अखंडादि काव्यरचना

विकिस्रोत कडून

सर्वांचा निर्मीक आहे एक धनी || त्याचे भय मनी || धरा सर्व ||१|| न्यायाने वस्तुंचा उपभोग घ्यावा || आनंद करावा || भांडू नये ||२|| धर्मराज्य भेद मानवा नसावें || सत्याने वर्तावे || ईशासाठी ||३|| सर्व सुखी व्हावे भिक्षा मी मागतों || आर्यास सांगतो || जोती म्हणे ||४|| (२) निर्मीकाने जर एक पृथ्वी केली || वाही भार भली || सर्वत्रांचा ||१|| तृणवृक्षभार फाळी आम्हासाठी || फळे ती गोमटी || छायेसह ||२|| सुखसोईसाठी गरगर फेरे || रात्रंदीन सारे || तीच करी ||३|| मानवांचे धर्म एक नसावे अनेक || निर्मीक तो एक || जोती म्हणे ||४|| (३) प्राणिमात्रा सोई सुख करण्यास || निर्मी पर्जन्यास || नद्यांसह ||१|| त्यांचे सर्व पाणी वेगाने वाहती || आर्ये कुरापती || तिर्थे केली ||२|| दाढी दोई वेण्या मुढ भाररीती || भट करिताती || द्रव्यलूटा ||३|| आर्यानी कल्पीली थोतांडे ||ही सारी || दर्गे सर्वोपरी || जोती म्हणे ||४|| (४) जप अनु्ष्ठानें पाऊस पाडीती || आर्य कां मरती || जाळवीण ||१|| जळांत बुडता गटांगळ्या खाती || प्राणास मुक्तीप || तळी वसें ||२|| फुगुनीयां वर जळी तरंगती || मजा ते दाविती || मृत्युलोकी ||३|| अज्ञानी शुद्रात भुदेव बनती || भिक्षा कां मागती || जोती म्हणे ||४|| (५) जप अनुष्ठाने स्त्रिया मुलें होती || दुजा का करीती || मुलासाठी ? ||१|| भट ब्राम्हणांत बहु स्त्रिया वांज || अनु्ष्ठानी बीज || नाही का रे ? ||२|| अनुष्ठावीण विधवा मुलें देती || मारूनी टाकीती || सांदीकरोनी ||३|| ज्याची जशीकर्मे तशी फळा येती || शिक्षा ती भो्गीती || जोती म्हणे ||४|| (६) ईश म्हणे आर्य परशरामास || वधी अर्भकास || क्षत्रीयांस ||१|| दांभीक पेशवे पानपती जाती || पालथे पडती म्लेंछापुढे ||२|| मर्द रावबांजी इंग्रजास भ्याला || गौप्रदानी झाला || बीठूरास ||३|| धूर्त आर्य नाना सोवळे दावीतों || गोर्याझसंगे खातो || जोती म्हणे ||४|| (७) एक सुर्य सर्वा प्रकाशास देतो || उद्योगा लावितो || प्राणीमात्रा ||१|| मानवासहीत प्राण्यांचे जीवन || सर्वांचे पोषण तोच करी ||२|| सर्वा सूख देई जनकाच्या परी || नच धरी दूरी || कोणी एका ||३|| मानवांचा धर्म एकच असावा || सत्यांने वर्तावा || जोती म्हणे ||४|| (८) एक चंद्र नित्य भ्रमण करितो || सर्वा सुख देतो || निशीदीनी ||१|| भरती ओहोटी समुद्रास देतो || जल हालवितो || क्षारांसह ||२|| पाणी तेच गोड मेघा योगे होते || संतोषी करीते || सर्व प्राण्या ||३|| मानवांचे साठी बहु धर्म कसे || झाला का हो पीसे || जोती म्हणे ||४|| || मानवी स्त्रीपुरूष ||

(१) सारे स्त्रीपुरूष भावंडात लेखी || मांगमहारा दःखी || करीताती ||१|| ख्रिस्त महंमदा सत्याने आळवी || मानवा वळवी || ईशाकडे || २|| धर्म जाती भेद नाही तिला || शोभे मनुजाला || खरी माता || ३|| अशा मानवास सत् स्त्री म्हणावी || तिची किर्ती गावी || जोती म्हणे ||४|| (२) आत्मज्ञान नाही ब्रम्हराक्षसाला || पिडी सर्वत्राला || सोवळ्याने ||१|| स्वतः सुखदुखः पराशी तोलणे || मेळ बैसविणे || त्यास कैचे ||२|| यालाच म्हणावे अहंब्रम्ह झाला || गर्वाने फुगला || वाया गेला ||३|| मानवास बट्टा यानेच लाविला || दुर्गुणी आगळा || जोती म्हणे ||४|| (३) निर्मळ निर्दोषी निव्वळ विचारी || सदा सत्याचारी || प्रपंचात ||१|| सुर्यापरी सत्यप्रकाश पेरीतो || शांती सर्वा देतो || चंद्र जैसा ||२|| होईना भुदेव जती मारवाडी || मानवा न पीडी || सर्पवत ||३|| आशा सज्जनास मानव म्हणावे || त्याचे गुण गावे || जोती म्हणे ||४|| (४) जगी अमंगळ खेळा संसारात || जाई एकांतात || मुक्तो म्हणे ||१|| मुक्तम झाले त्यांनी ग्रंथ कसे केले || पाखंडे नोंदिले || आर्यहीत ||२|| आर्य श्रेष्ठ केले शुद्र नागविले || नित्य वागविले || दासापरी ||३|| मानवाचे द्वेष्ठे धूर्त सर्वोपरी || पहा ग्रंथातरी || जोती म्हणे || ४|| ||आत्मपरीक्षण ||

(१) परा लाभ होता संतोष मानितो || साह्य देतो घेतो || सदगुणांचे ||१|| विद्वान करीतो पंगू जगाप्रत || पाळी सदा व्रत || घरामध्ये ||२|| आपल्यावरून जग आळखतो || मानवा लेखी तो || बंधूपरी ||३|| आत्मपरिक्षण करितो जगांत || धन्य मानवंत || जोती म्हणे ||४|| (२) जगामाजी सर्व मजला असावे || शेजार्याव नसावे || हेवा मुळ ||१|| स्वतः हितासाठी तळमळ करी || झटे सर्वोपरी || किर्तीसाठी ||२|| खरा मतलबी सर्वात वर्ततो || निराशा करितो || बापड्यांनी ||३|| आत्मपरिक्षेला नाही जुमानात || झुरे विषादांत || जोती म्हणे ||४|| (३) आर्याजीने सर्वा पदच्युत केले || गर्वाने फुलले || शिधी वेद ||१|| निराशा शूद्रांची आजतागाईत || गणिले दासांत || त्याजपैकी ||२|| आनंदले मनी विद्याबंदी केली || घेईना साऊली || अत्यंजाची ||३|| आर्ये धिक्कारीले आत्मपरिक्षेला || त्रास हा जिंकिल्या || जोती म्हणे ||४|| (४) आर्याजीचा हेवा त्रास जिंकिल्यास || लुटी अज्ञान्यास || सर्व कामी ||१|| झाकल्या वेदाचा आधार दाविती || श्रेष्ठत्व ओढीती || स्वतःकडे ||२|| मानवांचे हक्क शुद्रा मुख्य दावा || पुरे वेदकावा || ब्रम्हकुट ||३|| किड लागो आर्य आत्मपरिक्षेला || त्रास अंत्यजाला || जोती म्हणे ||४|| || नीति ||

(१) निर्मीले बांधव स्त्रीपुरूषप्राणी || त्यात गोरे कोणी || रंगवर्ण ||१|| त्याचे हितासाठी बुध्दीमान केले || स्वतंत्र ठेविले || ज्या त्या कामी ||२|| कोणास न पिडी कमावले खाई || सर्वा सुख देई || आनंदात ||३|| खरी हीच नीती मानवाचा धर्म || बाकीचे अधर्म || जोती म्हणे ||४|| (२) माझे काही कोणी घेऊ नये जनी | वसे ध्यानीमनी || मानवांच्या ||१|| माझ्या मनी सर्व मजला असावे || दुज्या का नसावे || जगामाजी ? ||२|| आपल्यावरून जग ओळखावे || त्यांच्याशी वर्तावे || सत्य तेच ||३|| मानवांचा धर्म सत्य नीती खूण || करी जीवदान || जोती म्हणे ||४|| (३) सत्यविण नाही धर्म तो रोकडा || जनांशी वाकडा || मतभेद ||१|| सत्य सोडू जाता वादामध्ये || बुध्दीस वाकडे || जन्मभर ||२|| सत्य तोच धर्म करावा कायम || मानवा आराम || सर्व ठायी ||३|| मानवांचा धर्म सत्य हीच नीती || बाकीची कुनीती || जोती म्हणे ||४|| (४) आपहितासाठी सत्याने वर्तावे || सुमार्गी लावावे || भावंडास ||१|| तुझी वर्तणूक आधी कर नीट || दुर्गुणांचा धीट || खरे सुख ||२|| मानवी सुखास वाटेकरी होती || फळास भोगीती || सर्वांसह ||३|| मानवाचा धर्म सत्य खरी नीती | जोती म्हणे ||४|| || धीर ||

(१) सत्याचा जिव्हाळा मनाची स्वच्छता || चित्तास स्वस्थता || जेथे आहे ||१|| जेथे जागा धीर सदा हृदयात || सत्यवर्तनात || खच्ची घाला ||२|| पिडा दुःखे सोशी संकटे निवारी || गांजल्यास तारी || जगामाजी ||३|| धीर धरूनीया सर्वा सुख देती || यशवंत होती || जोती म्हणे ||४|| (२) धीर सोडीताच शुद्रा दास केले || आर्याजी ताठले || ऐश्वर्यात ||१|| भित्रे शुद्र वेडे अज्ञानी बापुडे || आर्य पाई पडे || लज्या गेली ||२|| अज्ञानी म्हणूनी म्लेंच्छानी लढले || प्राणाशी मुकले || आर्यापाई||३|| शूर मांगमहारा आर्ये नागविले || पशूवत केले || जोती म्हणे ||४|| || समाधान ||

(१) हेळसांड करी नियतवृत्तीची || मात दुर्गुणांची || संसारात ||१|| रोगग्रस्त होता दांतओठ खाती || तेव्हा खवळती || मनामधी ||२|| सरकारावर व्यर्थ रागावरी || स्नेहास निदीती || कधीमधी ||३|| समाधान नष्ट जाते बुध्दीबळ || व्यर्थ तळमळ || जोती म्हणे ||४|| (२) माझीच योग्यता जास्ती आहे म्हणे || दावी धीटपणे || अज्ञान्यास ||१|| अजागळी नाही दुध किंवा मुत्र || मोक्ष वेदांतात || आहे म्हणे ||२|| मूढा लुटूनिया प्रपंच करिती || जगी हंबरती || झालो मुक्तह ||३|| त्याला कैचे सुख समाधान सौख्य || पापी हेच मुख्य || जोती म्हणे ||४|| || सहिष्णुता ||

(१) दुष्ट वर्तनाने नष्ट कमी होती || संकटे जिंकीले || क्लेशासह ||१|| दुःख क्लेश होता देवा दोष देती || निर्मीका निर्दीती || सर्वोपरी ||२|| जन्ममृत्युसह सुखदुःख देता || कर्ताकरविता || त्याची लिला ||३|| केली दुष्ट कर्मे सांगण्यास भीती || देवाची फजीती || करी मूळ ||४|| सहिष्णुता नाही अशा सोंगाड्यास || खर्याी नास्तीकास || जोती म्हणे ||५|| (२) थोडे दीन तरी मद्य वर्ज करा || तोच पैसा भरा || ग्रंथासाठी ||१|| ग्रंथ वाचिताना मनी शोध करा || देऊ नका थारा || वैरभरा ||२|| खोट्या धर्मा नाही सत्याचा आधार || व्यर्थ वडीवार || स्वार्थासाठी ||३|| सत्य सोडूनीया धर्मवादी होती || संग्रामी करीती || रक्तसपात ||४|| सहीष्णुतेवीण नाही समाधान | एकीस बंधन || जोती म्हणे ||५|| || सद्विवेक ||

(१) दृढ मनी धरी सद्विवेकास || तेच संतानास || सुख देई ||१|| जगहीतासाठी सत्याने वर्तती || हित ते करीती || स्वतःचेही ||२|| आपहितासाठी मुढा नाडू जाता || त्याने तसे होता || मग कसे ? ||३|| सद्विवेकाने तुम्ही करा न्याय || नसे पुढे भय || जोती म्हणे ||४|| (२) विवेकी करीना जप अनुष्टाने || पोकळ अर्पण || निर्मीकास ||१|| विवेकी ढळीना दीन रंडक्यांना || त्यांस भादरीना || न्हाव्या हाती ||२|| विवेकी भजेना धातू दगडास || म्हणेना शुद्रास || तुम्ही नीच ||३|| सद्विवेकावीण करीत तळमळ || पाखांडी निव्वळ || जोती म्हणे ||४|| (३) पशुहिंसा आडे अस्सल वेदांत || पुण्य गौवधात || धूर्त म्हणे ||१|| शुद्रादीकास साक्ष घ्या मनूची || चैन ब्राम्हणाची || बळीस्थानी ||२|| मनु धिक्कारूनी एकीकडे फेकत || माना शूद्रादीक्त| || बंधूपरी ||३|| सद्विवेकावीण आर्याजी पाषाण || कलीचे रक्षण || जोती म्हणे ||४|| (४) आर्ये जेरदस्त मांगमहारा केले || पाताळी घातले || स्पर्शबंदी ||१|| धूर्त हॄषीजींनी वेदास रचीले || द्वेषाने छळीले || सिमा नाही ||२|| अन्नवीण बहु उपासाने मेले || उष्टे नाही दिले || हेवा मूळ ||३|| सद्विवेकास आर्यांनी त्यजिले || त्यांचे हाल केले ||जोती म्हणे ||४|| || उद्योग ||

(१) मानवा उद्योग अनेक आहेत || बार्यायवाईटांत || काळ जातो ||१|| आपहितासाठी उद्योग करीती || मार्ग दावीताती || संतानास ||२|| त्यांपैकी आळशी दुष्ट दुराचारी | जन वैरी करी || सर्व काळ ||३|| जसा ज्याचा धंदा तशी फळे येती || सुखदुःखी होती || जोती म्हणे ||४|| (२) सत्य उद्योगाने रोग लया जाती || प्रकृती ती होती || बळकटा ||१|| उल्हासीस मन झटे उद्योगास || भोगी संपत्तीस || सर्वकाळ ||२|| सदाचार सौख्य त्याची सेवा करी || शांतता ती बरी || आवडीने ||३|| नित्य यश देई त्याचा उद्योगास || सुख सर्वत्रांस || जोती म्हणे ||४|| || स्वच्छता ||

(१) स्वच्छ होण्यासाठी स्नान ते करावे || वस्त्राम्नी पुसावे || लागलेच ||१|| स्नानाचा कंटाळा || पुळ्यांचे माहेर || खरजुचे घर || आदीपीठ ||२|| दात खाऊनीया बोलता चालता || नित्य खाजविता वेळ जाई ||३|| स्वकीय स्वच्छता मुळी विसरला || वैद्याने नाडीला || जोती म्हणे ||४|| (२) अंगवस्त्रे ज्यास धुण्याचा कंटाळा || चोळी वेळोवेळा || दोन्ही कांखा ||१|| दात विंचकूनी जांघास चोळी || काढीताच मळी || गार वाटे ||२|| वस्त्रातील उवा चिमटीने धरी || चोळूनिया मारी || मुकाट्याने ||३|| अंगवस्त्रे स्वच्छ ठेऊ विसरतो || निंदे पात्र होतो || जोती म्हणे ||४|| || गृहकार्यदक्षता ||

(१) आद्यापेक्षा जास्त खर्च जे करीती || ऋणकरी होती || जिवा कांच ||१|| सोयरेधायरे मागे पुढे येती || तुकडे मोडीती || दिमाखाने ||२|| मतलबी स्नेही रसाळ बोलती || भोंदुनीया खाती || संधी येता ||३|| गृहकार्यदक्ष होऊ विसरला || चोंबड्यांनी खाल्ला || जोती म्हणे ||४|| (२) सर्व ठायी दक्ष असे परिमीत || तोच सुरक्षित || जगामाजी ||१|| सतसंगती निरोगी संतती || पळती विपत्ती || रानोमाळ ||२|| मेल्यामागे कोणी दोषी ठरवीना ||आनंद संतांना || चीर केला ||३|| गृहकार्यदक्ष सर्वदा जपला || मान निर्मीकाला || जोती म्हणे ||४||