९९५ कापूस एकाधिकार खरेदीच्या विरोधात स्वातंत्र्य यात्रा. नरखेड येथे समारोप व तेथून मध्य प्रदेशातील पांढुर्णामार्गे कापूस सीमापार आंदोलन.
७५ १४ डिसेंबर १९९५ औरंगाबाद येथे ऊस झोनबंदी विरोधात उपोषण सुरू.
७६ २७ एप्रिल १९९६ नांदेड लोकसभा मतदार संघातून लोकसभेच्या निवडणुकीत उमेदवारी. पराभूत.
७७ ४ एप्रिल १९९७ पंजाब व हरियाणामधील गव्हाच्या भावाचे आंदोलन.
७८ ९ ऑगस्ट १९९७ 'Q' आंदोलन सुरू. 'नोकरदार चले जाव', 'भ्रष्टाचार चले जाव'
७९ ५ जून १९९८ इस्लामपूर (सांगली) येथे शेतकरी संघटनेतर्फे आयोजित ग्रामीण साहित्य संमेलन
८० १० डिसेंबर १९९८ स्वातंत्र्याच्या सुवर्णमहोत्सवानिमित्त अमरावती येथे जनसंसद सुरू
८१ २० डिसेंबर १९९८ पुण्याहून दिल्लीला जाताना विमानातच अर्धांगवायूचा झटका. शरीराची डावी बाजू कमकुवत झाली.
८२ १२ मार्च १९९९ शेतकऱ्यांची कंपनी स्थापन करून औद्योगिकीकरणासाठी 'भामा उद्योगनगरी'चे बाळासाहेब ठाकरे यांच्या हस्ते भूमिपूजन
८३ ५ एप्रिल १९९९ मुंबईत बॉम्बे हॉस्पिटल येथे बायपास सर्जरी
८४ ४ डिसेंबर १९९९ गुजरातमधील नर्मदा जन आंदोलन
८५ १० जानेवारी २००० जागतिक व्यापार संघटनेचे (WTO) महानिदेशक माईक मूर यांची दिल्ली येथे भेट शेतकऱ्यांवर लादलेल्या उणे सबसिडीची माहिती दिली
८६ १२ सप्टेंबर २००० जोशींच्या अध्यक्षतेखाली अटल बिहारी वाजपेयी यांच्यातर्फे कृषी कार्य बल स्थापन
८७ ६ एप्रिल २००१ नवी दिल्ली येथील नेहरू स्टेडियमवर 'किसान कुंभ' भरवून शेतकरी स्वातंत्र्याचा जाहीरनामा घोषित
८८ १५ नोव्हेंबर २००२ तीन महिन्यांच्या नर्मदा परिक्रमेला सुरुवात
८९   २८ मे २००३ शिवाजी पार्क, मुंबई येथे स्वतंत्र भारत पक्षाचे पहिले राष्ट्रीय अधिवेशन सुरू
९० ३० जानेवारी २००४ स्वतंत्र विदर्भ राज्यासाठी शेणगाव (अमरावती) ते कोराडी (नागपूर) पदयात्रा सुरू
९१ ७ जुलै २००४ सहा वर्षांसाठीचे राज्यसभा सदस्यत्व सुरू
९२ ३१ डिसेंबर २००७ रामेश्वरम येथे शेतकऱ्यांना कर्जमुक्त करावे ह्या मागणीसाठी मेळावा. सर्व कर्जाचे कागदपत्र समुद्रात बुडवण्यात आले.
९३ २ जुलै २००८ कोल्हापूर येथे इथेनॉल शिबीर सुरू
९४ ९ मार्च २०१० सरकारने मांडलेल्या 'महिला आरक्षण विधेयका'तील आरक्षित जागा ठरवण्याची आवर्तनी सोडतीची तरतूद लोकशाहीला घातक आहे म्हणून राज्यसभेत एकट्याचे विरोधी मतदान (१८६ विरुद्ध १)
९५ २ ऑक्टोबर २०१० रावेरी, जिल्हा यवतमाळ, येथील पुनर्निर्मित सीतामंदिराचा लोकार्पण समारंभ
९६ १० फेब्रुवारी २०११ दिल्ली येथे 'अन्नसुरक्षा' या विषयावरील आंतराष्ट्रीय

परिसंवादासाठी गेले असताना हॉटेलच्या जिन्यावरून पडल्याने जखमी. हालचालींवर खूप मर्यादा.

९७ ३० जुलै २०१२ बांदा, बुंदेलखंड, येथे किसान समन्वय समितीची

बैठक. जोशी उपस्थित असलेली शेवटची.

९८ ८ नोव्हेंबर २०१३ चंद्रपूर येथे शेतकरी संघटनेचे बारावे अधिवेशन.

'पुन्हा एकदा उत्तम शेती' ही घोषणा. जोशी उपस्थित असलेले शेवटचे अधिवेशन.

९९ २५ नोव्हेंबर २०१४ मुंबई येथे यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठानचा पुरस्कार शरद पवार यांच्या अध्यक्षतेखाली. शेवटचा जाहीर कार्यक्रम.
१०० १२ डिसेंबर २०१५ पुणे येथे निधन.